2 रुपयाची वस्तू पांढरे केस काळे करा न वाढणारे केस वाढतील

आज मी आपल्यासाठी केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील. जसे केस अकाली पांढरे होणे. केसांची वाढ एक लेवल परेंत येऊन थांबून जाणे आणि पुढे वाढ न होणे. फंगल इन्फेक्शन होणे वा होणे कोंडा होणे किंवा केसांची चमक पूर्णपणेे निघून जाऊन केस निस्तेज आणि रखरखीत होणे या सारख्या समस्यांवर घरच्याघरी अगदी साध्यासोप्या पद्धतीने सर्वांना करता येणारा असा उपाय घेऊन आले आहे.

तर यासाठी आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर हा पल्या केसांकरिता खूप उपयुक्य आहे तसेच आरोग्या करिता देखील हा खूप उपयुक्त आहे. प्रथम आपण भीमसेनी कापूरची पावडर तयार करून घ्यायची आहे. आपण येथे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहे. एक पत्रामध्ये पाणी गरम करायला ठेवा आणि डबल बॉईल पद्धतीने तेल गरम करून घ्यायचे आहे.

येथे अर्धी वाटी भरून खोबरेल तेल घ्यायचे आहे व तेल थोडे गरम होत आले की यामध्ये जी भीमसेनी पावडर केली आहे आपण ती भीमसेनी कापुरची पावडर ती टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्या आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबूमुळे देखील केसांचे आरोग्य टिकते. केसांचा जो कलर आहे तो देखील काळा भुर राहण्यास यामुळे मदत होते.

आणि हे छान एकजीव होईल तोपरेंत हे गरम करून घ्यायचे आहे. याला डायरेक्ट गॅस वर गरम करायचे नाही. तर ज्या प्रमाणे मी सांगितले आहे त्या प्रमाणे डबल बॉईल पद्धतीनेच हे करायचे आहे. यामुळे यातील जे जीवनसत्व असतात. हे यामध्येच उतरतात आणि ते आपल्या केसांवर खूप फायदेशीर ठरते. यासाठी खोबरेल तेल किंवा जे तेल तुम्ही केसांसाठी वापरत असाल त्या तेलाचा वपर देखील करू शकतात.

किंवा थोडे तिळाचे तेल आणि मोहरीचे म्हणजेच राईचे तेल देखील थोडेसे यामध्ये टाकले तरी देखील चालेल आणि जर केस गळत असतील जास्तच केस गळण्याच्या समस्या असतील तर यामध्ये एक चमचा भरून एरेंडेल तेल टाकून द्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून बॉईल करून घ्या. किमान 5 मिनिटे तरी हे छान तयार करून घ्यायचे आहे.

5 मिनिटांनंतर हे काढून घ्यायचे आहे. हे तयार झालेले तेल रात्री झोपताना केसांना लावून घ्यायचे आहे. याने छान मसाज करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जे प्रॉडक्ट्स वापरता त्या प्रॉडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असे जर तुम्ही केले तर यामुळे केसांच्या सर्व समस्या अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होते.

आणि हे तुम्ही एका बॉटल मध्ये देखील भरून ठेवू शकता आणि वेळोवेळी याचा वापर करू शकता. आठवड्यातून किमान 3 वेळेस जरी हा उपाय केलात तरी देखील केसांच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होते आणि जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल लावायला जमत नसेल तर सकाळी अंघोळी आधी जरी तुम्ही मालिश केली तरी चालेल.


आणि दिड ते दोन तासानंतर धुतले तरी देखील चालेल. परंतु केस धुवताना कोमट पाण्याचा वापर करा जास्त कडक पाण्याने केस धुवू नये. कारण त्यामुळे केस गळताय तुटतात कमजोर होतात. मित्रमैत्रिणींनो आहे की नाही साधासोपा आणि घरगुती न्याचरल उपाय.

Leave a Reply

Your email address will not be published.