स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औ षध आणि ब्युटी प्रोड क्ट्स वापरल्याने अनेकदा साइड इफे क्ट्सला सामोरं जावं लागतं. अशा वेळी घरगुती उपाय नेहमीच फायदेशीर ठरतात. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत वाफ घेण्याचे फायदे.
घरात काळजीपूर्वक स्टि म घेतल्याने खर्च देखील वाचतो आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
वाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने चेहर्यावरील त्वचेच्या रक्त परि संचरणात सुधार होतो. याने त्वचा रक्त वाहिनींना पसरण्यात मदत मिळते आणि पेशींमध्ये र क्तप्रवाह वाढतो. अशाने त्वचेला पोषक तत्व आणि ऑक्सी जन अधिक प्रमाणात मिळतं आणि त्वचा तरुण दिसू लागते.
त्वचेव रील डे ड स्कीन स्वच्छ करण्यासाठी आणि नैसर्गिक रीत्या त्वचा चमकदार व्हावी यासाठी वाफ घेणे एक योग्य उपाय आहे. याने कोणतेही ब्यु टी प्रोड क्ट्स न वापरता आपण ग्लो इंग स्किन मिळवू शकता.
चेहर्यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉ क्सिन हटण्यास मदत मिळते. केवळ चेहर्यावरील वाफाने देखील शरीरात वि षा क्त पदार्थांपासून मुक्ती मिळू शकते.
चेहर्यावरील मृ त त्वचा हटवण्यासाठी आणि सुर कुत्या कमी करण्यासाठी वाफ घ्यावी. याने त्वचा ताजीतवानी दिसते आणि त्वचेवरील ओलावादेखील कायम राहण्यास मदत मिळते. ड्रा यस्कीन असणार्यांसाठी वाफ घेणे फायदेशीर ठरेल.
चेहर्यावर मुरुम असल्यास वाफ घेतल्याने छि द्रांमध्ये जमा असलेली घाण, बॅ क्टेरिया सहज बाहेर निघतात आणि त्वचा स्वच्छ दिसू लागते.
अशा प्रकारे घ्या वाफ…
वाफ घेताना योग्य जागा आणि टेबल ची निवड करा.
यासाठी आपल्याला एका टॉवेलची गरज असेल.
वाफ घेण्यापूर्वी आपले केस बांधून घ्यावे.
वाफ घेण्यापूर्वी चेहरा आणि मान स्वच्छ करुन घ्यावी.
नंतर एका भांड्यात 4-5 ग्लास पाणी उकळून घ्या.
गॅस वर वाफ घेण्याची चूक करु नका.
भांड्यापासून 6 ते 8 इंच लांबीवर चेहरा ठेवा.
डोक्यावरुन टॉवेल घ्या आणि गरम वाफ चेहर्यावर येऊ द्या.
आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण यात तेलाचे काही थेंब मिसळू शकता.
आपल्या अधिक गरम जाणवत असल्यास आपलं डोक वर करा आणि टॉवेलची एक बाजू मोकळी करा.
अशा प्रकारे प्रत्येक 2 मिनिटाच्या अंतराळाने वाफ घ्या.
पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरण बदलामुळे अनेक आजार पसरतात. स र्दी, पडसे आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या येतात. वाफ घेतल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते तसेच सौन्दर्य सुद्धा खुलते. रोज किंवा आठवड्यातून किमान 3 वेळा वाफ घेतली तर आरोग्याचे फायदे आणि सौन्दर्य असे दुहेरी फायदे मिळू शकतात.
माहिती आवडली असेल तर शेयर करा आणि कमेंट करून सांगा की पुढे कोणत्या विषयावरील माहिती वाचायला आवडेल. आणि अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.
Chehra glow glow karne karitha Kay karave
Ani vajan kaise badhaya jaaye