मांड्या काळ्या पडल्या आहेत?मग करा काळेपणा घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा

आज काल नविन नविन प्रकारच्या फॅशन येत असतात.तर प्रत्येक जण आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून त्या फॅशन चा वापर करत असतो.तशीच एक सध्या चालू असलेली फॅशन म्हणजे वेस्टर्न कपडे परिधान करायचे.यामध्ये मुली बर्याच वेळा शॉर्ट कपडे घालतात ज्या मुळे त्यांच्या मांड्या दिसतात जसे की शॉर्ट पँट किंवा मग शॉर्ट स्कर्ट इत्यादी.
पण अनेका वेळा काही मुलींची इच्छा असुनही त्या असे कपडे परिधान करु शकत नाही कारण त्यांच्या मांड्या काळपट असतात.तर आज आपण अशा काळपट पडलेल्या मांड्याचा काळेपणा दुर करण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.तर आता बघु काय आहेत ते उपाय.

1) दही-
दही हे काळे डाग मिटवण्या-साठी उपयोगी ठरते. दह्यामध्ये ओटचे पीठ, बेसन पीठ आणि कणकेचा कोंडा हे सर्व मिसळून स्क्रब तयार करू शकता आणि ते लावल्याने काळे पणा दुर होईल.

2) मध-
एक चमचा भर मध हातात घेऊन बोटांनी पाच मिनिट तेथील त्वचा घासावी.लावलेले मध अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुऊन टाका.

3) लिंबू-
लिंबू हे डेड स्कीन स्वच्छ करण्या-साठी उत्तम आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पाणी 5 मिनिटा-साठी मांड्यांवर लावून ठेवा.तसेच थोड्या वेळा नंतर धुऊन टाका.

4) पपई-
पपईची पेस्ट करा आणि ती पेस्ट मांड्यांना लावा त्यामुळे मांड्याची त्वचा चमकदार होते. पपई हे त्वचेच्या अशुद्धी दूर करण्यात साठी मदत करते.

5) काकडी-
मांड्यावरील काळी पडलेली जागा दररोज काकडीच्या स्लाइ-सने घासा.जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या काकडी च्या स्ला-इस वर लिंबू ही पिळू शकता.

6) टोमॅटो-
काळेपणा घालवण्यासाठी टॉमेटो चा रस उपयोगी आहे मांड्यांवर रोज टोमॅटो पल्प लावा.आणि20 मिनिटे तसेच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुऊन घ्या.

7) ओटचे पीठ-
मांड्याचा काळेपणा घालवण्यासाठी मांड्याच्या जवळ-पासच्या त्व-चेचं काळपट-पणा दूर करण्या-साठी याचा स्क्रब तयार करून डेड स्कीन हटवू शकता. दोन चमचे ओटस च्या पिठा मध्ये लिंबू किंवा टोमॅटो चा रस मिसळा. आणि ते लावा आणि 20 मिनिट तसेच राहून द्या आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा व नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

8) नारळ तेल-
एक चमचा नारळाच्या तेला मध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण मांड्यांच्या जवळपास काळपट पडलेल्या भागावर लावा.आणि 10-15 मिनिट तसेच ठेवा आणि मग नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

Leave a Reply

Your email address will not be published.