‘असे’ काढा शरीरावरील अनावश्यक केस…

आजकाल शरीरावरच्या खाजगी भागातील अनावश्यक केस काढून टाकणे ही केवळ फॅशन राहिली नसून शारीरिक स्वच्छतेचा तो एक भाग झालाआहे.

शारीरिक स्वच्छते बरोबरच शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकल्यामुळे तुमची त्वचा अधिक आकर्षक आणि देखील दिसू लागते.

आजकाल शरीरावरील हे अनावश्यक केस काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज जाणून घेऊया अशाच काही सोप्या उपायांबद्दल…

शेव्हींग करणे

आजपर्यंत शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी रेझर द्वारे केस शेव्ह करणे हिच एक लोकप्रिय पद्धत होती.

आजकाल बाजारामध्ये 2 ते 5 ब्लेडचा सेट असलेले रेझर सहज उपलब्ध होतात. ओल्या त्वचेवर हे रेझर फिरवून तुम्ही सहजपणे तुमच्या शरीरावरील केस काढू शकता. केस काढण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर शेव्हींग जेल सुद्धा लावू शकता.

केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने शेव्हींग करावे व नंतर उलट्या दिशेने रेझर फिरवावे ज्यामुळे तुमची त्वचा अगदी मुलायम होते.

हात, पाय व खाजगी भाग जसे की बिकनी भागातील केस काढण्यासाठी शेव्हींग हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

इलेक्टॉनिक रेझर व एपिलेटर देखील चांगलं कार्य करतात. फक्त हे वापरण्यापूर्वी तुम्हाला त्वचा ओली करण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेवरुन हे रेझर मशिन फिरवता तेव्हा त्या मशिनखाली येणारे केस मशिनमधील रोटींग ब्लेड द्वारे कापले जातात.

तोटा

केस शेव्हींग केल्यामुळे इनग्रो व्हन केसांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. ही समस्या बिकनी भागातील दाट केसांच्या बाबतीत जास्त निर्माण होते. तसेच तुम्हाला अनावश्यक केसांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज केस शेव्ह करावे लागते.

फायदा

दररोज रेझर वापरणे सुरक्षित असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार केस शेव्ह करु शकता. हा पर्याय स्वस्त असून सोपा असल्यामुळे तुम्ही तो घरच्या घरी वापरु शकता. शेव्हींग केल्यामुळे तुमच्या अंड रआर्मचा दुर्गंध कमी होतो. उदा. एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की रेझर ने केस शेव्ह केल्यामुळे साबणाने स्वच्छ केलेल्या भागाचा परिणाम ४८ तासानंतरही टिकतो व दुर्गंध कमी येतो. पण हा परिणाम केस कात्रीने कापल्यावर दिसून आलेला नाही.

वॅक्सिंग

शरीरावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग हे तंत्र देखील वापरण्यात येते. यामध्ये हार्ड व सॉफ्ट वॅक्स असे दोन भाग आढळतात. शरीरावरच्या कोणत्या भागाचे वॅक्सिंग करायचे आहे यावरुन यातील कोणता प्रकार वापरायचा हे ठरते.

नाक, अंडरआर्म व बिकनी या भागातील केस काढण्यासाठी हार्ड वॅक्स वापरण्यात येते. यासाठी गरम केलेले हॉट वॅक्स केसांच्या ग्रोथच्या दिशेने लावून थंड केले जाते. त्यानंतर त्यावर एक कापडी पट्टी लावून ती विरुद्ध दिशेने ओढून वॅक्स काढले जाते. या तंत्रामुळे त्या वॅक्ससोबत त्या पट्टीला शरीरावरचे केस देखील चिकटून काढले जातात.

सूचना

जर तुम्ही रेटी नॉइड्स असलेले अँटी एजींग क्रीम वापरत असाल तर हॉट वॅक्स वापरु नका कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पेशी देखील निघून जातात व तुमची त्वचा संवेदनशील झाल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.

हात, पाय व पाठीसाठी सॉफ्ट वॅक्स वापरण्यात येते. हे वॅक्स थंड असून हार्ड वॅक्स पेक्षा पातळ असते. त्यामुळे ते सहज पसरते व शरीरावरचे केस काढण्यासाठी उत्तम असते.

वॅक्सिंग केल्यावर दोन ते सहा आठवडे तुमची त्वचा मुलायम रहाते. अर्थात हे तुमच्या केसांची वाढ किती जलद आहे व तुमच्या अंगावर किती प्रमाणात केस येतात यावर अवलंबून असते.

फायदा

वॅक्सिंग मुळे केस मुळासकट बाहेर येत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर पर्यायांपेक्षा अधिक टिकतो.

तोटा

जर तुम्हाला वॅक्सची ऍल र्जी असेल तर मात्र वॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवर लालसर पुरळ, खाज, फोड अथवा सूज येऊ शकते. वॅक्सिंग करताना वेदना होतात त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वॅक्सिंग करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार नक्की करा.

थ्रे डींग

भारतामध्ये आयब्रो व चेहऱ्यावरील इतर भागातील केस काढण्यासाठी थ्रे डींग करण्यात येते. या प्राचीन हेअर रिमुव्हल तंत्रानूसार तोंडामध्ये दोऱ्याचे एक टोक पकडून हाताने दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाकडील भागाच्या सहाय्याने एखाद्याच्या चेहऱ्यावरील केस ओढून काढण्यात येतात. ही हालचाल तज्ञ व्यक्तीद्वारे जलद गतीने करावी लागते. तुम्ही स्वत: देखील हे तंत्र वापरु शकता पण प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेणे नेहमीच चांगले.

आयब्रो व अप्पर लिप साठी थ्रे डींग करणे फायद्याचे ठरते. आयब्रो चांगल्या कोरल्या जाव्यात यासाठी अनुभवी ब्युटीशियन कडेच जा नाहीतर तुमच्या आयब्रोचा आकार बिघडण्याची शक्यता असते. या तंत्राचा परिणाम देखील तुमच्या केसांच्या वाढीनूसार २ ते ३ आठवडे टिकू शकतो.

फायदा

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी ही एक सोपी व स्वस्त पद्धत आहे. तुमच्या आयब्रोचा आकार चांगला झाल्यामुळे तुम्ही अधिक आकर्षित दिसू लागता.

तोटा

थ्रे डींगमुळे वेदना होतात व लालसर पुरळ देखील येते. तसेच यामुळे हा यपो व हा यपर पिगमें टेशन होते. दाह होतो.

हेअर रिमुव्हल क्रीम

या क्रीममधील केमि कल त्वचेमध्ये मुरते. यासाठी ज्या भागामधील केस काढायचे असतात त्या भागावर या क्रीमचा पातळ थर लावावा. 3ते 5 मिनीटांनी अथवा त्या प्रॉडक्टवर दिलेल्या सूचनेनूसार प्लास्टिक पट्टीने अथवा ओल्या फडक्याने खालून वरच्या दिशेने ते क्रीम पुसून काढावे. त्यानंतर त्वचा धुवून कोरडी करावी.

हेअर रिमुव्हल क्रीम शरीरावर कोणत्याही भागावर लावता येते. पण त्याचा वापर अप्परलीप, अंड रआर्म व बिकनी या भागात करणे फायदेशीर ठरते.

तुम्ही आठवड्यातून एकदा हे क्रीम वापरु शकता. मात्र लक्षात ठेवा कोणतीही हेअर रिमुव्हल पद्धत एकदा वापरल्यावर पुन्हा वापरण्यापूर्वी कमीतकमी 72 तासांची वाट पहा.

फायदा

हेअर रिमुव्हल क्रीम वापरणे वेदनादायक नसल्याने, त्यामुळे कोणतीही जखम होत नसल्याने व तुम्ही ही पद्धत स्वत: घरी देखील वापरु शकत असल्याने फायदेशीर ठरते.

तोटा

काही लोकांना हेअर रिमुव्हल क्रीमची ऍल र्जी असते. त्यामुळे त्यांना या क्रीमचा वापर केल्यास लालसर पुरळ येणे, जळजळ व वेदना होतात. यासाठी ही क्रीम वापरण्यापूर्वी विशेषत: जर तुम्ही ही पद्धत प्रथम वापरत असाल तर कमीतकमी 24 तास आधी एक पॅच टेस्ट जरुर करा. तसेच अशा हेअर रिमुव्हल क्रीमला एक प्रकारचा उग्र वास येतो व क्रीम वापरल्यावर तो वास तुमच्या त्वचेवर देखील काही तास रहातो.

लेझर

जर तुम्हाला शरीरावरचे केस कायमस्वरुपी काढून टाकायचे असतील लेझर असि स्टेड हेअर रिमूव्हल (एल एच आर) हे तंत्र अधिक फायदेशीर आहे. चांगल्या परिणामांसाठी हे उपचार डर्माटो लॉजिस्ट, फिजि शियन किंवा नॉन फिजि शियन करून घ्या. या पद्धतीमध्ये फोटोथ र्मोलेसिस या तत्वावर कार्य केले जाते. ज्या तंत्राद्वारे त्वचेखाली इतर टीश्यूचे नुकसान न करता केस असलेल्या काही विशिष्ट टीश्यूजनां नष्ट करण्यात येते.

आजकाल हे तंत्र सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी उपलब्ध आहे. या पद्धतीसाठी रुबी लेझर, अलेक्झां ड्राइट लेझर, डिओड लेझर, इंटे न्स पल्सड लाईट लेझर अशा अनेक प्रकारचे लेझर वापरता येतात.

समाधानकारक परिणामांसाठी तुम्हाला एका पेक्षा अधिक उपचारांची गरज लागू शकते. सहा महिन्यांनी केलेल्या शेवटच्या उपचारानंतर तुमच्या शरीरावरचे 30 ते 50 टक्के केस कमी होतात.

लेझर ट्रीटमेंटचे दुष्परिणाम

त्वचेवर लालसर पॅच उठणे.

उपचार न केलेल्या भागातील केसांमध्ये वाढ होणे असे क्वचित घडते पण या उपचारांचा हा एक दुष्परिणाम होऊ शकतो.

माहिती आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.