फक्त 1 बटाटा चेहरा इतका उजळेल की तुम्ही दिवसभर आरशात पहात बसाल

मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच लोकांचे वजन हे कमी असते. पण ते वयापेक्षा जास्त वयस्कर दिसत असतात. तुमच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या मुळे तुमचे वय जास्त वाटते. बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. काळे डाग पडतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही. अनेक उपाय करून सुद्धा पिंपल्स फुटकुल्या कमी होत नाहींत.

चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही. कोणत्याही क्रीम त्यावर लावल्या तर ते कमी होण्याऐवजी त्या वाढतच जातात. अश्या प्रकारच्या अनेक समस्या भिडसावत असतात. या सर्व समस्या मुळे तुमचा चेहरा काळा पडू लागतो. या समस्येवर आज आम्ही तुम्हाला एक चांगला गुणकारी उपाय सांगणार आहोत.

या उपायाने तुमचा चेहरा उजळ चमकदार आणि तेजस्वी होईल. आजचा हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि तो घरच्या घरी करू शकता. या उपायांसाठी तुम्हाला एक फेशियल क्रीम तयार करायची आहे. आणि या क्रीम चा वापर करून तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर बनवायचा आहे. हा फेशियल पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे बटाटा.

बटाटा हा सर्वांच्या घरी उपलब्ध असतो. आपल्याला घरातील उपलब्ध साहित्याचा उपयोग करून या बटाट्याचा रस काढायचा आहे. एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि तो बटाटा खिसणीवर खिसून घ्या. आणि त्याचा रस काढायचा आहे. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. काळे डाग असतात मुरूम येतात.

त्या लोकांनी आंघोळी नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि नियमित थंड पाण्याने चेहरा धुतला तर चेहऱ्यावर पिंपल्स येणे बंद होईल. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वांग आहेत. अश्या व्यक्तींनी कच्च अक्रोड चा रस त्या वांगाच्या डागावर लावला. तर वांग कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

आपण आपल्या फेस पॅक साठी दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या डाळीचे मुगाचे पीठ. हिरव्या मुगाची डाळ ही प्रत्येकाच्या किचन मध्ये उपलब्ध असते. मुगाची डाळ मिक्सर मध्ये बारीक करून त्याचे पीठ बनवायचे आहे. मुगाच्या डाळीमध्ये झिंक आणि पोटॅशियम हे दोन घटक असतात.

हे घटक चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी काढून नवीन त्वचा बनवण्यासाठी मदत करतात. या मध्ये असलेल्या व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C मुळे आपली त्वचा ही सुरक्षित राहते. आपण काढलेल्या बटाट्याच्या रसा मधून आपल्याला चार चमचे रस घ्यायचा आहे. आणि चार चमचे बटाट्याच्या रसा मध्ये एक चमचा मुगाचे पीठ हे मिक्स करायचे आहे.

आणि हे दोन्ही घटक एकत्र होऊ पर्यंत चमच्याने चांगले एकजीव करायचे आहे. हे मिश्रण मिक्स करून झाल्यावर दहा ते वीस मिनिटे ठेवून द्यायचे आहे. आता हा तुमचा फेस पॅक तयार झालेला आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून गोलाकार प्रकारे मसाज करायचा आहे. चेहऱ्यावर लावलेला हा फेस पॅक साधारणता पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवून.

चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हा फेशियल पॅक तुम्हाला आठवड्यातुन 3 ते 4 वेळा लावायचा आहे. याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत. मित्रांनो काही व्यक्तीची त्वचा ऑईली असते. तर अश्या लोकांनी बटाट्याचा रसामध्ये थोडेशे मध मिक्स करायचे आहे. आणि त्वचा कोरडी असेल तर बदामाचे तेल मिसळावे.

हा उपाय चेहऱ्यावर केल्याने तुमचा चेहरा सुंदर आणि तजेलदार तेजस्वी दिसणार आहे. चांगला परिणाम मिळवण्यासाठी हा उपाय आठवड्यातुन तीन ते चार वेळा करायचा आहे. आणि हा उपाय सलग दोन महिने करावा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.