7/8 ऑगस्ट मोठी अमावस्या घराच्या या कोपऱ्यात लावा एक दिव्य दिवा पैसा वाढतच जाईल

सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट या दोन्ही दिवशी यावर्षीची आषाढी अमावस्या आली आहे आषाढी अमावस्या सात ऑगस्टच्या रात्री 07:11 मिनिटांनी प्रारंभ होणार असून तिची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्टला रात्री 7:19 मिनिटांनी होईल आज आपण आषाढी अमावस्येला करायचे काही उपाय किंवा टोटके जाणून घेणार आहोत जे तुम्ही सात ऑगस्ट किंवा आठ ऑगस्ट या दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी करू शकता

हिंदू धर्मशास्त्रात आषाढी अमावस्याचे महत्व हे आपल्या पितरांना शांती लाभावी आपल्या घरातून पितृदोष दूर व्हावेत यासाठी आहे आपले पित्र म्हणजे आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असेल अशा लोकांच्या आत्म्यास शांती लाभावी जर पित्र प्रसन्न असतील तर त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण आपली प्रगती उन्नती करू शकतो आपल्या वास्तूची घराची प्रगती होऊ शकते

तर आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची तिथी आहे ती म्हणजे आषाढी अमावस्या सोबतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय किंवा टोटके या आषाढी अमावस्येला केले जातात या आषाढी अमावस्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोणतीही अमावस्या असो आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण भगवतगीतेचा पाठ अवश्य करा

भगवतगीतेतील कोणताही अध्याय या दिवशी वाचन करावा त्यामुळे पित्र प्रसन्न होतात आपल्या घरात बरकत व उन्नती घडून येते ज्यांच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत बाधा आहेत त्यांनी आषाढी अमावस्येस कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा व त्या आसपासच्या जलाशयात माशांना खाऊ घाला या सर्व गोळ्या बनवत असताना व त्या खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे

सोबतच धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा कर्ज फिटण्यासाठी आषाढी अमावस्येला ज्या काळ्या मुंग्या असतात त्या मुंग्यांना घरातील गव्हाचे पीठ व त्यामध्ये थोडीशी बारीक केलेली साखर मिक्स करून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात आर्थिक परिस्थिती सुधारू लागते कर्जमुक्ती सुद्धा होते

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे अशा लोकांनी आषाढी अमावस्येच्या दिवशी चांदीचे नाग नागिन बनवून घ्या आणि या नाग नागिनीच्या जोड्याची एकाद्या पवीत्र नदीच्या किनारी पूजा करा व नंतर त्यांना आत्या नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या यामुळे कालसर्प दोषातून निश्चित मुक्ती मिळते आपले पित्र कधी कधी आपल्यावर नाराज होतात आपल्या हातून काही चुका घडत असतात

यामुळे पितृदोष लागतो या पितृदोषामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते घरात अशांती वावरु लागते अशावेळी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गीतेचा पाठ आवश्य करा सोबतच शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाचे रोपण नक्की करा आता प्रश्न पडला असेल की पिंपळाचे झाड नक्की कुठे लावावे तर लक्षात ठेवा कि पिंपळाचे किंवा वडाचे झाड हे घराच्या आजूबाजूला कधीही लावू नये

यामुळे आपल्या घरावर खूप अडचणी व बाधा निर्माण होतात आपल्या घरापासून दूर कुठेही हे पिंपळाचे झाड तुम्ही लावू शकता तुम्ही जर याची काळजी घेतली तर तुमचे पित्र तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आषाढी अमावस्येला आपल्या घराच्या आजूबाजूला जे गरजू लोक असतील अशा लोकांना अन्नदान करायला विसरू नका आपण प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा उपाय करा

गरिबांना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा व जमत असेल तर थोडेफार पैसे ही द्या यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतील हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे या आषाढी अमावस्येला करायचा हा उपाय म्हणजे दिव्याचा उपाय आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा हे ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान असणारी दिशा ही दिशा साफ सुंदर व स्वच्छ करून घ्या

त्यानंतर या कोपऱ्यांमध्ये एक पाट ठेवायचा आहे पाठावर ती एक वस्त्र अंथरायचे करायचे आहे त्यावर एक मूठ भरून अख्खे तांदूळ घालायचे आहेत हे तांदूळ म्हणजे आपल्या दिव्याचे आसन असेल या तांदळावरती एक दिवा ठेवायचा आहे या दिव्यांमध्ये गायीचे तूप किंवा कोणतेही तेल घालायचे आहे आपल्या हातात आपण जो लाल किंवा पिवळा धागा बांधतो ज्याला कलावा असे म्हणतात

हा असेल तर अति उत्तम जर नसेल तर पांढऱ्या रंगाचा कापूस घेऊन त्याला केशराने किंवा कुंकवाने लाल रंग प्रदान करू शकता हा लाल धागा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याची वात ईशान्य दिशेला असेल याची काळजी घ्यायची आहे ईशान्य दिशा म्हणजे सर्व देवी-देवतांची दिशा मानली जाते अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एखाद्या आसन अंथरून आपण त्यावर बसून देवी लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा मनोभावे जप करायचा आहे

अगदी कितीही वेळा जप केला तरी चालेल जेवढा जास्त जप कराल तेवढा जास्त पैसा वैभव आपल्या जीवनात निर्माण होईल ओम श्रीम नमह या बीज मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता ओम श्रीम श्रीम नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल जप करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपण आपल्या जीवनात धन पैसा वैभव ऐश्वर्य निर्माण व्हावे यासाठी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करायची आहे

हा दिवा जर मध्येच विजला तर काळजी करू नका तुम्ही हा परत प्रज्वलित करू शकता मनात कोणत्याही प्रकारचा किंतु-परंतु न आणता हा उपाय पूर्ण श्रद्धेने व भक्तीने करायचा आहे सकाळी उठल्यानंतर हा दिवा घासून पुसून स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे व दिव्या खालचे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घातले तरी चालेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.