या 5 गोष्टींचा समावेश करा तुमच्या डाएटमध्ये झटक्यात होईल वज नकमी

सुटलेले पोट सौंदर्यामध्ये नेहमीच बाधा आणत असते. इथे काही पदार्थ आहे ज्याचा तुम्ही डाएटमध्ये समावेश केल्यास तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता.

वज न कमी करण्यासाठी योग्य डाएट महत्त्वाचे असते. हेल्दी खाणे खाल्ल्याने तुम्ही वज न नियंत्रणात ठेवू शकता. दररोज नियमित व्यायमही शरीरास तितकाच गरजेचा आहे.

प्रत्येकाला वाटते की आपली फिगर परफेक्ट असावी. मात्र अनेकदा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तसेच अयोग्य खाण्यामुळे पोट सुटते. सुटलेले पोट हे आपल्या सौंदर्यामध्ये नेहमीच अडथळा आणते. त्यामुळे तुम्हीही जर पोट कमी कऱण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचे योग्य डाएट असणे गरजेचे आहे. तुमच्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. दरम्यान, सुटलेले पोट काही एका दिवसांत कमी होणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे संयमही असायला हवा. त्यामुळे तुम्ही जितक्या संयमाने हे कराल. योग्य डाएट, पुरेसे पाणी आणि नीट व्यायाम दररोज केलात तर तुमचे सुटलेले पोट कमी होऊ शकते.

तसेच असे काही पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास पोटावरची चरबी कमी करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्येही आवश्यक असे बदल करणे गरजेचे असते. पुरेशी झोप, तणावापासून दूर राहणे, सतत पाणी पिणे या सवयी तुम्ही स्वत:ला लावून घेतल्या पाहिजेत. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करून फ्लॅट टमी मिळवू शकता.

या पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये करा समावेश

मोसंबी – व जन कमी करण्यात मोसंबी फळाचा वापर होऊ शकतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतातज्यामुळे हृदयासंबंधित आजार तसेच स्ट्रोकचा धोका कमी होतो. मोसंबी खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते तसेच यात कॅलरीजही कमी असतात. ज्यामुळे वज न कमी करण्यास फायदा होतो. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. दरम्यान, तुमच्या वेट लॉसच्या डाएटमध्ये मोसंबीचा समावेश करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

सफरचंद – An Apple a day keep a doctor away. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरास अनेक लाभ होतात. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यांचे वज न अति प्रमाणात वाढलेले आहे त्यांनी आपल्या डाएटमध्ये जरूर सफरचंदाचा समावेश करावा. सफरचंदामध्ये पॉलिफेनॉल्स असते जे चयापचय क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारते.

बीन्स – बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात ज्यामुळे मेटा बॉलिजम वाढण्यास मदत होते तसेच कॅलरीजचेही सेवन कमी होते. रिसर्चनुसार पोट कमी करण्यात प्रोटीन्स फायदेशीर आहे. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसेच फायबर्सचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे व जन कमी करण्यात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बीन्सचा समावेश करू शकता.

नट्स – रिसर्चनुसार तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही नट्सचा समावेश केला तर तुमचे वज न कमी होण्यास मदत होते. नट्समध्ये मोठया प्रमाणात फायबर्स, प्रोटीन आणि इतर पोषकतत्वे असतात ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहण्यास मदत होते. तसेच अति प्रमाणातही खाल्ले जात नाही. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नट्सचा समावेश करू शकता.

दही – अनेकदांना दही खायला प्रचंड आवडते. मात्र हे दही तुम्हाला वज न कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जे पोट कमी करण्यात फायदेशीर ठरतात. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स जे वज न कमी करण्याचा महत्त्वाचा घटक आहे. प्रोटीनशिवाय साध्या दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्समुळे कॅलरीज येतात. डाएटमध्ये या दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दरम्यान दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, कमी साखर अथवा साधे दही असावे.

Leave a Reply

Your email address will not be published.