11 मार्च महाशिवरात्री महादेवाला दाखवा हा नैवेद्य जे मागाल ते मिळेल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ

मित्रांनो 11 मार्च गुरुवारच्या दिवशी महाशिवरात्री आहे. महादेवाचा अत्यंत मोठा आणि पवित्र दिवस मानला जातो. म्हणून आपण या दिवशी उपवास करतो जेणेकरून महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतील. त्यांची कृपा आपल्यावर होईल. आणि महादेव आपल्या इच्छा पूर्ण करतील आपल्या अडचणी दूर करतील.

अशी सगळ्यांची इच्छा असते. आपले प्रेम असते आपला विश्वास असतो. म्हणून आपण महादेवांचा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी करत असतो.

परंतु बरेचशे भक्त आहेत. की त्यांना प्रश पडतो की महाशिवरात्री दिवशी आपल्या सगळ्यांचाच उपवास असतो. घरी जेवण तर बनत नाही मग महादेवांना नैवेद्य काय दाखवावा.

सकाळी दाखवावा संध्याकाळी दाखवावा कारण भरपूर लोक दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. मग नैवेद्य काय दाखवावा तर हा महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी मंदिर मध्ये फक्त दिवा लावून सोडू नये. तुमचा उपवास आहे आणि तुम्ही काय नैवेद्य दाखवणार नाही जो तुमच्या साठी फराळ कराल तो ठेवू असा विचार करत असाल.

तर तुम्ही चुकत आहेत महादेवांचा अत्यंत मोठा दिवस आहे. म्हणून महादेवाची भक्ती केली पाहिजे. त्यांना गोड धोड नैवेद्य दाखवावा. त्यांची सेवा केली पाहिजे.

हा दिवस भर तुम्ही ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप केला पाहिजे. त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले पाहिजे.

अशी बरीचशी महत्त्वाचो कामे आहेत जी तुम्ही या दिवशी करू शकता. आपण या दिवशी महादेवाला नैवेद्य जरूर अर्पण करावा. तोही विशेष नैवेद्य असला पाहिजे.

आता तुम्ही नैवेद्य मध्ये काय ठेवू शकता आणि केव्हा ठेवू शकता. तर 11 मार्च महाशिवरात्री च्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यावर अंघोळ आवरून झाल्यावर.

तुमच्या घरातील देवघरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. प्रत्येक घरात शिवलिंग हे असतेच किंवा शिवलिंगाची प्रतिमा तर असतेच.
त्या सोबतच वाटी मध्ये थोडेसे दूध घ्या त्यामध्ये थोडी साखर टाकून तो नैवेद्य महादेवाला अर्पण करा. तर महादेवाला दूध अत्यंत प्रिय असते.

तुम्ही दूध ठेवल्यावर तुमचा सकाळचा नैवेद्य झाला.आता दुपारच्या नैवेद्य साठी तुम्ही काय ठेवाल तर दुपारी तुम्ही मिठाई आणू शकता.

जी मिठाई पांढऱ्या रंगाची आहे ती आणायची आहे पांढरे पेढे असतील किंवा काजू कतली असेल. ती तुम्ही आणि शकता मार्केट मधून मिठाई आणणे शक्य नसेल.तर तुम्ही घरी पंचामृत बनवू शकता. तो नैवेद्य सुद्धा तुम्ही महादेवाला दाखवू शकता. त्या सोबतच दुपारी तुम्ही जे फराळ केला असाल ते देखील दाखवू शकता.

जर तुम्ही फालतू फळ खाणार असाल तर तुम्ही फळे सुद्धा दाखवू शकता. रात्री कोणता नैवेद्य दाखवावा तुम्ही जो फराळ म्हणून केला असेल तो फराळ दाखवू शकता.

त्या सोबत काही गोड केले असेल तर गोड दाखवू शकता. मिठाई असेल तर मिठाई दाखवू शकता. आणि जर काहीच केले नसेल तर तुम्ही पुन्हा दूध आणि साखर दाखवू शकता.

कारण दूध महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुम्हाला खीर करायला जमत असेल तर खीर करावी पंचामृत जमत असेल तर पंचामृत करावे.

पंधरा रंग हा महादेवाला खूप प्रिय असतो. तुम्ही प्रयत्न करा की जो तुम्ही पदार्थ द्याल तो पांढऱ्या रंगाचे असावा. पांढरी मिठाई दूध खीर पंचामृत दाखवावे.तर असा नैवेद्य तुम्ही 11 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी दाखवू शकता. आणि 12 मार्च ला तुम्ही जे उपवास सोडायला केले असेल तेच तुम्ही महादेवाला दाखवू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.