दुधी भोपळ्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? वजन कमी करण्यास उपयुक्त

रोज आपण जो नियमित आहार घेतो, तो आपल्या शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेमंद असतो. अश्याच प्रकारे भाज्यांच्या स्वरुपात खाल्ली जाणारे दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेक लोकांनी हि भाजी आवडत नसेल परंतु त्याचे होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल. अनेक वैद्य देखील आपल्याला दुधी भोपळा व त्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विशनाशक गुण असतात. यात 12 %पाण्याचे प्रमाण असून ह्याची चव इतर भाज्यांपेक्षा वेगळी असते

वजन कमी करण्यास उपयुक्त
जर आपण वाढत्या वजनामुळे त्रासले असाल तर व्यायामा सोबत आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे नियमित व्यायामानंतर दररोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्यायला हवे. हा रस प्यायल्याने बरेच तास आपले पोट भरल्यासारखे राहते व त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याच प्रमाणे दुधी भोपळा मीठ टाकून उकडून खाल्ल्याने काही दिवसातच वजन कमी होण्यास मदत होते. यात असलेले फायबर अधिक मात्रेत असल्यामुळे भूक कमी लागते व पोट भरल्या सारखे राहते.

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते-
जर आपण नियमित पणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपले उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रोल प्रमाण कमी करण्यास मदत होते.

लघवीसाठी उपयोगी-
दुधी भोपळा हे शरीराला थंडावा देतो. ह्याचा रसात अधिक मात्रेत पाणी असते जे आपल्या शरीराला थंड ठेवते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात दुधी अधिक प्रमाणत खाल्ले जाते. जर आपल्याला लघवी करताना जळजळ होत असेल तर आपण दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा. कारण हि जळजळ लघवी मध्ये अँसिड चे प्रमाण वाढल्या मुळे होते, आणि दुधी भोपळ्याच्या रसामुळे मिळणाऱ्या थंडावाने हे अॅसिड चे प्रमाण कमी होते.

दुधी केसांवर गुणकारी-
जर आपण आपल्या केसांच्या गळती मुळे व सफेद होण्याने परेशान आहात का? मग आपण दुधी भोपळ्याचा रस प्या किंव्हा ह्या रसात तिळाचे तेल मिसळवून हे आपल्या केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होण्यास मदत होईल. तसेच आवळ्या च्या रसात दुधी भोपळ्याचा रस मिसळवून प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यास देखील मदत होते. हे मिश्रण आपण न पिता फक्त केसांच्या मुळाशी देखील लावू शकता.

पचनक्रिया चांगली राहते-
पचनक्रिये संबंधी आजकाल अनेक आजार होत आहेत. त्यामुळे दररोज सकाळी दुधी रस प्यायची सवय करावी. यातील फायबर आपले पचनक्षमता वाढवितात. ह्यात असलेले इलेक्ट्रोलाईट शरीरात पचन क्रियेत नियंत्रण ठेवून पोटाचे आजार कमी होतात

Leave a Reply

Your email address will not be published.