2021 श्रावण महिना कधी सुरू होईल कधी संपेल श्रावण सोमवार 2021

आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्याचा प्रारंभ कधीपासून होणार आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती कधी होणार आहे उत्तर व दक्षिण भारतात महिन्याची सुरुवात 15 दिवसांच्या अंतराने होते उत्तर भारतात महिन्याची सुरुवात ही पौर्णिमेनंतर म्हणजेच कृष्ण पक्षापासून होते तर दक्षिण भारतात महिन्यांची सुरुवात अमावस्येनंतर म्हणजेच शुक्ल पक्षापासून होते

म्हणून उत्तर भारतात पंधरा दिवस आधीपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात होते तर दक्षिण भारतात पंधरा दिवसांनी श्रावण महिन्याचा आरंभ होतो उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड छत्तीसगड बिहार आणि झारखंड यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात कधी होणार आहे

तसेच दक्षिण भारतात म्हणजेच आंध्र प्रदेश तेलंगणा गोवा महाराष्ट्र गुजरात अरुणाचल आणि तामिळनाडूमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात कधी पासून होणार आहे तसेच श्रावण महिन्यात उत्तर भारतात किती सोमवार येणार आहेत आणि दक्षिण भारतात किती श्रावण सोमवार येणार आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत आवडता महिना हा महिना महादेवांना समर्पित केला आहे

देवा दी देव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात विविध उपाय व उपासना केली जाते महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात विविध प्रकारची व्रते केली जातात श्रावण महिन्यात सोमवार चे जास्त विशेष महत्त्व असते कारण सोमवार हा महादेवाचा प्रिय वार आहे श्रावण महिन्यातील सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो तिसऱ्या श्रावणी सोमवार चे जास्त महत्त्व असते

बहुतेक व्यक्ती श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून सोळा सोमवारच्या व्रताचा ही आरंभ करतात श्रावण महिन्यातील मंगळवार हे दिवस महादेवांची अर्धांगिनी म्हणजेच देवी पार्वतीला समर्पित केलेले आहेत श्रावण महिन्यात मंगळवारचे व्रत हे मंगळागौरी चे व्रत म्हणून केले जाते श्रावण महिन्यातच नागपंचमी गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे केले जातात

उत्तर भारताचा श्रावण महिन्याची सुरुवात रविवारी 25 जुलैला होणार असून याची समाप्ती रविवारी 22 ऑगस्टला होणार आहे उत्तर भागात 2021 साली एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत त्यातील पहिला श्रावणी सोमवार हा 26 जुलैला असणार आहे 2 ऑगस्टला दुसरा 9 ऑगस्टला तिसरा आणि 16 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे दक्षिण भारतात श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी 9 ऑगस्टला होणार

असून समाप्ती 7 सप्टेंबरला होणार आहे दक्षिण भारतात एकूण पाच श्रावणी सोमवार येणार असून पहिला श्रावणी सोमवार 9 ऑगस्टला असणार आहे 16 ऑगस्टला दुसरा 23 ऑगस्टला तिसरा 30 ऑगस्टला चौथा तर सहा सप्टेंबरला पाचवा श्रावणी सोमवार असणार आहे अशाप्रकारे दक्षिण भारतात पाच श्रावणी सोमवार साजरे केले जातील

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.