हळदीच्या दुधाचे हे फायदे वाचून तुम्ही आजपासूनच हळद घालून दूध प्यायला सुरू कराल

दुधाला आपल्याकडे पूर्णअन्न म्हटलं जातं. दुधातून आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. आणि आयुर्वेदात हळदीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हळद ही अँटि बायोटिक आहे हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे दूध आणि हळद एकत्र करून घेतलं तर दोन्हीचे दुहेरी लाभ आपल्या शरीराला मिळतात.

हे आहेत हळदीयुक्त दुधाचे १० फायदे :

1) जखमेवर गुणकारी

जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली असेल तर हळद हे त्या जखमेवर अँटी बॅक्टेरि एल म्हणून काम करते. हळद जखमेवरील बॅक्टे रिया मारण्याच काम करते. त्यामुळे जखम झाली असेल तर हळद आणि दूध एकत्र घेण्याचा सल्ला दिला जातो.

2) शारीरिक दुखण्यावर रामबाण इलाज

शरीराच्या कोणत्याही भागात सनक भरली असेल, सूज असेल किंवा दुखत असेल, तर हळदीच्या दुधाने आराम मिळतो. हळदीच्या दुधाने सूज उतरण्यास मदत मिळते. सूज असेल, दुखत असेल तर झोपण्यापूर्वी गरम हळदीचं दुध पिणे उत्तम.

3) त्वचेच्या सुंदरतेसाठी उपयुक्त

दुधाने आपल्या त्वचेवर एक वेगळीच चमक येते. हळद ही सौन्दर्यवर्धक म्हणून सुद्धा उपयुक्त आहे. हळद आणि दूध मिक्स करून तो लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो. तसेच हळद आणि दूध एकत्र पिल्यामुळे त्वचेच्या विकारांपासून त्वचेचं रक्षण होत. खाज, खरूज इत्यादी पासून त्वचा सुरक्षित राहते.

4) सर्दीवर गुणकारी

सर्दी आणि कफ इत्यादी विकारांवर हळदीयुक्त दूध उत्तम काम करते. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो आणि हळदी मुळे बॅक्टे रिया पासून रक्षण होते. थंडी मध्ये हळदयुक्त दूध घेतल्याने कफ आणि सर्दीपासून बचाव होतो.

5) हाडांच्या मजबुतीसाठी गुणकारी

दुधातील पोषक घटक आणि हळदीतील औषधी गुणधर्म यांच्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. नियमित दूध आणि हळद घेतलं तर म्हातारपणातील गुढघे दुखी, पाठ दुखी यांपासून आराम मिळतो.

6) झोपेसाठी उपयुक्त

आज मानसि क ताण तणावयुक्त जीवनशैलीमुळे झोप न येणे, निद्रानाश असणे ही सामान्य गोष्ट आहे. पण हळद आणि दूध एकत्र घेतलं तर तुम्हाला शांत झोप मिळू शकते. रात्री जेवण झाल्यानंतर हळद आणि दूध गरम करून घ्यावे.

7) पचन व्यवस्था सुधारण्यास मदत करते

आजकाल अवेळी खाणं, फास्ट फूड, जंक फूड मुळे अपचन ही एक समस्या झालेली आहे. हळद आणि दूध यांमुळे अपचनापासून तुमची सुटका होते. पचना संबंधी ज्या काही तक्रारी असतील त्या दूर होतात. अल्स र, डायरे या, मध्ये सुद्धा दूध आणि हळद उपयुक्त ठरते.

8) श्वस नासंबंधी विकारांवर रामबाण

श्वसनासंबंधी काही आजार असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हळद आणि दूध त्यावर उत्तम इलाज ठरतात. हळदीयुक्त दूध घेतल्याने फेफडा, कफ आणि दमा यावर तात्काळ आराम पडतो.

9) वज न कमी करण्यात उपयुक्त

हळद आणि दूध एकत्र घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. परिणामी आपलं वज न कमी होते. दुधातील कॅल्शिय म आणि हळदीतील औषधी मिन रल्स गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

10) रक्ता तील शु गर नियंत्रण करण्यास उपयुक्त

आयुर्वेदात हळदीला अतिशय महत्वाचे स्थान आहे. हळद जंत नाशक आहे. हळद आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करते. त्यामुळे ब्लड शु गर कंट्रोल मध्ये राहून आपलं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे हळद आणि दूध हे नियमित घेतल्याने आपलं आरोग्य सुधारण्यास मदतच होईल.

माहिती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.