जाणून घ्या मातीच्या भांड्यात शिजवलेल्या जेवणाचे आरोग्यदायी फायदे…तुम्हीही मातीच्या भांड्यात बनलेल्या जेवणाचे दिवाने व्हाल…

आजही आपल्याला बऱ्याच घरांमध्ये मातीचा माठ दिसून येतो. नैसर्गिक थंड पाण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

पण तुम्हाला माहीत आहे का? पूर्वीच्या काळात पदार्थ बनवण्यासाठीही मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येत असे.

पण आता अल्यु मिनि अम आणि इतर भांड्यांचा वापर करण्यात येतो. मातीच्या भांड्याचा वापर आता जवळजवळ नाहीसाच झाला आहे.

काही ठिकाणी फक्त दही लावण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करण्यात येतो.

खरं तर मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तुम्ही शिजवून खाल्ल्यास, तुम्हाला नैसर्गिक फायदा जास्त मिळतो.

आपले स्वा स्थ्य सुरक्षित राहण्यासाठी याचा अधिक लाभ होतो. कारण मातीच्या भांड्यातून अन्न शिजवल्यास, अनेक पो षक त त्व मिळतात जी अनेक आजा रांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

जाणून घेऊया नक्की काय होतात आपल्या शरीरासाठी मातीच्या भांड्याचे फायदे.

निरो गी शरीरासाठी गरजेचं

आपल्या शरीराचं स्वा स्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही जे अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवता त्याऐवजी मातीच्या भांड्यांमध्ये हे शिजवा.

आयुर्वे दानुसार सहसा कोणताही पदार्थ शिजताना त्या पदार्थाला हवेचा स्पर्श होणं अत्यंत गरजेचं असतं. पण  प्रे शर कुकरमध्ये अन्न शिजताना मात्र अन्न शिजण्याऐवजी ते उकळतं.

तसंच ते पटकन शिजतं आणि सर्वात महत्त्वाचं तर अन्न हळूहळू शिजणं आवश्यक आहे. पण आपल्याकडे इतका वेळ नसतो. त्यामुळे आपण हा पर्याय अवलंबतो.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारण 18 पो षक त त्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही सर्व पो षक त त्व मिळतात. त्यापैकी कॅल्शि यम, मॅग्ने शियम, स ल्फर, सिलि कॉ न, को बाल्ट आणि अशी अनेक पो षक तत्व मिळतात.

मातीच्या भांड्यातील पदार्थ हे अधिक चविष्ट

मातीच्या भांड्यात पदार्थ शिजण्यासाठी वेळ लागतो हे जरी खरं असलं तरीही मातीच्या भांड्यातील पदार्थ हे अधिक रूचकर आणि चविष्ट लागतात. तसंच यातील मातीचा सुगंध तुमच्या पदार्थांमध्ये उतरतो. त्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद तुमच्या जीभेवर तरळतो.

तसंच मातीच्या भांड्यामध्ये तयार होणाऱ्या डाळीमध्ये  शंभर टक्क्यांपर्यंत माय क्रोन्यू ट्रि एंट्स असतात आणि प्रे शर कुकरमध्ये शिजवल्यास, ते त त्व नष्ट होऊन जातात.

तुम्हाला जर तुमचं स्वास्थ व्यवस्थित जपायचं असेल तर तुम्ही नक्कीच मातीच्या भांड्यामध्ये पदार्थ शिजवायला पुन्हा सुरुवात करा.

थोडा वेळ नक्की लागेल. पण तुमच्या शरीराला आवश्यक असणारी पोष क तत्व तुम्हाला मिळतील.

मातीची भांडी होतात नैसर्गिकरित्या स्वच्छ

इतर भांडी साफ करताना आपण साबण, पावडर अथवा अन्य लिक्वि डचा वापर केला जातो. पण मातीची भांडी स्वच्छ करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला या सगळ्याचा वापर करावा लागत नाही.

तुम्ही केवळ गरम पाण्याने ही भांडी साफ करू शकता. कोणत्याही केमिक लयुक्त साबणाची त्यासाठी गरज भासत नाही. अगदीच ही मातीची भांडी जर तेलकट अथवा तुपकट असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या आणि त्यानंतर ही भांडी पुन्हा पहिल्यासारखी होतील.

पदार्थ बनवण्यापूर्वी ठेवा मातीची भांडी पाण्यात

मातीची भांडी जेवण बनवण्यासाठी उत्कृष्ट असतातच. पण ही भांडी वापरण्यापूर्वी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे मातीची भांडी तुम्ही रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी सुकवा.

ही भांडी सुकल्यावर त्याचा वापर करा. तसंच तुम्ही मातीची लहान भांडी जसे वाट्या, कप, ग्लास हे पाण्यात सहा तास ठेवलंत तरी त्यासाठी ते पुरेसं आहे.

असं करण्याचं कारण म्हणजे मातीच्या भांड्याचा चांगला सुगंध तुमच्या पदार्थांमध्ये व्यवस्थित उतरतो आणि पदार्थांची चवही अप्रतिम लागते.

सर्वच पदार्थ मातीच्या भांड्यात तयार करणं शक्य नाही याची आम्हालाही कल्पना आहे. पण किमान भात अथवा वरण तरी रोज मातीच्या भांड्यातून बनवा आणि आपलं आ रोग्य निरो गी बनवण्यासाठी एक पाऊल नक्की उचला.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज मराठी मस्ती लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.