चेहऱ्यावरील ब्लॅकहेड 5 मिनिटांत साफ करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या ! लिंबूच्या या उपायामुळे आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड 5 मिनिटांत साफ होतील हे ईथे जाणून घ्या ! ब्लॅकहेड ही अशी समस्या आहे की जिच्या पासून एकही वाचलेला नाही प्रत्येकास या समस्येस एकदा किंवा दोनदा सहन करावे लागले. बर्याच लोकांना ही नेहमी समस्या येत असते. ब्लॅकहैड्सचे कारण म्हणजे चेहऱ्यावरील लहान लहान छिदांमधे गोठलेले मोल, तेल आणि कीटक असतात. आपण नेहमी आपला चेहरा स्वच्छ ठेवल्यास आपल्याला ही समस्या कधीच येणार नाही. परंतु आपण या समस्येमुळे अस्वस्थ असल्यास आणि त्यापासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, हा लिंबूचा उपाय वापरा आपल्याला ही समस्या होणार नाही.
5 मिनिटांत ब्लॅकहेड टाळा पहा कसे :-
हे खूप सोपे उपाय आहे यासाठी लागणारे साहीत्य एक लिंबू आणि बेकिंग सोडा, आपण अंघोळ करण्यापूर्वी, अर्ध्या कापलेल्या लिंबुवर बेकिंग सोडा लावा आणि चेहर्यावरील घासावे. आणि लिंबू लावते वेळस थोडे दाबावे त्यामुळे बेकिंग सोडा आपली चेहऱ्यावर लागला जाईल आणि चेहरा पूर्णपणे साफ होईल. या उपाययोजनेला 5 मिनिटे सतत चालू ठेवून ब्लॅकहेड साफ केले जातात. हा उपाय आठवड्यात दोन। ते तीन वेळा करावे. आपल्याला याचे फरक दिसतील.
पुरुषांच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सवर काही घरगुती उपाय :-
पुरुषांनाही चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ब्लॅकहेड ही यापैकीच एक मोठी समस्या आहे. यासाठी बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध असली तरी ते उपयोगी ठरतीलच असे नाही. तसेच, यातील रासायनिक घटकांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे पुढील काही घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्स कमी करा.
टोमॅटो- यातील नैसर्गिक जीवाणूप्रतिबंधक घटकांमुळे ब्लॅकहेड सुकून जातात. यासाठी तुम्ही टोमॅटोचे मिश्रण तयार करुन चेहऱ्यावर रात्री लावा आणि सकाळी तुमच्या चेहरा पाण्याने धुवा. तुमची त्वचा सकाळी तजेलदार आणि स्वच्छ दिसेल.
मृत पेशी- जायफळ आणि दूध यांचे मिश्रण करुन त्याचा वापर तुम्ही ब्लॅकहेड काढण्यासाठी करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा नाहीसा होऊन जायफळातील खरबरीतपणामुळे त्वचा मऊ आणि सुंदर होते. दुधात असलेल्या लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवरील तेलाच्या पेशी निघून जातात.
लिंबू – लिंबात ब्लॅकहेड नष्ट करण्याची ताकद असते. यात मोठ्या प्रमाणात असलेल्या सायट्रिक अॅसिडमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन ब्लॅकहेड सुकून जातात. मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हे मिश्रण ब्लॅकहेड असलेल्या भागात लावा आणि वीस मिनिटांनंतर चेहरा धुवा. या नैसर्गिक उपायांनी ब्लॅकहेड नाहीशा होतील
चेहऱ्यावरील काळे डाग हे बऱ्याचदा ब्लॅकहेड्स मुळे ज्यास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे चेहऱ्यावरचे हे ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी असे काही घरगुती उपाय नक्कीच करून बघा. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.