बडीशेप’ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवणानंतर आठवणीने दिला जाणारा पदार्थ म्हणजे बडिशेप. मुखशुद्धीसाठी बडीशेप खाल्ली जाते. मात्र, केवळ मुखशुद्धीसाठी त्याचा उपयोग नाही आहे. तर बडीशेरमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्रेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्वे आहेत. याचा उपयोग चांगल्या आरोग्यासाठी होतो. तसेच बडीशेपमुळे अपचन, पोटदुखी, श्र्वासासंबंधीतील आजार अशा आजारांवरही मात करता येते. तर आज बडीशेप खाल्याने नेमके काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.

फायदे

जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचते. काळे मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून घेतल्यानं कोमट पाण्यासोबत घ्यावे. पचनक्रियेसाठी हे चूर्ण उत्तम आहे.

उलटीचा त्रास होत असेल तर बडीशोप खावी. तात्काळ आराम मिळतो.

मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी.पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम करते. त्वचेसाठी दररोज बडीशेप खाणं फायदेशीर आहे.

नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी. उन्हामुळे जळजळ होत असेल तर सरबत किंवा बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे.

बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दूधात घालून प्या. यामुळे दृष्टी सुधारेल.

अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.

रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.

जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचतं. काळं मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून घेतल्यानं कोमट पाण्यासोबत घ्यावं. पचनक्रियेसाठी हे चूर्ण उत्तम आहे.

बडीशेप खाण्याने होणारे फायदे

1 – खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.

2 – बडीशेप खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसतील तर बडीशोप आणि गूळ खा. तसंच रोज बडीशेप खाल्ल्याने तुमच्या गर्भाशयाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही.

3 – ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडीशेप खूपच परिणामकारक आहे. हो. जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.

4 – बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.

5 – ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडीशेप मिक्स करून दूधातून प्यावं.

6 – पोटात दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. पण लक्षात घ्या ही बडीशोप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.

7 – जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.

8 – बडीशेप खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही वाढते. यासाठी बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खावी.

9 – दररोज बडीशेप खाल्ल्यास तुमची दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात.

10 – जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.