क्रिस्पी पनीर कॉर्न, चविष्ट डिश घराच्या घरी तयार करा

पाहुणे येत आहे किंवा पटकन काही चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर कितीदा गोंधळ उडतो की आता काय करावं तर अशात पनीर रोल बनवा. अगदी सोपी रेसिपी आहे जी चविष्ट तर आहे, आणि चटकन तयार होणारी आहे. मुले देखील खूप चवीने खातात. 

साहित्य –

100 ग्रॅम किसलेले पनीर, 1/2 कप कॉर्न किंवा मक्याचे दाणे, 8 ब्रेड स्लाइस, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 लहान चमचा काळी मिरपूड, 2 चमचे लिंबाचा रस, 3 चमचे कोर्नफ्लोर, 1 चमचा टोमॅटो सॉस, मीठ चवीप्रमाणे, तळण्यासाठी तेल.   

कृती – 

एका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर या मध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, काळी मिरपूड आणि लिंबाचा रस घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. नंतर या पॅनमध्ये कॉर्न, पनीर, सॉस आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तयार मिश्रणाला थंड होऊ द्या.

एका भांड्यात कोर्नफ्लोर, थोडंसं मीठ आणि पाणी मिसळून दाटसर घोळ तयार करा. कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. ब्रेड स्लाइसचे कडे कापून या ब्रेडला लाटून घ्या. या स्लाइस मध्ये तयार केलेले मिश्रण 1 -2 चमचे भरून गोल गुंडाळी करा. या रोलला कोर्नफ्लोरच्या मिश्रणात बुडवून तेलात तळण्यासाठी टाका. सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे सर्व रोल तयार करून तळून घ्या. गरम रोल हिरवी चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.

पनीर चिली -Paneer chilli Dry

साहित्य:

२०० ग्रॅम ताजे पनीर

१ कप उभा चिरलेला कांदा

१ कप भोपळी मिरची उभी चिरून

६-७ लसूण पाकळ्या चिरून

२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
 १ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून  मिरपूड

१/४ कप डार्क सोया सोस

३  टेबलस्पून कॉर्नफ्लोर

मीठ चवीप्रमाणे

१ चिमुट अजिनोमोटो
तेल

कृती:

१. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.

२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.

३. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.

४. पनीरचे तुकडे घालून परता.

५. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी,  ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर  होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच Serve करा.

Leave a Reply

Your email address will not be published.