फक्त हा घरगुती नॅचरल उपाय करा व भयंकर मुख दुर्गंधीच्या त्रासापासून अगदी सहजतेने घरच्याघरी लगेचच सुटका करा. आज मी आपल्यासाठी मुखातून जर दुर्गंधी येत असेल. तर मुखदुर्गंधी अत्यंत सहजतेने घरच्या घरी बरी करून देणारा असा खूपच सुंदर आणि अगदी नॅचरल असा उपाय घेऊन आले आहे. कि यामुळे फक्त तीनच दिवसात तुमच्या मुखाला कितीही दुर्गंधी येत असेल तरीदेखील पूर्णपणे बरी होणार आहे.
मुख दुर्गंधी येण्याचे कारण म्हणजे आपले पोट स्वच्छ न होणे. जर आपले पोट स्वच्छ नसेल तर यामुळे मुखातून दुर्गंधी येते. किंवा याचे दुसरे कारण असे देखील असू शकते की आपण ब्रश व्यवस्थित करत नाही. घाईघाईत ब्रश करतो. किंवा कुठल्याही पेस्टचा आपण सर्रास वापर करत असतो. यामुळे देखील अशा समस्या होऊ शकतात किंवा अपचनाच्या ज्या व्यक्तीला समस्या असतील.
त्यांनादेखील अशा समस्या होतात किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील असे होते. पाणी कमी पिल्यामुळे देखील असे होऊ शकते. अशी विविध कारणे मुखदुर्गंधीची आहेत. परंतु कारण कुठलेही असो कुठल्याही कारणामुळे तुमच्या मुखातून दुर्गंधी येत असेल. तर तुम्ही हा उपाय केला. तर नक्कीच तुम्हाला या उपायापासून फायदा होणार आहे.
आणि उपाय अगदी नॅचरल असून सहजतेने तुम्ही घरच्या घरी कधीही करू शकता. यासाठी आपल्याला लागणार आहेत आंब्याच्या झाडाची पाने. आंब्याचे झाड आपल्याला सहजतेने कोठेही कधीही मिळून जाते. तर याची पाने आपल्याला घेऊन यायची आहेत आणि जर का तुमच्याकडे आंब्याच्या झाडाची पाने मिळत नसतील.
तर ज्या वेळेस तुम्हाला मिळतात. त्या वेळेस ही जास्त तोडून घ्या. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या. छान कडक वाळली की याची पावडर तयार करून ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला याचा वापर करता येईल किंवा तुमच्याकडे जर ताजी पाने असतील. तर ताजी पाने घेऊन या आणि फक्त दोन पाने यासाठी वापरायची आहेत.
दोन पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मिठाच्या पाण्याने धुण्याचे कारण एवढेच की यावरील काही जीवजंतू असतील. तर ते निघून जातात. यामुळे आपल्याला त्रास पण होत नाही. परंतु यामध्ये काही जीवजंतू असतील तर त्यामुळे देखील आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून कधीही कुठल्याही वनस्पतीचा जर तुम्ही वापर करत असाल.
तर मिठाच्या पाण्याने प्रथम ही स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मग याचा वापर करायचा. तर या प्रमाणे ही दोन पाने घ्यायचे आहेत आणि सकाळी अनशापोटी ही दोन्ही पाने देठ काढून अगदी दाताने बारीक चावून-चावून खायची आहेत. असे फक्त तुम्ही तीन दिवस जरी केले तर यामुळे मुखदुर्गंधीच्या कितीही समस्या असतील.
कितीही दिवसापासून तुम्हाला हा त्रास होत असेल. तरीदेखील तीनच दिवसात पूर्णपणे बरा होण्यास मदत होते आणि तुम्ही पुढेदेखील हा उपाय करू शकता. यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड-इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे. आणि हे चवीला देखील चांगले असते. लहान मुले असतील. तर तुम्ही एक पान त्यांना देऊ शकता आणि मोठे व्यक्ती असतील तर दोन पानाचा एका वेळेस वापर करायचा आहे.
लहान मुलांना जर हे खाल्ले जात नसेल तर हे एक पान खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांना एक खडीसाखरेचा तुकडा देखील त्यांना चघळून चघळून खायला दिला तरीदेखील चालेल. आणि तुमच्याकडे वारंवार ही पाने मिळत नसतील. आणि तुम्ही पावडर तयार करून घेतलेली आहे. तर अर्धा चमचा भरून पावडर याचा तुम्ही काढा जरी तयार करून पिलात तरीदेखील चालेल.
किंवा कोमट पाण्यामध्ये ही रात्रभर मिक्स करून ठेवायची आहे आणि सकाळी अनशापोटी हे पाणी पिऊन घ्यायचे आहे. यामुळे देखील मुखदुर्गंधीच्या समस्या निघून जातात. आहे की नाही अगदी साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय. तर हा उपाय करून बघा. याचा चांगलाच फायदा तुम्हाला नक्की मिळेल.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.