पपईचे हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही आजपासूनच पपई खाण्यास सुरूवात कराल…

इतर फळांप्रमाणेच पपईही शरीरासाठी खूप लाभदायक आहे. या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सि डंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

पपईमध्ये व्हिटामि न ए, व्हिटामि न सी, निया सिन, मॅग्नेशि यम, कॅरोटी*न अनेक प्रकारचे अँटी ऑक्सि डंट्स असतात.

पचनाचा त्रास तसेच भूक न लागण्याचा ज्यांना त्रास असेल त्यांनी पपई खावे.

दरम्यान पपईचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत.

पपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता किंवा ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, फाय बर आणि अँटी ऑक्सि डंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅल रीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्या साठी खूप फायदेशीर असते. 

पपईमुळे पाचन शक्ती वाढण्यास मदत होते. दरम्यान पपई खाण्याचे जरी भरपूर फायदे असले तरी त्याचे शरीरासाठी काही नुकसानही आहेत. पपईशी संबंधित सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गरो दर महिलांनी पपईचे सेवन करू नये. 

पपई खाण्याचे हे आहेत फायदे

इम्यु निटी वाढते – प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आजार दूर राहतात. पपईतून आपल्या शरीराला व्हिटा मिन सी मिळते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो.

वज न कमी होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅल रीज असतात. जर तुम्ही वज न घटवत असाल तर तुमच्या डाएटमध्ये पपईचा समावेश करा.

कोले स्ट्रॉल कमी होण्यास मदत – पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फाय बर्स असतात. यात व्हिटा मिन सी आणि अँटी ऑक्सि डंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कोले स्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटा मिन सी मोठ्या प्रमाणात असते तसेच व्हिटा मिन ए ही मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

पचन क्रिया वाढते – पपईमुळे पचन क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. यात अनेक पाचक एन्झा ईम्स असतात. ज्यामुळे पाचन क्रिया सुधारते.

पपई खाण्याचे हे धोके

गरो दर महिलांसाठी हानिकारक – गरो दर महिलांनी पपई खाऊ नये. हे फळ गरम असल्याने यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. 

शुग र कमी होते – पपईमुळे रक्ता तील साख रेचे प्रमाण कमी होते. जर तुम्ही डाय बिटीजची औषधे घेत असाल तर  पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

ऍ लर्जी – पपईमध्ये पपे न नावाचा घटक असल्याने यामुळे ऍ लर्जी होऊ शकते. जसे सूज, चक्कर येणे, डोके दुखी, त्वचे ला खाज येणे इत्यादी.

कधी खावी पपई

पपईचे सेवन नेहमी सकाळच्या वेळेस करावे. यात ऍसि डिक गुण कमी असल्याने सकाळी खाल्ल्यास पचन चांगले होते.

असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.