30 एप्रिल संकष्टी चतुर्थी येथे काढा स्वस्तिक श्री गणेशांच्या कृपेने होईल धनलाभ सुख समृद्धीने भरेल

मित्रांनो 30 एप्रिल शुक्रवार रोजी संकष्ट चतुर्थी अलेली आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनिय आहेत कुठलेही शुभ कार्य करताना आपण सर्वात आधी श्री गणेशांची पूजा करतो. यामुळे आपले कार्य सिद्धीस जाते. म्हणजेच आपल्याला त्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होते. श्री गणेशांच्या केवळ नावाने चैतन्य उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार आपल्या मनात शरीरात आणि वातावरणात होतो.

श्री गणेश हे बुद्धिदाता आहेत गणांचा अधिपती सुख करता दुःखहराता विघ्नहर्ता अशा किती तरी नावानी श्री गणेशांना संबोधले जाते. मित्रांनो 30 एप्रिल रोजी आलेली ही संकष्टी विकट संकष्टी म्हणून ओळखली जाते. या डीशी श्री गणेशांच्या विकट रूपाचे पूजन केले जाते. श्री गणेशांच्या संकट नाशन स्तोत्रामध्ये या नावाचा उल्लेख केलेला आहे.

पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्णते यामध्ये श्री गणेशांच्या विकट नावाचा उल्लेख केलेला आहे आणियाच रूपाचे पूजन विकट संकष्टीला केले जाते. मित्रांनो जर तुम्हाला जीवनामध्ये सफलता प्राप्त करायची असेल खूप धन मिळवायचे असेल तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीचे वरत अवश्य केले पाहिजे.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानाधीने निवृत्त झाल्या नंतर श्री गणेशाची पूजा आराधना करावी त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण कराव्यात धुपदीप दाखवावा आणि श्री गणेशांना प्रिय असणारे जास्वानंदाचे फुल अर्पण करावे. जर तुम्हाला जास्वानंदाचे फुल अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठलेही लला रंगाचे फुल श्री गणेशांना करा.

तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि पूजा झाल्या नंतर श्री गणेशांना मोदकांचा नैवेद्य दाखवा. तुम्ही 11, 21 कितीही मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता आणि हा नैवेद्य दाखवून झाल्या नंतर तो आपल्या परिवारासहीत आपण स्वतः देखील ग्रहण करायचा आहे. मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 1 विशेष उपाय आपल्याला करायचा आहे.

तो उपाय आपण पाहणार आहोतच. मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही छोटेछोटे आणि सोपी उपाय करून श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये धन संबंधी कुठलीही समस्या राहणार नाही. घरामध्ये पैसा खेळत राहील आर्थिक अडचणी दूर होतील.

जर एखाद्या कार्यामध्ये तुम्हाला काही अडथळे येत असतील तर ते अडथळे देखील दूर होतील. तुमचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल. मित्रांनो एक गोष्ट आवर्जुन लक्षात ठेवा श्री गणेशांच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही. तुळशीची पणे श्री गणेशांना अर्पण करू नयेत. त्याचबरोबर श्री गणेशांच्या पाठीचे दर्शन आपण घेऊ नये.

शास्त्रानुसार श्री गणेशांच्या पाठीमध्ये दरिद्रता वास करते त्यामुळे श्री गणेशांच्या पाठीचे दर्शन आपण घेऊ नये. जेणे करून आपल्या जीवनात दरिद्रता येणार नाही. मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला विड्याच पान घ्यायच आहे.

आणि या विड्याच्या पानावर आपल्याला कुंकवाच्या सहायाने स्वस्तिक काढून हे पण आपल्याला श्री गणेशांना अर्पण करायचे आहे. विद्ड्याचे पान घेताना ते अखंड असावे तुटलेले नसावे आणि त्याचा देठ देखील अखंड असावा. याची काळजी आपण अवश्य घ्या. असे एक अखंड विड्याचे पान आपल्याला घ्यायचे आहे.

त्यावर कुंकवामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि हे पान श्री गणेशांची पूजा आराधना झाल्या नंतर नैवेद्य दाखवल्या नंतर आपल्याला श्री गणेशांच्या चरणामध्ये अर्पण करायचे आहे अणि श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे. की माझ्या ज्याकही आर्थिक समस्या आहेत पैश्या संबंधी ज्याकही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात.

घरात सुख समृद्धी आणि शांती असावी. श्री गणेशांना नमस्कार करून अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने आपण हा उपाय करायचा आहे. या उपायांच्या प्रभावाने तुमच्या ज्याकही आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि ही पूजा झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच आहे.

हा उपाय केल्यामुळे काही दिवसांमध्येच तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील तुमच्या पैश्यां संबंधी ज्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येऊ लागेल. मित्रांनो जर तुमच्याही काही आर्थिक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.