हा भाजलेला पदार्थ खोकला उबळ लगेच बंद

जे लोक प्रदुषणात आपले नाक व तोंड यावर रुमाल किंवा मास्क चा वापर करत नाही अशा लोकांना हा त्रास जास्त जाणवतो माहित असून देखील काळजी न घेतल्यामुळे गळ्यात विषारी पदार्थ जाऊन इन्फेक्शन तयार करतात आणि सहजतेने खोकल्याचा त्रास जाणवतो यासाठी प्रदूषणात जाताना स्वतःकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे

आपल्याला वारंवार खोकला येऊन खूप त्रास होत असेल आणि खोकला थांबतच नसेल तर या त्रासापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा उपाय आपण बघणार आहोत या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आले आले घेऊन ते गॅसवर किंवा शेगडीवर दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या आणि हे असेच थंड होऊ द्यायचे आहे दुसरे एक पातेले गरम करायला ठेवावे

त्यात अर्धा चमचा मिरी व एक चमचा भरून जिरे हे थोडे भाजून घ्यायचे आहे भाजतांना छान सुगंध सुटेपर्यंत हे भाजायचे आहेत भाजतांना यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायच्या आहेत आणि लगेच गॅस बंद करायचा आहे ओवा आधी टाकल्या तर काळया होतील म्हणून सगळ्यात शेवटी टाकायच्या आहे ह्या सर्व मिश्रणाची बारीक पूड करून घ्यायची आहे

भाजलेल्या आल्याचे साल काढून घ्या आणि मिक्सर मध्ये गर काढून घ्या आल्याचा गर एका पात्रात टाकून मंद आचेवर छान गरम करून घ्या हे भाजून ड्राय होत आले की त्यात अर्धी वाटी बारीक गूळ टाकायचा आहे हे परतवत असताना सारखे हलवत राहायचे आहे आणि यासाठी जाड बुडाचे भांडे किंवा नॉनस्टिक कढई वापरावी हे मिश्रण चांगले परतून झाल्यावर त्यात बारीक केलेली पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून पुन्हा चांगले परतवून घ्या

हे एका वाटीत काढून घ्यायचे आहे गळ्याचे इन्फेक्शन असेल तर अर्धा चमचाभर हळद देखील तुम्ही यात टाकू शकतात हे थंड झाले कि एका बॉटलमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकतात पंधरा दिवस पर्यंत हे सहज टिकते फक्त वाटतांना यात पाणी टाकू नये आणि दिवसभरातून दोन वेळेस हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते पाव चमचा भरुन एकावेळेस असे सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस चॉकलेट प्रमाणे चघळुन खायचे आहे

आणि हे खाल्ल्यानंतर अर्धा तास कुठला पदार्थ खाऊ नये किंवा पाणी देखील पिऊ नये यामुळे नॉर्मल खोकला असेल तर एका दिवसातच बरा होतो आणि जास्त त्रास असेल तर हा उपाय तीन दिवस नक्की करावा तीन दिवसात कितीही जुना खोकला असेल तरीदेखील बंद होण्यास मदत होते आणि पुन्हा कधीही तुम्ही याचा वापर करू शकतात हा उपाय करत असताना पाणी हे शक्यतो कोमट करूनच प्या म्हणजे त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपण याचा वापर करू शकतो

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.