कोरफडाच्या ‘या’ 12 गुणांमुळे वाढेल तुमचे सौंदर्य… एकदा वापरून पहाच…

कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की कोरफडाचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धन उत्पादनांमध्ये देखील केला जातो.

तसंच तुम्ही ह्या वनस्पतीचा वापर प्रत्येक ऋतूंमध्ये करू शकता. कोरफडाच्या पानांमध्ये विटा मिन ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉ लिक ऍ सिड यांसारखी पोषक तत्व आढळतात.

कोरफडाच्या ह्या विविध गुणांमुळे ह्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पानं ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे.

कोरफड जेलमध्ये जळजळरोधक असून थंडावा देते. या गुणांमुळे छोटं-मोठं खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडाचा वापर केला जातो.

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाभदायक

मऊ आणि मुलायम ओठांसाठी

कोरफड वनस्पती ई जीवनसत्वाने समृध्द आहे. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती जणू वरदानच आहे. आपल्या ओठांवर कोरफड जेल लावा आणि विसरून जा. बस इतकंच करायचंय. जर तुम्हाला हवं असेल तर कोरफड जेलमध्ये थोडंस ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखं ही वापरू शकता.

सुंदर डोळ्यांसाठी

जर सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचा वापर केल्यास सगळं ठीक होईल.

डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कोरफड जेल लावायला सुरुवात करा. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये कोरफडीचा वापर केला जातो.

वॅक्सिंगमुळे येणाऱ्या लालसर चट्ट्यांना करा बायबाय

जर तुम्हाला वॅक्सिंग, थ्रेडींग आणि प्लकींग केल्यानंतर लालसर चट्टे किंवा पिंपल्स येत असतील तर हे बरं करण्यासाठी तुम्ही बहुगुणी कोरफड नक्की वापरून पहा. त्याचा नक्कीच उपयोग होईल. 

अँटी एजिंग गुण

कोरफड तुमच्या त्वचेतील लवचिकपणा सुधारतो. ज्यामुळे फाइन-लाइन्स, सुरकुत्या किंवा डाग-चट्टे अशा समस्या उद्भवत नाहीत. ह्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडंसं ऑलिव्ह तेल आणि थोडी ओटमील पावडर मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 30 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धूवून टाका.

अप्रतिम मॉइश्चरायजर

कोरफडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा सजल म्हणजेच हाय ड्रेट राहते तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. आहे ना चमत्कारिक?

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफड होय. कोरफड जेलचा वापर मॉइश्चरा यजरसारखा करून त्वचेला मसाज करा आणि झालं तुमचं काम.

हे जेल तुम्ही नखांना ही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्च रायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल.

डाग-व्रण आणि पिंपल्स ना करा बाय

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड खूपच उपयुक्त आहे. कोरफडीमध्ये बुरशीविरोधी, जळजळविरोधी आणि जंतूनाशक घटक आहेत.

जे त्वचेवरील डाग-व्रण आणि पिंपल्सची समस्या दूर करतं. ह्यातील पॉलीकेराइड्स ह्या घटकामुळे नव्या पेशींच्या वाढीला मदत करतं. ज्यामुळे पिंपल्स लवकर बरे होतात आणि तेही कुठल्याही डागांशिवाय. आश्चर्य आहे ना?

कोरफडाचा हा अजून एक अचूक उपयोग आहे. रोज रात्री पिंपल्स वर कोरफड जेल लावा किंवा जेलमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावा.

सनबर्नवरचा जालीम उपाय

सूर्य किरणांमुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते. कोरफडाच्या रसात त्वचेचे सूर्य किरणांपासून रक्षण करण्याची क्षमता आहे आणि यातील अँटी ऑक्सी डंट गुण त्वचेचा ओलावा ही काायम राहतो.

त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही ऊन असताना बाहेर पडणार असाल तेव्हा कोरफडाचा रस आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावा.

चामखीळ होईल गायब

कोरफड जेलमध्ये कापूस थोड्यावेळासाठी बूडवून ठेवा. ज्यामुळे जेल चांगल्यारितीने कापसात शोषले जाईल. मग तो कापूस काही मिनिटांसाठी चामखीळावर टेपच्या मदतीने चिकटवा. हीच कृती काही महिने नियमितपणे केल्यास तुमचं चामखीळ आपोआपच गळून पडेल.

स्ट्रेच मार्क्स आणि पोर्स म्हणजेच चेहऱ्यावरील खुल्या छिद्राच्या समस्येवर प्रभावी

कोरफड जेल नियमितपणे स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तसंच चेहऱ्यावरील पोर्सवर हे जेल अगदी ऍस्ट्री जेंटसारखे काम करते. ज्यामुळे तुमचे पोर्स कमी होण्यास मदत होते.

आश्चर्यकारक स्क्रब

कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करा आणि वापरा. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेला हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते.

याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो.

माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.