फक्त 1 कांदा केस इतके वाढतील की तुम्ही लोकांना सांगून सांगून थकाल केस घनदाट होतील

कोणाचेही लांबसडक आणि घनदाट केस पाहिल्यावर नक्कीच आपल्याला पण असे केस हवे असं वाटतंच. पण मोठ्या केसांची निगा राखणं आणि केस घनदाट बनवणं हे नक्कीच सोपं काम नाही. चमकदार केसांसाठी अनेक जण नारळाचे तेल अंडे आणि बिअर मास्कचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का.

लांबसडक आणि घनदाट केसांसाठी तुम्हाला घरातील कांद्याचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो. कांद्याच्या रसाने बनलेला हेअरमास्क वापरल्याने केस अधिक चमकदार आणि घनदाट होतात. तसंच याचा कोणताही तोटा होत नाही. आजकाल अनेक सलॉनमध्येही कांद्याच्या रसाचा वापर करण्यात येतो.

पण पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये घालण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीही याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ शकता अथवा नियमित कांद्याच्या रसाचा वापर करून तुम्ही तुमचे केस अधिक घनदाट करू शकता. घनदाट केसांसाठी नक्की कांद्याच्या रसाचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

हेअरमास्क बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत खास तुमच्यासाठी. सुंदर केसांसाठी कांदा हा फार फायदेशीर असतो. कांद्याचा अर्क हा केसांच्या वाढीसाठी फारच चांगला असतो. म्हणूनच हल्ली कांद्याचा तेल कांद्याचा पॅक आणि कांदा सीरम असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. सुंदर जाड सिल्की केसांसाठी कांद्याचा उपयोग करायचा विचार करत असाल.

तर तुम्ही कांदा पावडरचा उपयोग करु शकता. कांद्याची पावडर बाहेरुन आणायची गरज नाही ही कांदा पावडर तुम्ही घरीच करु शकता. कांदा पावडर बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर कांद्याच्या रसाचा हेअरमास्क बनवून त्याचा नक्की कसा वापर करायचा ते जाणून घेऊया. तुम्ही घरच्या घरी ही पद्धत वापरू शकता.

2 चमचे कांद्याचा रस आणि 2 चमचे कॅस्टर ऑईल मिक्स करा. कांद्याचा रस काढून घेतल्यावर जास्त वेळ जाऊ देऊ नका. कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑईल मिक्स करून त्यामध्ये कापूस बुडवा. कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण तुम्ही केसांना लावा.

तुमच्याकडे ग्लोव्ह्ज असतील तर तुम्ही त्याचा वापर करा. या मिश्रणाचा वापर केसांवर करून झाल्यावर 20 ते 25 मिनिट्स तुम्ही तसंच राहू द्या. त्यानंतर माईल्ड शँपूचा वापर करून केस धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही कांद्याच्या रसाच्या हेअरमास्कचा असा उपयोग करून घेऊन शकता

हेअरमास्क बनविण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसासह कॅस्टर ऑईलचा वापर करा. कॅस्टर ऑईल हे केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणारे रिकोनोलेईक अॅसिड आणि ओमेगा 6 हे रक्तप्रवाह चांगला राखण्यास मदत करते. केसांना मुलायम आणि मऊ राखण्यासाठीही याचा खूपच फायदा होतो.

त्यामुळे कांद्याच्या रसासह मिक्स करून तुम्ही याचा उपयोग करून घ्या. याचा परिणाम तुम्हाला काही महिन्यातच दिसून येईल. तुमचे केस पटापटा वाढायला सुरूवात होऊन घनदाटही होतील. इतकंच नाही तर केसगळती थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा याचा नक्की उपयोग करून घ्या.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.