13 एप्रिल चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिशेला उभारा गुढी वर्षभर मिळेल पैसाच पैसा

भारतीय पंचांगा नुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. गुढी उभारून नवीन वर्षची स्वागत करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृती मध्ये चालत आलेली आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.

या महापर्वाच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुडीपाडवा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. त्याच बरोबर या चैत्र पदेपासून चैत्र नवरात्रीस सुरवात होते.

आणि हे चैत्र नवरात्र चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चालते. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असल्यामुळे गुढीपाडवा पूजनाचा विशेष असा मुहूर्त नसतो सूर्योदया पासूनच आपण गुढी उभारून गुढी पूजन करू शकतो. यादिवशी पहाटे सूर्योदया पूर्वी उठावे अंगाला सुगंधी उटणे तेल लावावे.

आणि अभ्यंग स्नान करावे. तुमच्या घराचे जे मुख्य द्वार आहे त्याठिकाणी झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. त्या नंतर एका वेळूच्या काठीला तेल लावून ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि एका टोकाला साडी किंवा केसरी रंगाचे वस्त्र बांधून त्यावर कलश ठेवावा या कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावेत.

स्वस्तिक काढावेत आणि फुलांची माळ लावावी आणि त्यानंतर या काठीला आंब्याची डहाळी कडुलिंबाचा पाला आणि बत्ताश्याची माळ बांधावी. आपण घरामध्ये उभे असताना आपल्या उजव्या बाजूला दिसेल अश्या पध्दतीने आपल्याला गुढी उभा करायची आहे. बऱ्याचदा आपण चुकीच्या पद्धतीने गुडी उभारत असतो.

शहराच्या ठिकाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारा वर आपण गुढी उभारू शकत नाही. त्यामुळे हॉल किंवा बेडरूमच्या खिडक्यातून गुढी उभारतात. तर मित्रानो तुम्ही गुढी अश्या प्रकारे उभारा की तुम्ही घरात उभे राहिल्या नंतर म्हणजे घरातून पहात असताना तुमच्या उजव्या बाजूला गुडी दिसेल अश्या प्रकारे तुम्ही गुडी उभारायची आहे.

म्हणजेच आपल्या घरातून आपल्या उजव्या बाजूला गुढी दिसायला हवी त्याचबरोबर गुढीची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. गुढीला हळद कुंकू लावून धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे ॐ ब्रम्हद्वजाय नमः.

हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे. आणि गुढीला नमस्कार करायचा आहे. तर अश्या प्रकारे तुम्हाला गुढीचे पूजन करायचे आहे. आणि सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी आपल्याला गुढी उतरवायची आहे. गुढी खाली घ्यायची आहे हे वेळ लक्षात घ्या सूर्यास्ता नंतर गुढी आजिबात उभी करायची नाही.

त्याच्या आधीच आपल्याला गुढी काढून घ्यायची आहे. मित्रानो या सर्व परंपरा मागे खूप मोठे अध्यात्म कारण आहे. ते म्हणजे की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रजतम गुण कमी होतात आणि सदवगुण वाढतात. त्याच बरोबर गुढी पाडव्याला ब्रम्हांडातील प्रजापती लहरी जास्तीजास्त पृथ्वी वरती पाठवल्या जातात.

आणि याच लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करत असते. गुढीवरती आपण जो तांब्याचा कलश ठेवला आहे हा तांब्याचा धातू जो आहे तो या प्रजापती लहरींना आकर्षित करून घेतो आणि या तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी आपल्या घरात प्रवेश करतात. आणि या लहरी मुळे आपले वर्षभर आरोग्य मिळते.

मित्रांनो गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला आणि गूळ याचा गुढीला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य प्रसाद रुपात आपण ग्रहण करतो यामागील कारण म्हणजे कडुलिंब हा जंतू नाशक आहे. गुढीवरती हा कडुलिंबाचा पाला लावल्यामुळे आपल्या घरात येणारे जे रोग जंतू आहेत. ते आपल्या घरात प्रवेश करत नाही.

तसेच कडुलिंब खाल्याने कफ ताप उष्णता आणि पित्त यासारख्या रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच आपली पचन क्रिया सुधारते. तर अश्या प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीत जे काही आपले सण साजरे करतो त्यांना अध्यात्मिक कारणा सोबतच आपल्याला निरोगी जीवन जगता यावे असे देखील उपाय सांगितले गेले आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.