आज शनी अमावास्येस राशीनुसार करण्यात येणारे उपाय वाचा सविस्तर

मेष रास-शनी अमावास्येस स्नान केल्यावर सव्वा किलो बाजरी मातीच्या भांड्यात भरून त्यावर मोहरीच्या (राईच्या) तेलाचा दिवा प्रज्वलीत करावा. त्या नंतर शनीचा तंत्रोक्त मंत्र “ऊं प्रां प्रीं प्रौं स: शनयै नम:” ह्याचा पाच माळा जप करावा. एखाद्या गरजवंतास हि बाजरी दान करावी.

वृषभ रास-शनी अमावास्येस वड किंवा पिंपळाच्या झाडाखाली सूर्योदयापूर्वी मोहरीच्या (राईच्या) तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. पाणी व दूध एकत्र करून ते झाडाच्या मुळांना घालावे. मग तेथील मातीचा टिळा लावावा.

मिथुन रास-शनी अमावास्येस सव्वा किलो आख्खे मूग हिरव्या कपड्यात गुंडाळून एका भांड्यात ठेवावे. त्यावर मोहरीच्या (राईच्या) तेलाचा दिवा प्रज्वलित करून शनी मंत्राचा जप करावा. कोणत्याही गणपती किंवा शनी मंदिरात जाऊन ह्या वस्तू दान कराव्या. शनी अमावास्येस आपल्या वजना एवढ्या वजनाचे अन्न दान केल्याने अनेक प्रकारचे त्रास दूर होतात.

कर्क रास-शनी अमावास्येस मातीच्या भांड्यात सव्वा किलो तांदूळ ठेवून मोहरीच्या (राईच्या) तेलाचा चौमुखी दिवा प्रज्वलित करून नंतर त्याचे दान करावे. ह्या दरम्यान शनी मंत्राचा जप अवश्य करावा.

सिंह रास-शनी अमावास्येस शनी मंदिराच्या बाहेरील कुष्ठ रोग्यांना किंवा गरिबांना पैश्यांचे दान करावे. शनी मंत्राच्या जपासह सव्वा किलो गहू व वस्त्र दान केल्याने सुद्धा शनी पीडा दूर होते. शनी अमावास्येसच गौशाळेत मोहरी (राई) चे दान करावे.

कन्या रास-शनी अमावास्येस शनीशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे. ह्या वस्तूत काळे चणे, काळी उडद, काळे कपडे किंवा कांबळे ह्यांचा समावेश आहे. शनी देवांचे प्रतीक म्हणून किन्नरास दक्षिणा सहित दान करून त्यांचे चरणस्पर्श करावे. शनी अमावास्येस केळी, गूळ व देशी चणे गरिबास द्यावेत.

तूळ रास-शनी अमावास्येस सव्वा किलो जव दान करावे. श्रीशनिदेवांचे ध्यान करून पंचोपचार पूजा करावी. त्या नंतर शुद्ध आसनावर बसून “ऊँ शं शनैश्चराय नम:” मंत्राच्या सात माळा जप करावा. शनी अमावास्येस श्रदधानुसार किंवा आपल्या वजना एवढे गहू मंदिरात दान करावेत.

वृश्चिक रास -शनी अमावास्येस आख्खे मसूर किंवा काळे तीळ दान करावेत. दान करण्यापूर्वी कोणत्याही शनी मंत्राच्या पाच माळा जप करावा. जप केल्यावर आख्खे मसूर, भांडे व वस्त्र एखाद्या सफाई कर्मचाऱ्यास दक्षिणे सहित दान करून त्याचे चरणस्पर्श करावे.

धनु रास-शनी अमावास्येस सूर्योदयापूर्वी उठून, स्नानादी कर्मे उरकून पाच किलो चणा डाळ सव्वा पाच मीटर स्वच्छ पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावे. श्रीशनिदेवांचे ध्यान करून त्यांचे पूजन करावे. मोहरीच्या (राईच्या) तेलाचा चौमुखी दीपक प्रज्वलित करून आसनावर बसून पाच माळा जप करावा.

मकर रास-मकरेचा स्वामी शनी आहे. शनी अमावास्येस शनीसाठी एक वेळ उपास करावा. शनी व्रताची कहाणी वाचावी. निळ्या किंवा काळ्या कपड्यांचे गरीब किंवा सफाई कामगारास दान करावे. गरिबांना दही वडा किंवा उडदाचे लाडू इत्यादींचे दान करावे.

कुंभ रास-शनी अमावास्येस श्रद्धेनुसार सफाई कर्मचाऱ्यास दान करावे. शनी मंदिरात सव्वा किलो मोहरीचे (राईचे) तेल सुद्धा दान करावे. शनी अमावास्येस सात सुके नारळ व ७०० ग्राम बदाम श्रद्धेनुसार एखाद्या मंदिरात दान करावेत.

मीन रास-शनी अमावास्येस श्रीशनिदेवांचे ध्यान करून पूजन करावे. मोहरीच्या (राईच्या) तेलाचा चौमुखी दिवा प्रज्वलित करावा. मंत्र जपा नंतर एखाद्या मंदिरात श्रद्धेनुसार दक्षिणे सहित दान करावे. त्या नंतर श्रद्धेनुसार किंवा आपल्या वजना एवढे कोणतेही धान्य गरिबास द्यावे.
वरील पैकी कोणतेही दान करण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.