हे दाणे तोंडात ठेवा भयंकर पोटदुखी पासून लगेचच आराम

आज आपण भयंकर पोट दुखी पासून आराम मिळवून देणारा साधा सोपा घरगुती उपाय जाणून घेऊया या उपायांमुळे तुमची पोटदुखी तात्काळ थांबेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे.

उपाय अगदी साधा सोपा असून पोट दुखत असताना हा उपाय तुम्ही लगेच करू शकता व पोटदुखी पासून आराम मिळवू शकता कारण हा उपाय अगदी जुनाट व पारंपारिक आहे तसेच पूर्ण आयुर्वेदिक देखील आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत.

मेथीचे दाणे यामध्ये प्रोटिन्स फायबर आयरन विटामिन सी पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असते लूजमोशन असो सांधेदुखी असो यावर तर मेथीचे दाणे उपयोगी आहेतच. पण कधी जर पोट दुखत असेल तर फक्त एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत नंतर एका लोहाच्या पात्रात किंवा तव्यावर हे दाणे भाजून घ्यायचे आहेत.

ज्यांचे पोट दुखत आहे. त्यांनी हे भाजलेले मेथीचे दाणे दोन मिनिटं तोंडात धरून ठेवायची आहेत याला चावायचे नाही फक्त तोंडामध्ये धरून ठेवायचे आहे आणि दोन मिनिटानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी प्यायचे आहे.

आणि या कोमट पाण्याबरोबरच तोंडातील मेथीचे दाणे गिळून घ्यायचे आहेत पाच ते पंधरा वयोगटातील मुले असतील तर त्यांना अर्धा चमचा भरून हे दाने द्यायचे आहेत असे केल्याने तुमची भयंकर पोटदुखी लगेच कमी होते.

हा उपाय करताना कोमट पाणी प्यायचे आहे व पंधरा वर्षा पुढील व्यक्तीने एक चमचा भरुन हे दाणे घ्यायचे आहेत ज्या व्यक्तींचे पोट वारंवार दुखते अशा व्यक्तींनी आठ ते पंधरा दिवसातून हा उपाय केला पाहिजे यामुळे सहजतेने पोटदुखीची समस्या निघून जाते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.