स्वप्नात दिसणाऱ्या या गोष्टी धनलाभ देतात

स्वप्न म्हटलं कि आपल्यासमोर उभा राहत ते एक आभासी परंतु सुंदर चित्र. जगातील प्रत्येक माणूस स्वप्न बघतो तसेच त्याची स्वतःची स्वप्न असतात. या दोन्ही स्वप्नात महत्वाचा फरक म्हणजे झोपेत असताना पाहिलेले स्वप्न आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न होय. थोडक्यात सांगायचे तर मानवाच्या ज्या इच्छा, आकांक्षा आहेत त्याचा विचार करणे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न होय. तसेच झोपेमध्ये पडलेले अवास्तववादी स्वप्न म्हणजे पडलेले स्वप्न होय.

झोपेमध्ये पडणारे स्वप्न बऱ्याचदा अतिशयोक्ती तसेच अवास्तववादी असतात. मात्र अनेकदा असे होते कि त्यांचा आपल्या आयुष्याशी संदर्भदेखील असतो. स्वप्नशास्त्रामध्ये आपल्याला झोपेमध्ये पडलेल्या स्वप्नांमधून काय संकेत मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर बंद डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत असे याच अनुषंगाने म्हटले जाते. आजच्या या लेखामध्ये आपण स्वप्नातून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ काय होतो याविषयी थोडक्यात आढावा पाहणार आहोत.

आग : स्वप्नामध्ये अनेकदा अपघाताचे दृश्य दिसते. स्वप्नामध्ये जर तुम्ही तुमच्या घराला लागलेली आग पाहिली किंवा कपडे जळताना पहिले तर परेशान होण्याची आवश्यकता नाही. कारण हा अशुभ नसून शुभ संकेत आहे. असे स्वप्न पडल्यास समजून जावे कि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार असून येणाऱ्या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.

मल त्याग : तसे तर स्वप्नामध्ये मलमूत्र त्याग करतानाचे दृश्य दिसणे दुर्मिळ आहे म्हणा. परंतु कदाचित जर तुम्ही स्वप्नात स्वतःला मलमूत्र त्याग करताना जर पहिलेच तर समजून जा कि तुम्ही भविष्यासाठी बनवलेल्या योजना सफल होणार आहेत. तसेच तुमच्या भविष्याचा आराखडा उज्वल असणार आहे.

स्वप्नात प्रसाद खाणं – 

ईश्वराच्या प्रसादाला खूपच शुभ मानले आहे. असे म्हणतात की स्वप्नात प्रसाद बघण्याचा अर्थ धनाशी जुडलेले असते. असे म्हणतात की जर एखाद्याने असे स्वप्न बघितले तर त्यामुळे त्यांना अफाट धनाची प्राप्ती होण्याचे योग संभवतात. म्हणून या स्वप्नांना परिवर्तनशील मानले आहे. असे म्हणतात की हे स्वप्न बघितल्यावर भगवान श्री विष्णू यांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य द्यावा.


 मोर नृत्य –

स्वप्नांत जर आपण स्वतःला निसर्गाच्या मध्ये बघत असाल आणि आपल्या सामोरी एक मोर नाचताना दिसत असल्यास हे स्वप्न खूपच शुभ असतं. असे म्हणतात की हे स्वप्न बघितल्यावर धनलाभाचे योग बनतात. असे म्हणतात की असं स्वप्न कोणालाही सांगू नका. कारण कोणाला जर या स्वप्नाबद्दल संगितले तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणून प्रयत्न करा की हे स्वप्न बघितल्यावर ॐ श्री श्रीआये नमः मंत्राची 11 जपमाळ करा.

भाताचे सेवन : स्वप्नामध्ये तुम्ही जर जेवण करत असाल आणि त्यामध्ये भात खात असाल तर तुम्हाला अचानकपणे धनप्राप्ती होणार असल्याचा संकेत यामधून प्रप्त होतो. तसेच स्वप्नामध्ये तांदूळ किंवा तांदुळाचे शेत, तांदुळाच्या गोण्या दिसल्या तरी याचा अर्थ तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे असा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published.