धक्कादायक! बाबा चमत्कारची भूमिका साकारणारा कलाकार राहतोय वाईट अवस्थेत

महेश कोठारे दिग्दर्शित अनेक चित्रपट त्यावेळी चांगलेच गाजले त्यातला झपाटलेला चित्रपट आजही प्रेक्षकाना पाहायला आवडतो लोक आवर्जून हा चित्रपट आजही पाहतात.

झपाटलेला चित्रपटातील “बाबा चमत्कार” हे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. हे पात्र साकारले होते ज्येष्ठ अभिनेते “राघवेंद्र कडकोळ” यांनी. पण आज ते खूप बिकट परिस्थिती राहतात त्यांची अशी परिस्थती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.. राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले.

इयत्ता नववीत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झापटल्यासारखे वाचले. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला. याच दरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आलं. तेथील समुद्र, बीटी पाहून ते अगदी भारावून गेले. शेवटी आपण जे ठरवलं ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता.

परंतु म्हणतात ना, ‘आपण जे ठरवतो तसं होत नाही’ अगदी तसंच राघवेंद्र यांच्या बाबतीत घडलं. त्या टीममधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी पाठवण्यात आलं. यागोदारच सगळ्या मेडीकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला. आणि जे व्हायचे नव्हते नेमके तेच घडले. रिपोर्ट मध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून घरी पाठवले.

जहाजात असताना अचानक त्यांना पुन्हा मेडिकल टेस्टसाठी परत पाठवलं हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता आणि आजवर हीबाब विसरू शकत नाही. त्यावेळी माझ्या विरोधी कोणी कान फुंकले? असा मिश्किल सवाल त्यांच्या मनात घर करून गेला. पुढे घरी परतल्यावर शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

महाविद्यालयात शिकत असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी थोरला या नात्याने त्यांच्यावरच येऊन पडली. जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली. त्यादरम्यान अनेक छोट्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली.

कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. “करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून २०- २२ दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे हातच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले.

“अश्रूंची झाली फुले” नाटकातील “धर्माप्पा” ही भूमिका त्यांच्याकडे ओघाने आली. एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले.

धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

झपाटलेला चित्रपटावेळी त्यांचे वय ५० होते तर झपाटलेला २ वेळी त्यांचे वय ७० वर्ष इतके होते. २००३ साली ह्या चित्रपटाचा सिकवल पाहायला मिळाला होता.दोन्ही तील त्यांनी साकारलेला “बाबा चमत्कार” हा निश्चितच रसिकजनांच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही. इतके असूनही आज ते बिकट परिस्तितीत जगताहेत. जगण्यासाठी पैसे लागतो आणि पैसे कमवायला सुधृढ शरीर. ह्या दोन्ही गोष्टी आज त्यांच्याकडे उरल्या नाहीत, प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आला नाही ह्याची खंत आजही त्यांना लागून आहे. पण सध्या त्यांच्या मदतीला पालाश इल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर आलं.

सध्या राघवेंद्र कडकोळ आणि त्यांच्या पत्नी “लतिका कडकोळ” ह्या पुणे, बावधन येथील ” पालाश इल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर ” येथे राहत आहेत. इतका मोठा आणि दांडगा अभिनय जो आजही सर्वांच्या लक्ष्यात असूनही कोणी काम देत नाही म्हणून कोणाकडे कामासाठी हात पसरायचे नाहीत असं त्यांनी ठरवलं.

Leave a Reply

Your email address will not be published.