10 जून ज्येष्ठ अमावस्या सूर्यग्रहण शनि जयंती नक्की खा ही एक वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही

मित्रांनो 10 जून गुरुवार रोजी शनि जयंती आलेली आहे या दिवशी अनेक दुर्लभ योग जुळून आलेले आहे महालक्ष्मी योग सूर्यग्रहण आणि शनि जयंती ह्या शुभ सहयोगाने या दिवसाचे महत्त्व खूपच वाढले आहे. मित्रांनो शनिदेव ही न्याय देवता आहे आपले कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ आपल्याला शनिदेव देत असतात ज्या व्यक्तींवर शनि देवाची कृपा असेल.

ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न असेल त्याला जीवनामध्ये कुठलीही समस्या येत नाही. मग ती समस्या आर्थिक असो आरोग्यविषयी असो किंवा घरातील सुख शांती संबंधी असो ज्या व्यक्तीवर शनि देवाची कृपा आहे त्याचे जीवनातील सर्व दुःख सर्व संकट दूर होतात तो व्यक्ती रंकाचा ही राजा बनतो. जर आपल्यावर शनिदेवाची अवकृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्यांना सांभाळून जाऊ लागू शकतो.

जर तुमच्या मागे शनी दोष असेल शनीची साडेसाती सुरू असेल तर शनि जयंती चे दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनी दोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला शनिदेवाची मनोभावे पुजा करायची आहे. पूजा करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनि देवांची पूजा करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहू नये.

नजरेस नजर मिळवू नये तर आपली नजर खाली ठेवून शनिदेवांचे पायाजवळ आपली नजर ठेवून आपल्याला पूजा करायची आहे. जर आपण शनिदेवांचे डोळ्यांमध्ये पाहिलं तर त्याचे वाईट प्रभावाने आपण पीडित होऊ शकतो त्यामुळे शनि देवाची पूजा करताना नेहमी आपण त्यांची पायाजवळ नजर ठेवावी.

शनिदेवांना प्रिय असणारे वस्तू जसे की काळे तिल काळे उडीद मोहरीचं तेल या दिवशी आपल्याला अर्पण करायचा आहे तसेच ग्रहण काळ संपल्यानंतर या वस्तूंचे दान देखील केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अशी वस्तू जी आपल्याला सूर्य ग्रहणाचे वेळ सूर्यग्रहणाचे काळामध्ये खायची आहे कुठली आहे हि वस्तू.

मित्रांनो जसे पाहिले तर शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळामध्ये किंवा कुठलीही ग्रहण काळामध्ये कोणते ही वस्तू खाणे वर्जित मानले जाते. पण अशी एक वस्तू आहे जी आपण सूर्यग्रहणाचे काळामध्ये खायची आहे जेणेकरून आपल्याला सूर्यग्रहणाची काळामध्ये जे काही नेगेटिव एनर्जी निर्माण होईल त्यापासून वाचता येईल ग्रहणाचा दुष्प्रभाव आपल्यावर पडणार नाही.

ग्रहण काळामध्ये काही खाणं-पिणं वर्जन मानलं गेला आहे पण एक अशी वस्तू आहे जी आपल्याला ग्रहण काळामध्ये अवश्य सेवन करायचे आहे ती म्हणजे तुळशीचे पान होय मित्रांनो सूर्यग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला तुळशीचे पान सेवन करायचे आहे. ग्रहण काळामध्ये हे तुळशीचे पान खाणं हे खूपच शुभ मानलं जातं ग्रहणाचे वाईट प्रभावापासून आपली रक्षा व्हावी.

यासाठी आपल्याला तुळशीचे एक पान ग्रहण काळामध्ये खायची आहे. ग्रहण काळ सुरु होणार आहे दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी तर हे ग्रहण काळामध्ये केव्हाही तुम्ही हे तुळशीचे पान खाऊ शकता. तसेच ग्रहण काळाचे आधी आपण जे जेवण बनवलेले आहे ते जर शिल्लक राहिले तर त्यामध्ये तुळशीचे एक पान अवश्य ठेवा.

तसेच आपल्या घरात जे पीठ आहे पिण्याचे पाणी आहे यामध्ये देखील एक तुळशीचे पान आपण ग्रहण सुरू होण्यापूर्वीस ठेवायचे आहे. आणि ग्रहण सुरू झाल्यानंतर ते समाप्त होण्या पर्यंतचे काळामध्ये आपल्याला तुळशी चे एक पान सेवन करायचे आहे यामुळे ग्रहणाचा दुष्प्रभाव आपल्या शरीरावर पडणार नाही. मित्रांनो ग्रहण काळामध्ये देवपूजा करू नये देवाला स्पर्श सुद्धा करू नये.

पण तुम्ही जप ध्यान करू शकता देवा चा नामस्मरण करू शकता तर या ग्रहण काळामध्ये आपण आदित्य हृदय स्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा देखील जाप करू शकतात. किंवा तुम्ही तुमचे जे काही इष्टदेवता आहे त्याचा मंत्राचा जाप तुम्ही करू शकतात ग्रहण काळातील हा मंत्र जाप आपल्याला पुण्य फळ देतो त्यामुळे हा ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त जप करावा भगवंताचे नामस्मरण करावे तर मित्रांनो तुम्हीदेखील हे ग्रहणाचे नियम अवश्य पाळा. आणि सूर्यग्रहणाचे काळामध्ये एक तुळशीचे पान अवश्य सेवन करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.