काळा लसूण आहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर… जाणून घ्या हे महत्वाचे फायदे…

आपल्या सगळ्यांनाच नेहमीच्या वापरातील पांढरी लसूण माहीत आहे. ज्याचा वापर आपण दैनंदिन जेवणात करतो. काहींना तर प्रत्येक भाजीत लसणाची खमंग फोडणीला घातल्याशिवाय चैन पडत नाही. कारण लसणामुळे पदार्थाला येणारा स्वादच इतका छान आहे. पण काहींना लसूणाचा वास आवडत नाही. यावर एक उत्तम उपाय म्हणजे काळी लसूण.

तुम्ही कधी काळ्या लसूणविषयी ऐकलं किंवा पाहिला आहे का. काळ्या लसूणाचा वास पांढऱ्या लसणासारखा उग्र नसतो. खूप कमी लोकांना काळी लसूण आणि त्याचे आरो ग्यदायी फायदे माहीत आहेत.

खरंतर काळा लसूण हा पांढऱ्या लसूणचाचं एक रूप आहे. पण काळ्या लसणाचे आरो ग्यदायी फायदे अनेक आहेत. त्यामुळे प्राचीन काळापासून औष धांमध्ये आणि उपचा रपद्धतींमध्ये काळ्या लसूणाचा वापर केला जातो. त्यामुळेच अनेक आशियाई देशांमध्ये काळ्या लसूणाचा वापर सर्रास होताना दिसतो.

काळी लसूण म्हणजे काय

काळी लसूण हा पांढऱ्या लसूणचाच एक रूप आहे. जो फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार केला जातो. ताजा पांढरा लसूण ठराविक तापमानावर फर्मेंट केला जातो. ज्यामुळे त्याची चव कमी तिखट होते. तो मऊ होतो. पण यामुळे त्यातील पोष क तत्त्व अजिबात कमी होत नाहीत किंवा तो लसूण खराबही होत नाही.

फर्में टेशनने वाढतात काळ्या लसणातील पौ ष्टि क तत्त्वं

फर्में टेशन प्रक्रियेतून गेल्यामुळे काळ्या लसणामध्ये युनिक अँटी ऑक्सी डंट्सचे गुण आढळतात. ज्यामुळे हा लसूण अँटी इन्फ्ले मेटरी म्हणजेच जळजळ नाशक ठरतो. तसंच यात पॉलि फेनॉल, फ्लेव नॉईड आणि अल्क लॉईड पोष क तत्त्व ही या लसणात आढळतात. 

आश्चर्य म्हणजे पांढऱ्या लसणात आढळणारं आरो ग्यदायी गुणयुक्त एलि सीन हे पो षक तत्त्व काळ्या लसणातही आढळतं. हे रक्ता भिस रण वाढवतं, कॉले स्ट्रॉल आणि हृदय संबंधित रोगही कमी करतं.

तसंच शरीरातील पे शींचं संतुलन आणि प्रतिका रकक्षमताही वाढवतं. यामध्ये अँटी बॅक्टे रियल आणि अँटी व्हाय रल गुणही आढळतात. याशिवाय या लसणाचं सेवन केल्यास ब्ल ड शुगर लेव्ह लही संतुलित राहण्यास मदत होते.

काळ्या लसूणाचं सेवन या रो गांवर गुणकारी

काळ्या लसूणाचं सेवन केल्याने अनेक प्रकारच्या कॅन्स रला आळा बसतो. खासकरून ब्ल ड कॅ न्सर, पोटाचा कॅन्स-र आणि कोलन कॅन्स-रच्या इलाजात हा लसूण गुणकारी ठरतो.

हा लसूण एल-र्जी कमी करतो. मेटो बॉली जम वाढवतो, तसंच लिव्ह रला कोणत्याही अपा यापासून वाचवतो. याशिवाय काळी लसूण हा मेंदूला आरो ग्यदायी ठेवण्यातही मदत करतो.

तुम्ही काळी लसूण दैनंदिन जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलात घालून ठेवल्यास तो वापरणं सोपं जाईल. तसंच त्याचे सर्व पौ ष्टीक गुणही जेवणात उतरतील.

हा लसूण तुम्हाला ऑन लाईन किंवा बाजारात हमखास विकत घेता येईल.

तुम्हाला काही त्रास असल्यास किंवा एखादी ट्रीट मेंट सुरू असल्यास याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.