भेंडीचे फेसपॅक लावून मिळवा पिंपल्स पासून सुटका

भेंडीची भाजी आपण खातो. भेंडीमध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस,पोटॅशिअम, व्हिटामिन्स असे अनेक घटक आहेत. भेंडी फक्त आरोग्यासाठी नाहीच तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. भेंडीची भाजी आपण खातोच पण भेंडी फेस पॅक म्हणून चेहऱ्याला लावली तर त्याचे आपल्या त्वचेला खूप फायदे होतात. तरूण वयात चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही समस्या सगळ्यांनी अनुभवली आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिम्स किंवा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावतो. बऱ्याचदा महागडे प्रोडक्ट वापरून चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत. भेंडीची भाजी आपण खातोच आज पाहूयात भेंडीचे फेसपॅक.  चला तर जाणून घेऊया भेंडीचे उपयोगी फेसपॅक कसे तयार करायचे.

भेंडीचे फेसपॅक

भेंडीचे फेसपॅक तयार करण्यासाठी पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून घ्या.

भेंडी धुतल्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.

भेंडी मिस्करमध्ये बारिक करताना त्यात पाणी घालू नका.

भेंडी मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या.

हि पेस्ट १५ – २० मिनीटे चेहऱ्याला लावून ठेवा.

फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.


चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या प्रत्येक वयातील लोकांना जाणवते. वय वाढते तसे पिंपल्स येण्याचे प्रमाणही वाढते. चेहऱ्यावरील पिंपल्स घालविण्यासाठी भेंडीचे हे फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. आठवड्यातून दोन वेळा भेंडीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे जर चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करायचे असतील तर भेंडीचे फेसपॅक नक्की लावून बघा.

तजेलदार त्वचा – भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. यासाठी ऑर्गेनिक ओरका पावडर यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावा. यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक वापरा.

केसांची निगा – भेंडीच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. यातून तुमच्या केसांची निगा राखण्यासाठीही खूप फायदा होतो.

मधुमेह – ज्यांना मधुमेह आहे अशांना फायबरयुक्त पदार्थांची शिफारस केली जाते. भेंडीत पुरेशा प्रमाणात फायबर असतं. भेंडीत मायरीसेटीन देखील आहे. यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

कोंडा – भेंडीमुळं तुमच्या केसांच्या कोंड्याचा त्रासही दूर होतो. केसांचा इचीनेस आणि त्यांच्या ड्रायनेसची समस्याही दूर होते.

पचनशक्ती – भेंडीच्या सेवनाने अनेक समस्या जसे की, मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जास्त गॅस अशा समस्या टाळल्या जाऊ शकतात. यामुळं तुमची पचनशक्ती वाढून ती चांगली राहण्यास मदत होते.

दृष्टी – भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळं तुमची दष्टी चांगली राहते. यामुळं मोतीबिंदूपासूनही तुमचा बचाव होतो.

चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुरळ – भेंडीत असणारं लिसलिसा जेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, एनालजेस्टीक, अँटीइंफ्लेमेटरी आणि रि हायड्रेटींग असतं. भेंडीच्या सेवनामुळं चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ कमी होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Leave a Reply

Your email address will not be published.