बऱ्याच महिला आपला चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करत असतात. परंतु जर तुम्ही या ऐवजी हा घरगुती उपाय केला तर नसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होऊन तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल. असा हा बहुगुणी उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तर अश्या या बहुगुणी उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ज्वारीचे पीठ. असे म्हणतात ज्वारीची भाकरी केल्या नंतर त्या पीठाने माकलेला हात आपल्या चेहऱ्यावर लावलात तर आपला चेहरा डाग विरहित आणि सुंदर दिसण्यास मदत होते. ज्वारी ही थंडावा देणारी असून चेहऱ्यासाठी ज्वारीचे पीठ हे उत्तम पर्याय आहे.
तर यासाठी तुम्हाला दोन चमचे ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हळद. ही हळद चेहऱ्यासाठी एक वरदान आहे. पूर्वीपासून आपण चेहऱ्यासाठी हळदीचा उपयोग करत आलो आहोत. आपल्या चेहऱ्यावरील काळसर झालेले डाग मुरमांचे डाग वांगाचे डाग हे डाग घालवण्यासाठी गुणकारी आहे.
अशी ही हळद आपल्या दोन चमचे लागणार आहे. आणि ही हळद ज्वारीच्या पिठामध्ये पाव चमचा घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम तेल. बदाम तेलाने देखील आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे ग्लो येतो. आणि विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने चेहरा काळा पडणे चेहऱ्यावर डाग पडणे.
कोरडा पडणे किंवा चेहऱ्यावर रॅशेस येणे या समस्या देखील नाहीश्या करण्यासाठी या बदाम तेलाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. असे हे बदाम तेल अगदी दोन थेंब आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला चौथा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबूचा रस अगदी दोनच थेंब आपल्याला लिंबूचा रस घ्यायचा आहे.
कारण बऱ्याच जणांनी स्किन ही सेन्सिटिव्ह असल्यामुळे किंवा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चेहऱ्याची आग होऊ शकते. म्हणून अगदी दोन थेंब आपल्याला लिंबूचा रस घ्यायचा आहे. लिंबूच्या रसा मुळे चेहऱ्यावरील डाग पटकन जाण्यासाठी मदत होते. आता शेवट आणि सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे.
तो म्हणजे गुलाब पाणी. गुलाब पाण्यामुळे आपला चेहरा पूर्णपणे साफ होण्यासाठी याची मदत होते शिवाय आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासाठी देखील गुलाब पाण्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स होऊन याची चांगली पेस्ट तयार होईल इतके तुम्हाला गुलाब पाणी घ्यायचे आहे.
आणि हे चारही पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट तुम्ही हात पाय काळसर झालेली मन चेहरा यावर देखील याचा उपयोग करू शकता. ज्या प्रमाणे तुम्ही दिवाळी मध्ये उटणे लावता त्या प्रमाणे याचा वापर करायचा आहे. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावायच्या आधी.
चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि मग पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे. चेहऱ्यावर काळसर डाग किंवा वांग असतील तर गोलाकार आकारात मसाज करायची आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया देखील सुरळीतपणे होते. शिवाय चेहऱ्यावर तेज येते चेहरा तेजस्वी आणि फ्रेश दिसू लागतो.
वांग आणि काळे डाग निघून जाण्यास मदत होते. हे मिश्रण लावल्या नंतर ते वाळू द्यायचे आहे. वाळल्या नंतर हे धुवायच्या आगोदर हाताने घासून काढून घ्यायचे आहे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. वर्क वेळेस केलेल्या उपायाने तुम्हाला लगेच याचा फरक दिसून येईल.
जर हा उपाय तुम्हाला चेहरा मान हात पाय या वर करायचा असेल तर आंघोळी पूर्वी हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा फक्त चेहऱ्यासाठी करायचा असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करून चेहरा गोरा दिसण्यासाठी देखील हा उपाय गुणकारी आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.