दुकानात बोला हे दोन शब्द दुकानासमोर ग्राहकांची रांग लागेल

ॐ नमः शिवाय
मित्रांनो आपल्याला जीवनात सफलता मिळावी असे कोणाला वाटत नाही असे नाही. मग ती व्यक्ती बिजनेसमन किंवा सरकारी नोकरी करणारी असो किंवा खाजगी ठीकनि काम करणारी असो. मित्रांनो प्रत्येकाला जीवनात यश मिळवण्याची इच्छा असते.

परंतु कोणत्याही कामात मेहनती सोबतच सकारात्मक ऊर्जा देखील खूप महत्त्वाची असते. जर तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा अभाव असेल. तर जीवनात यश प्राप्त करणे खूप कठीण होऊन जाते. म्हणून मित्रांनो नेहमी सकारात्मक रहा. आणि कामात अपयश आले तरी आशावादी रहा. आजची माहिती खासकरून त्या लोकांसाठी आहे.

ज्यांना व्यापारात वृद्धी करायची आहे. अनेकवेळा असे होते की आपण मेहनतीने एक एक पैसा गोळा करून नवीन व्यापार धंदा सुरू करतो. एखादे दुकान टाकतो. परंतु मनासारखि विक्री होत नाही. अनेकवेळा आपण बघतो की एखाद्याच्या दुकानात अगदी आपल्या शेजारच्या दुकानात सुद्धा ग्राहकांची भरपूर गर्दी असते.

पण आपल्या दुकानात एकही ग्राहक येत नाही. किंवा काही मोजकेच ग्राहक येतात. परंतु वस्तू न घेता ते तसेच निघून जातात. कधी कधी तर व्यापारात तोटा होत असल्याने दुकान कायमचे बंद करण्याची सुद्धा वेळ येते. मित्रांनो जर तुमच्या सोबत सुद्धा असेच होत असेल तर याचे कारण तुमच्या कुंडलीतील ग्रह दशा सुद्धा असू शकते.

तुम्हाला सुद्धा वाटत असेल की माझा व्यापार धंदा दुकान चांगले चालावे. दुकानात भरपूर ग्राहक यावेत. तर मित्रानो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो उपाय अतिशय सोपा आहे यासाठी तुम्हाला दोन तीन झेंडूची फुले घ्यायची आहेत. मित्रानो लक्षात ठेवा ही झेंडूची फुले पिवळ्या रंगाची असायला हवीत.

सकाळी लवकर उठून स्नान करून ही फुले पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहेत. आणि त्या नंतर याच फुलांन मधील काही पाकळ्या घेऊन त्या चंदना सोबत आपल्याला घासायच्या आहेत. त्यात थोडी हळद सुद्धा मिक्स करावी. त्या नंतर मित्रानो आपन जे हे मिश्रण तयार केलेले आहे या मिश्रणाने जेव्हा तुम्ही दुकानात.

ऑफिसमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असाल त्यावेळी पूर्वेकडे तोंड करून हा तिलक आपल्या कपाळावर लावूनच बाहेर पडावे. लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा घरात असताना तुम्ही हा तिलक करत असाल तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे असायला हवे. आणि दररोज अश्या प्रकारे तिलक करूनच तुम्हाला घराबाहेर पडायचे आहे.

त्या नंतर दुकानात पोहोचल्यावर दुकानात ज्या ठिकाणी तुम्ही बसता तिथे बसून तुमच्या इष्ट देवाचे म्हणजेच ज्या कोणत्याही देवावर तुमची श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण मनातल्या मनात करायचे आहे. आता मित्रानो तुम्हाला तुमची नजर तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात. तिथून ग्राहक येणाऱ्या दिशे पर्यंत फिरवायची आहे.

आणि पुन्हा ग्राहक येणाऱ्या स्थाना पासून तुमची बसण्याच्या जागे पर्यंत फिरवावी. तुम्ही जेव्हा अश्या प्रकारे नजर फिरवत असाल त्यावेळी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. मंत्र खूप प्रभावशाली आहे. मंत्र आहे ॐ आकर्षाय स्वाहा मित्रांनो तुम्हाला मनातल्या मनात हा मंत्र जपायचा आहे. आणि मनातल्या मनात कल्पना करायची आहे.

की ग्राहक तुमच्या दुकानात येत आहे. मित्रांनो हा उपाय खूपच प्रभावशाली आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा मित्रानो प्रयत्न आणि भगवंताच्या कृपेने तुम्हाला यश नक्की मिळेल. भगवंताचे नाव व भक्ती यामुळे जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल बाधा असेल ती नक्की दूर होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.