अंगारक संकष्ट चतुर्थी उपवास सोडण्याआधी हे काम करा 21 चतुर्थीचे पुण्य मिळेल

अंगारक चतुर्थीला कोणत्या गोष्टी कराव्यात की ज्यामुळे त्याचे पुण्य अधिक प्राप्त होते आणि कुठल्या गोष्टी करू नयेत की त्यामुळे आपले नुसकान होईल. अंगारक चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थी. अंगारक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने 21 चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते.

उपवास सोडताना सांगणार आहोत तो मंत्र एकदा म्हणावा. आपली इच्छापूर्ती होते, मनात काही मनोकामना असेल, ती पूर्ण होते. हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व आहे. गणेशभक्त या दिवशी उपवास करतात. गणपती बाप्पाला मोदक,दुर्वा अर्पण करतात. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात.

ह्या चतुर्थीला एवढं महत्व का आहे ह्याची एक दंतकथा आहे.
कृतयुगात अवंतीनगरीत देवदत्त अग्निहोत्री ऋषि भरद्वाज हे महडचे मोठे गणेशभक्त होते.या युगापासूनच जगाला गणेश पूजनाचे महत्व समजले. भरद्वाज यांच्याकडून पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वदं नामक वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमीपुत्र जन्माला आला होता. भौमी पुत्र 7 वर्षाचा झाल्या नंतर पृथ्वीने त्याला भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यांचे पालन पोषण भरद्वाज यांनी केले. त्यांनी त्याला वेद शिकविले. गणेश मंत्र दिला. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. एक सहस्र वर्ष व्रत करून त्याने श्रीगणेशाला प्रसन्न करून घेतले. तो हाच दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून प्रचलित झाला.

स्वर्गात राहून अमृत प्राशन करणे आणि त्रैलोक्यात विराजित व्हायचे असे वरदान त्याने मागितले. गणेशाने त्याला त्याला वरदान दिले की भविष्यात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला तुझ्याच नावाने ओळखले जाईल. जो गणेश भक्त अंगारकी चतुर्थी हा उपवास करेल त्याला 21 चतुर्थी केल्याचे पुण्य मिळेल आणि तू केलेल्या सहस्त्र वर्ष तपचर्येचे पुण्य युगेयुगे त्यांच्याही वाट्याला येईल.त्याचा इच्छा,मनोकामना पूर्ण होतील. भक्त कर्ज मुक्त,ऋण मुक्त होतील. वैभवशाली, आरोग्यादायी होतील. आणि तुझे नाव भौमी पुत्र तू भूम आकारा सारखा लाल आहेस म्हणून तुझ्यात अंगारक आणि शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून तूला ब्रम्हांडात मंगल ग्रह नावाने स्थान मिळेल. सदैव अमृत प्राशन केलेला असशील पृथ्वीवरती महत्व प्राप्त करशील.

म्हणूनच ज्याला चतुर्थी उपवास करायला जमत नसेल त्यांनी न चुकता अंगारकी चतुर्थी उपवास करावा. हा उपवास केल्याने 21 चतुर्थी केल्याचे भाग्य लाभते. 2 मार्च 2021ला येणारी ह्या वर्षाची पहिली अंगारकी आहे. हा उपवास केल्याने सर्व मनोकामना ,इच्छा पूर्ण होतात. ह्या दिवशी मंगल ग्रहाच्या पुण्य लहरी सहस्त्र पटीने पृथ्वीतळावर आकर्षित होत असतात. कुणीही ह्या दिवशी उपवास केला तर लाभ नक्कीच होतो. कृपया या दिवशी हा उपवास कुणीही दुसऱ्या दिवशी सोडू नये त्याच दिवशी सोडावा. श्रीगणेशाला भूक सहन होत नाही त्यांना असे आवडत नाही.

उपवास सोडण्याआधी गणेशपूजा करून चंद्रदर्शन करावे. आणि खाली दिलेला मंत्र म्हणावा किंवा ऐकावा….
मंत्र– गणेशाय नमसुभ्य ; सर्वसिद्धी प्रदायका ,
हरमे देव ; गुहाणार्ध्यम नमोस्तुते ;
कुष्णपक्षे चतुर्थीघ्यात ; सम्पुजित विदुदयो क्षिप्र पसिद देवेश ;
अकारकाय नमोस्तुते।।

हा मंत्र बोलूनच उपवास सोडावा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.