दही खाण्याचे ‘हे’ फायदे जाणून तुम्ही आजपासूनच दही खायला सुरुवात कराल

थंड आणि सुमधुर दही खायला कोणाला आवडत नाही? लहान मोठे सर्वांना दही खायला आवडत. दही हा असा पदार्थ आहे ते कशासोबत ही खाल्लं तरी त्याची चव वाढवतेच. दही फक्त चवच वाढवत नाही तर आपल्या शरीराच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक घटक पुरवण्याचं काम सुद्धा करते. त्यामुळे भारतीय आहार दह्याशिवाय सुरू आणि पूर्ण होऊच शकत नाही.

तसे तर सर्वच प्राण्यांचे दूध, दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक असतात. पण या पौष्टिकतेमध्ये दह्याचा नंबर सर्वात वर येतो. दह्या सोबत खाल्लेले अन्न सहज पचते. त्यामुळे त्या अन्नातील पोषक द्रव्ये आणि जीवन सत्वे शरीरात आणि रक्तात सहज शोषली जाऊन त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो. या सर्वांमुळे दह्याला परिपूर्ण आहार अस म्हटलं जातं.

हे आहेत दही खाण्याचे फायदे

1) वज न कमी करण्यास उपयुक्त

दही खाल्ल्याने दीर्घकाळ पर्यंत पोट भरलेलं राहतं. त्यामुळे जर तुम्ही वज न कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दोन जेवणाच्या मध्ये दही खात जा. त्यामुळे पोट भरलेलं आहे ही भावना टिकून राहते आणि भूक लागत नाही. परिणामी वज न कमी होण्यास मदत होते.

2) भरपूर प्रथि नयुक्त आहार

दह्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने कॅल्शि यम असतात. ते अन्न सहजरित्या पचना स मदत करतात. त्यामुळे शारीरिक ऊर्जेची गरज भागवली जाते.

3) पुरेपूर आहार

आजकाल धकाधकीच्या जीवनात वेळेवर खाणं पिणं होत नाही. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो. पण दह्यामुळे शरीराला गरज असलेली ऊर्जा त्वरित मिळते. त्यामुळे काम करण्यास उत्साह मिळतो. तसेच दह्यामुळे काम जीवन सुरळीत होण्यास मदत होते. उत्साह वाढतो. नपू संकत्व कमी होण्यास मदत मिळते. पुरुष शुक्रा णूची संख्या वाढून त्याची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे रोज एक वाटी दही खाल्ल्याने फायदा होतो.

4) प्रतिका रशक्ती वाढीस लागते

दह्या मुळे शरीरातील प्रतिका रशक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होतात. त्यामुळे शरीराची संरक्षक यंत्रणा बळकट होते. त्यामुळे संसर्गजन्य विषाणू नष्ट होऊन निरोगी राहण्यास मदत होते. तसेच दह्यामुळे दातातील कीड नाहीशी होण्यास सुद्धा मदत मिळते.

5) मधु मेह नियंत्रणात राहण्यास मदत होते

दह्यामुळे रक्ता तील साख रेची पातळी कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे मधु मेह नियंत्रणात राहतो. मधु मेहा मुळे गुप्तां गाची खाज होते ती कमी होण्यास दही मदत करते.

6) पचन क्रिया सुधारते

दही पचायला हलके असल्यामुळे जठर आणि आंतड्यातील पाचक द्रव स्त्रवण्यास मदत होते. त्यामुळे जड अन्न सुद्धा सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार अन्न असेल तेव्हा सोबत दही खाल्ले तर असे अन्न शरीराला बाधत नाही आणि पचायला मदतच करते. दह्यामुळे पचन क्रिया सुधारते.

7) हृदय विकाराची शक्यता कमी होते

दह्यामध्ये रक्ता तील चरबी घटवण्याची क्षमता आहे. रक्ता तील चरबी कमी झाली तर ह्रदय रोग आणि इतर ह्रदय विकार होण्याची शक्यता अतिशय कमी होते. त्यामुळे रक्तदा ब कमी राहण्यास दही मदतच करते.

8) जीवन सत्वांनी परिपूर्ण आहार

दह्यामध्ये व्हि टॅमिन बी5, बी12 सारखे जीवन सत्व असतात. त्यामुळे रक्ता तील हिमो ग्लोबिन वाढायला मदत होते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. तसेच दह्यातील कॅल्शि यम आणि डी जीवन सत्वामुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. शारीरिक आरोग्य सुधारते.

9) आत ड्याचे आरोग्य सुधारते

दह्यामुळे शरीरास लॅ क्टो बॅक्टे रिया सारखे आ तड्याच्या आरोग्यास पोषक असलेले जिवाणू मिळतात. त्यामुळे आत ड्याचे आरोग्य सुधारते. पोट नियमित साफ होते. तसेच आ तड्याचा क र्करोग होण्याचा धोका कमी होतो.

10) चेहरा आणि त्वचे साठी उपयुक्त

चेहरा तसेच शरीराच्या इतर भागावर दही, मध आणि बदाम तेल यांचं मिश्रण करून लावलं तर रापलेली आणि मृ त त्वचा निघून जाऊन त्वचा उजळते. रंग उजळण्यासाठी संत्र्याची साल आणि दही लावावे. रोज सकाळी दही आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने त्वचा मुलायम बनते. लिंबू रस आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर, मानेवर लावलं तर सुरकुत्या कमी होऊन त्वचा तजेलदार दिसते.

11) केसांच्या समस्येवर उपयुक्त

केसांना 30 मिनिट दही लावून नंतर शाम्पू ने केस स्वच्छ धुवून घ्यावेत, केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. दही मेहंदी सोबत जर केसांना लावलं तर परिणाम आणखी चांगले दिसतील. केसातील कोंढा नाहीसा करण्यासाठी दह्यामध्ये काळी मिरी पावडर मिक्स करून आठवड्यातून दोनदा केसांना लावा. केसांच्या मुळांना दही आणि बेसन यांचं मिश्रण लावल्याने केस गळती कमी होते.

12) मान सिक आरोग्यासाठी उपयुक्त

नियमित दह्याच्या सेवनाने मेंदू तील सकारात्मक विचार वाढवणाऱ्या पेशी वाढीस लागतात. त्यामुळे चिंता, नकारात्मक विचार दूर होऊन मान सिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. हे प्रयोगा ने शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.

दही खाताना घ्यायची खबरदारी

कच्चे दही अजिबात खाऊ नये. त्यामुळे त्रिदोष बिघडण्याची शक्यता असते. शक्यतो रात्री दही खाणे टाळावे. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. खायचेच असेल तर काळी मिरी पूड किंवा साखर घालून खावे.

माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका… आणि अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच मराठी मस्ती पेज ला फॉलो करा…

Leave a Reply

Your email address will not be published.