फक्त 2 दिवसात मुतखडा विरघळून जाईल तुम्हाला विश्वास बसणार नाही

मुतखड्याचा त्रास अनेकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात.
मुतखड्याच्या त्रासात पोटात, कंबरेत असह्य वेदना होत असतात. शरीरातील खनिजे क्षार युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो.लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

पाणी

किडनीमध्ये मुतखडे होण्यापासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन मुतखडे धरणार नाहीत.

शहाळ्याचे पाणी

मुतखड्याचा त्रास असल्यास आहारात शहाळ्याचे पाणी जरूर असावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे विरघळून निघून जाण्यास मदत होते.

कांद्याचा रस

कांद्याचा रस दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.

तुळस

तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

ऍपल व्हिनेगर

ऍपल व्हिनेगर दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास मध्ये मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन ते निघून जातात.

कुळथाचं कढण

मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.

पानफुटी

पानफुटीची दोन पाने सकाळी चावून खाण्यामुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.

डाळिंबाचा रस

डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस मुतखड्यामध्ये प्रभावी ठरतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.