मुलींनी या सवयी टाळल्या तर अंडरआर्म्स पडणार नाहीत काळे… जाणून घ्या कारणे…

काही जणींना स्लीव्हलेस ब्लाऊज अथवा ड्रेस घालणे आवडत नाही अथवा लाज वाटते कारण त्यांचे अंडरआर्म्स काळे असतात.

पण तुम्ही एकट्याच या समस्येला सामोरं जात नाहीये तर अशा अनेकांना अंडरआर्म्स काळे असण्याची समस्या आहे. हे दिसायला फारच खराब दिसतं आणि त्यामुळे आपल्याला नीट फॅशनही करता येत नाही.

केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही ही समस्या असते. पण हे लपविण्यापेक्षा याचे नक्की कारण काय आहे आणि कोणत्या सवयी टाळल्या तर आपल्याला या समस्येला सामोरं जावं लागणार नाही याचा विचार करणं जास्त गरजेचे आहे.

या लेखातून आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत. तसंच या समस्येची तोडही आम्ही तुम्हाला देणार आहोत. अर्थात ही समस्या आणि त्याचे समाधान या दोन्हीबाबत या लेखातून माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शेव्हिंग करणे

अंडरआर्म्समधील केस काढण्यासाठी बरेचदा सर्वात सोपा उपाय म्हणून शेव्हिंग करण्यात येतं. शेव्हिंग केल्याने केस नक्कीच निघतात. पण त्वचेच्या आतील हेअर फॉलिकल्स दिसू लागतात.

त्यामुळे अंडरआर्म्समधील त्वचा काळवंडल्याचे दिसून येते. नियमित स्वरूपात जर तुम्ही काखेखाली शेव्ह करत राहिलात तर ही त्वचा अधिक कडक आणि काळी होते आणि याठिकाणी जळजळ आणि खाजदेखील निर्माण होते. त्यामुळे त्यावर काळसरपणा अधिक चढत जातो.

समस्येचे समाधान

शेव्हिंग त्वचेला अनेक तऱ्हेने नुकसान पोहचवते. त्यामुळे जेव्हा कधी घाई असेल आणि तुम्हाला अंडरआर्म्स शेव्ह करायचे असेल तेव्हा तुम्ही स्वच्छ रेझरचा वापर करा. तसंच शेव्ह केल्यावर लगेच त्याजागी ताजे कोरफड जेल लावा.

जेणेकरून त्वचा काळवंडणार नाही. त्याशिवाय त्वचेची जळजळ होण्यापासून वाचायचे असेल तर तुम्ही हलक्या हाताने शेव्ह करा.

वॅक्सिंग करणे

तुम्हाला जर वाटत असेल की, शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग हा चांगला पर्याय आहे तर तसंदेखील अजिबात नाही. अति वॅक्सिंग केल्यास त्वचेची जो पातळ स्तर असतो तो निघण्याची शक्यता असते.

ज्यामुळे इ्न्फेक्शन आणि जळजळ होते. सतत वॅक्सिंग करणं योग्य नाही. यामुळे त्वचा काळवंडते आणि त्रासदायक ठरते.

समस्येचे समाधान

अंडरआर्म्समधील केस काढणं आवश्यक आहे. त्यामुळे अंडरआर्म्सच्या त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. ही त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे वॅक्सिंग करताना त्वचा ओढली जाणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा काळसर त्वचा खराब दिसते. 

डेड स्किनचा त्रास

बऱ्याचदा आपल्या शरीरावर डेड स्किन असते. हे सेल्स हटविण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आणि त्याची स्वच्छता राखणे गरजेचे असते. अंडरआर्म्सची त्वचा ही अगदी आतपर्यंत जाऊन स्वच्छ करावी लागते. कारण तिथे सर्वात जास्त घाम येतो आणि तो घाम साचून राहतो. त्यामुळे त्वचा अधिक खराब होऊन काळवंडते.

समस्येचे समाधान

दर तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी तुम्ही अंडरआर्म्स त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. त्यामुळे डेड स्किन जमून राहणार नाही आणि अंडरआर्म्स काळवंडणार नाहीत.

घट्ट कपडे घालणे

तुम्हाला जर घट्ट कपडे घालण्याची अर्थात टाईट कपडे घालण्याची सवय असेल तर त्वचेवर हे कपडे घासले जातात आणि त्यामुळे काखेतील त्वचा पटकन काळवंडते. काखेची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते.

ही त्वचा संवेदनशील असते आणि त्यामुळे घट्ट कपडे घालून त्यावर घासून अधिक खराब होते आणि त्यामध्ये  खाजही येते.

समस्येचे समाधान

योग्य फिटिंग असणारे कपडे सहसा घाला. सतत घाम येऊन अंडरआर्म्सची त्वचा खराब होईल असे कपडे घालून नका. तसंच तुम्ही जेव्हा शेव्हिंग अथवा वॅक्सिंग कराल तेव्हा किमान आठवडाभर तरी तुम्ही घट्ट कपडे घालणं टाळा.

हायपर पिगमेंटेशन

हायपर पिगमेंटेशन ही त्वचेची अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा आवश्यकतेपेक्षा अधिक मॅलेनिनचे उत्पादन करत असते. त्यामुळे अंडरआर्म्स काळे पडू लागतात. तर काही ठिकाणी काळे पॅच पडलेलेही दिसून येतात. यासाठी तुम्हाला अर्थातच तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला हवा.

समस्येचे समाधान

थोडीशी काळजी घेऊन तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सची नाजूक त्वचा चांगली राखू शकता. त्वचेवर योग्य कपडे घालण्यासह ओले कपडे घातले जाणार नाहीत याची काळजी घ्या. तसंच कपडे स्वच्छ असाेत. सतत घाम येत असेल तर काख थोड्या थोड्या वेळाने स्वच्छ करा.

मित्रांनो माहिती आवडली तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.