31 मार्च बुधवार संकष्टी चतुर्थी महासंयोग बाप्पांना अर्पण करा हा नैवेद्य सर्व इच्छा होतील पूर्ण

मित्रांनो बुधवारी 31 मार्च रोजा संकष्टी चतुर्थी आलेली आहे. संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा महासंयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे आपण या दिवशी काही विशेष उपाय केले. तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येईल. आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील.

संकष्टी चतुर्थीला केला जाणार असाच एक खास उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आपण कार्याचा श्री गणेशा असे म्हणतो कारण गणपती बाप्पा सर्व देवी देवतांन मध्ये प्रथम पूजनीय मानले जातात. गणपती बाप्पा शक्ती बुद्धी आणि विवेकाचे प्रतीक आहेत.

आपल्या भक्ताचे सर्व विघ्न हरण करण्याचे काम गणपती बाप्पा करतात. म्हणूनच गणपती बाप्पाला विग्नहर्ता असे देखील म्हटले जाते. जर तुमच्या जीवना मध्ये काही संकटे असतील काही समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने त्याच बरोबर काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात.

संकष्टी चा अर्थच संकट हरणारी असा होतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून व्रताचा संकल्प घ्यावा आणि पूजा करावी आपल्या जीवना मध्ये प्रगती व्हावी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला सफलता प्राप्त व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य करा.

मित्रानो बऱ्याचदा असे होते की आपण खूप मेहनत करतो पण त्याचे योग्य फळ आपल्याला मिळत नाही. जीवनात सतत पैशांची सतत तणतण भासते. आणि यामुळेच आपल्या सर्वच मनोकामना अपूर्ण राहतात. म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहेत. त्या पूर्ण होत नाहीत. मग त्या धना च्य कमतरतेमुळे असो किंवा आपल्या कार्या मध्ये येणाऱ्या अडथळ्यांन मुळे असो.

कुठल्याही प्रकाराने आवल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत अपूर्ण राहतात तर अश्या ज्या आपल्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीला एक उपाय करायचा आहे. श्री गनेशांची विधिवत पूजा करून त्यांना आवडत्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत.

श्री गणेश याना दुर्वा अर्पण करायच्या आहेत चंदनाने तिलक करायचा आहे आणि आणि बाप्पांना प्रिय असे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. आणि तुम्हाला माहीतच असेल की बाप्पांना जास्वंदी चे फुल किती प्रिय आहे ते तर हे फुल देखील संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पांना अर्पण करायचे आहे. आणि हे सर्व झाल्या नंतर आपल्याला बाप्पांना समोर हात जोडून एक मंत्र म्हणायचा आहे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
हा मंत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे तर या मंत्राचा जाप तुम्हाला आकरा वेळा मनोभावे करायचा आहे. बाप्पांना समोर हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कार्यात जे काही अडथळे येत आहेत.

माझ्या प्रगती मध्ये जे काही अडथळे येत आहेत. ते दूर व्हावेत आणि मला जीवनामध्ये सफलता प्राप्त व्हावी यासाठी हात जोडून बाप्पांनाची मनोभावे प्रार्थना करायची आहे. काही दिवसातच तुमच्या कार्यात जे काही अडथळे आहेत ते दूर होतील बाप्पांनच्या आशीर्वादाणे तुमची कार्ये मार्गी लागतील.

पैशा संबंधित काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील. तर तुमच्याही जीवना मध्ये अश्या लाही अडचणी असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा सोप्पा उपाय अवश्य करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.