13 एप्रिल नवीन वर्ष गुढीपाडवा चैत्र नवरात्र कुलदेवतेची अशी भरा ओटी सर्व इच्छा होतील पूर्ण

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ


13 एप्रिल हा दिवस खूप मोठा मानला जाईल कारण या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी गुढीपाडवा आहे याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे. म्हणजे देवीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस.

हे नऊ दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसा पासून हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे कारण ही नवरात्र खूप लाभदायक असते. मित्रांनो तुम्हाला या वेळेस म्हणजे 13 एप्रिल ला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्र च्या पहिल्या दिवशी.

मातेची ओटी भरायची आहे. मग माता तुमची कुल देवी असेल किंवा घरात लक्ष्मी माता असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल त्या देवीची ओटी भरावी. ज्या देवीला तुम्ही मानतात ज्या देवीची कृपा तुमच्यावर आहे. त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता.

प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते लक्ष्मीची ओटी भरू शकता. अन्नपूर्णा असते तुम्ही अन्नपूर्णेची ओटी भरू शकता. तुम्हाला फक्त ओटी भरायची आहे. ओटी फक्त महिलांनी भरायची आहे. फक्त विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे. तर मित्रानो विवाहित महिलांनी ही ओटी कशी भरावी.

तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागतील. त्यातली पाहिली गोष्ट म्हणजे नारळ लागेल. त्यासोबत आकरा रुपये दक्षिणा लागतील. एक साडी किंवा ब्लॉउज पीस आणि थोडे तांदूळ आता तुम्हाला देवघरात त्याही देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे. त्या देवीच्या पायाजवळ तुम्हाला ती साडी ठेवून द्यायची आहे.

त्यांनतर त्या साडीवर तुम्ही घेतलेला नारळ ठेवावा. त्यावर नारळ ठेवायचा नाही तसाच ठेवून द्यायचा आहे. त्यासोबतच आकरा रुपये ठेवायचे आहे. आणि त्यावर सात वेळेस आकरा वेळेस तांदूळ टाकायचे आहे. जसे आपण इतर महिलांची ओटी भरतात तशी ओटी ती भरतात.

अश्या रीतीने तुम्ही ती ओटी भरू शकता. आता ओटी भरल्या नंतर 13 तारखेला ती ओटी देवघरात राहू द्यायची आहे. आणि चौदा तारखेला ती ओटी तिथून उचलून घ्यायची आहे. आता ओटीतली साडी असेल किंवा ब्लॉउज पीस असेल.

आता ज्या महिलांनी ती ओटी भरली असेल त्यांनी ती वापरू शकतात. आकरा रुपये हे तुम्ही तुमच्या जवळ जपून ठेवू शकता. बरकत म्हणून देवीचा आशीर्वाद म्हणून आणि गहू किंवा तांदूळ तुम्ही ओटी मध्ये टाकले असता. ते तुमच्या घरातील धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत.

आणि जो नारळ असेल तो फोडून देवीचा आशीर्वाद म्हणून खायचा आहे. तर अश्या सोप्या रीतीने तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी अवश्य भरावी कारण चैत्र नवरात्र खूप मोठी मानली जाते. आणि यापुढे तुम्हाला कधीच कोणत्याही कामात समस्या येणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.