रोज सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पदार्थ… हेच आहे निरोगी आरोग्याचं रहस्य…

असं म्हणतात, कितीही महत्त्वाचं काम आले तरीही ती बाजूला सारून आधी सकाळच्या नाश्त्याला प्राधान्य द्यावं. कारण, सकाळच्या नाश्त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो.

थ कवा जाणवू नये आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा आहे.

पण सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्लं पाहिजे? असा रोजचा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर आम्ही ही समस्या सोडवण्यास तुमची थोडीशी मदत करू शकतो.

काही हे ल्दी फूड्सची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये पौ ष्टिक पदार्थांचा समावेश करावा, हे तसं सर्वांनाच माहिती आहे.

पण रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचं सेवन केल्यास त्याचा शरीरास सर्वाधिक फायदा होईल, हे तुम्हाला माहीत आहे का? तर आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया.

दिवसाची पौ ष्टिक सुरुवात

मध आणि कोमट पाणी एकत्रित करा आणि ते प्या. या पेयापासून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

सकाळच्या नाश्त्यात जीवनसत्त्वे, प्रो टीन, फाय बर आणि ओ मेगा-3 फॅ टी अ‍ॅ सिड असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा.

अंडी, पनीर, सबजा, बदाम, फळांचा सकाळच्या नाश्त्यात अवश्य समावेश करावा.

फळांमध्ये विशेषतः संत्रे, पपई खाणं सर्वाधिक फायदेशीर ठरेल.

सकाळचा नाश्ता शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आतापर्यंत तुम्ही कित्येकदा अनुभवलं असेलच.

नाश्ता केवळ आपलं आरोग्य निरो गी ठेवण्याचं काम करत नाही तर यामुळे मोठमोठ्या आजा रांपासून देखील बचाव होतो.

जाणून घेऊया सकाळी कोणते अन्नपदार्थ खाल्ल्यानं अधिक फायदे मिळू शकतात…

सफरचंद आणि संत्रे

एक का होईना पण दिवसभरात फळ खाणं अतिशय गरजेचं आहे. महत्त्वाचे म्हणजे फळांचा समावेश सकाळच्या नाश्त्यामध्ये केला तर अगदीच उत्तम.

यातही सफरचंद आणि संत्र्यांचं सेवन केल्यास ऊर्जा मिळण्यासह तुमच्या शरीरातील रो ग प्रतिका रकशक्ती देखील वाढते.

संत्र्यामुळे प चन प्रक्रिया योग्य रितीने होते. शिवाय, चया पच प्रक्रियाही चांगली राहण्यास मदत होते.

कोमट पाणी आणि मध

सकाळची सुरुवात मध आणि कोमट पाणी प्यायल्यास सर्वात उत्तम. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून पिणं फायदेशीर ठरेल.

यामुळे तुमचं वज न नियंत्रणात राहील. सोबतच रो ग प्रतिका रकशक्ती देखील वाढते. शरीर डिटॉ क्स करण्यातही या पेयाची मदत होते. मध आणि कोमट पाण्यामुळे कित्येक रो गांपासून तुमचा बचाव होतो.

बदाम

सकाळी रिकाम्यापोटी बदाम खाल्ल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो.

रात्री बदाम भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे सर्वाधिक फायदे शरीराला मिळतात.

बदामामध्ये शरीरासाठी पो षक असे व्हिटॅ मिन, मॅग निज, प्रो टीन फाय बर आणि ओमे गा 3 फॅ टी अ‍ॅ सिड असे घटक आहेत.

सब्जा

सब्जामध्ये प्रो टीन, फा यबर, कॅल्शि अम आणि ओ मेगा 3 फॅ टी अ‍ॅ सिड प्रचंड प्रमाणात असतात.

विशेषतः वज न घटवण्यासाठी सब्ज्याचा आहारात समावेश केला जातो. तसंच यामुळे शरीराची रो ग प्रति कारक यंत्रणा देखील चांगली राहते.

अंडे आणि पनीर

अंड आणि पनीर दोन्ही शरीरासाठी पो षक आहेत. जर तुम्हाला अंड आवडत नसेल तर पनीरचा आवर्जून समावेश करावा.

सकाळच्या नाश्त्यात अंडी आणि पनीर खाल्ल्यास प्रो टीन आणि कॅल्शि अम पुरेशा प्रमाणात शरीराला मिळतात. व जन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी दोन्ही पदार्थ फायदेशीरच ठरतील.

रिकाम्या पोटी काय खाऊ नये

टोमॅटो

त्वचेसाठी टोमॅटो अतिशय उपयोगी आहे. पण टोमॅटो कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण यामध्ये अ‍ॅसि डचं प्रमाण अतिशय आहे.

रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्यास पि त्त होतं आणि यामुळे प चन प्रक्रियेवर परिणाम होतो.

फ्रु ट जॅ म

अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये जॅम आणि ब्रेड खाण्याची सवय असते. ही सवय वेळीच नियंत्रणात आणल्यास याचा शरीराला फायदा होईल.

कारण ब्रेड जॅम शरीरासाठी पो षक नसून हानि कारक आहेत. यामध्ये कॅ लरीज आणि साख रेचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे रिकाम्या पोटी ब्रेड-जॅम खाणं टाळा.

दही

आरोग्याच्या दृष्टीनं दही खाणं फायदेशीर असलं तरीही रिकाम्या पोटी  खाऊ नये. कारण याचे प चन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतात.

दुपारच्या वेळेस दही खाणं कधीही उत्तम. पण नेहमी ताज्या दह्याचंच सेवन करा. मुळातच याची चव आंबट असल्यानं शिळं दही खाणं शक्यतो टाळा.

शरीररूपी यंत्र सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सकाळच्या  नाश्त्यात पौ ष्टिक पदार्थांचा समावेश करण्यास विसरू नका. खा हेल्दी आणि राहा हेल्दी.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत जरूर शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.