फक्त 5 सोमवार करा हे व्रत कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण

पूर्ण वर्षातुन ,महिन्यातून कोणतेही 5 सोमवार निष्ठने , भक्ती भावाने, मनोभावे केले तर भोळेबाबा,श्री शंकर ,देवादी देव महादेव आपल्या मनातील कोणत्याही इच्छा, मनोकामना पूर्ण करतात.

तुमच्या मनात अनेक वर्षे एखाद्या इच्छापूर्तीची आतुरता असेल पण काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर हे 5 सोमवार पशुपती व्रत अवश्य करा. शिवपूरान, स्कंदपुराणात पशुपती या व्रतातचे अनेक नियम सांगितले आहेत. हे व्रत करणाऱ्या साधकाने काय करावे, कुठले दान करावे ही सविस्तर माहिती आज तुम्हांला सांगणार आहोत. आजच्या काळात नियम पाळणे शक्य नाही . सोप्या भाषेत शास्त्ररास मान्य होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत हे व्रत आज सांगत आहोत.

कोणत्याही महिन्यार सुरवात करून सलग 5 सोमवार हे व्रत करावे. व्रत करताना अडचण आली ,मासिक धर्म आला असेल तर पुढील सोमवार पकडून हे व्रत करावे. प्रत्येक सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठावे.स्नान वैगरे करावे. सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्याला अर्ध्य म्हणजे तांब्याचा तांब्यात पाणी घेउन दोन्ही हात वर करून सूर्याला पाणी अर्पण करणे.अर्ध्य देताना ओम सुर्याय नमः हा जप करावा.

तुमच्या घराशेजारी असणाऱ्या शिव मंदिरात जावे. भगवान श्री शंकराची , भोळेबाबाची , शिवलिंगाची प्रार्थना करावी. जल अर्पण करावे. त्यासाठी पाणी आपल्याच घरातील न्यावे मंदिरातील पाणी अजिबात घ्यायचे नाही. श्री शंकराला आवडणाऱ्या वस्तू न्याव्या.

श्री शंकर ,भोळेबाबांना बेलपत्रक खुप आवडती आहेत. भोळेबाबाची पूजा करा. 108 बेलपत्रक शिवलींगवर पालथी ठेवावीत. 108 वेळा ” ओम नमो शिवाय” हा जप किंवा मंत्र म्हणावा. महिलांनी “नमो शिवाय” हा जप करावा.

शिवलिंगावर पूजा,अभिषेक जेवढं करता येईल तेवढं करावे.
पूजा करताना आपली इच्छा शिवलिंग समोर बोलून दाखवावी.
त्या दिवशी म्हणजेच सोमवारी उपवास करावा. फक्त फळआहार घ्यावा.

संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा पूजा करा.पुन्हा शिवमंदिरात जावे. जाताना घरूनच 6 तुपाचे दिवे सोबत न्यावे. साखर किंवा मिठाई न्यावी.शिवलिंगाची पूजा करावी. सकाळी प्रार्थना केली असेल तरीही संध्याकाळी पुन्हा प्रार्थना करा. तुम्हाला यश,सुख समृद्धी, वैभव ,आरोग्यासाठी प्रार्थना करा.

6 दिव्यापैकी 5 दिवे प्रज्वलीत करा. प्रार्थना करा. जे काही सोबत गोड नेले असेल तर त्याचे 3 भाग करा. 2 भाग शिवशंकराला अर्पन करा. 1 दिवा आणि मिठाईचा एक भाग घरी घेउन या. घरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीच्या उजव्या हाताला उंबऱ्याजवळ तो एक दिवा प्रज्वलीत करावा. मिठाईचा घरी आणलेला एक भाग कुटूंबासोबत प्रसाद म्हणून खावा.

5 सोमवार हे व्रत मनोभावे, भक्तिभावाने ,पूर्ण श्रद्धेने हे व्रत कुणीही करू शकता. तुमच्या घरात दारिद्र्य, गरिबी,कोणताही दुर्धर आजार, जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करा. तुम्ही भोळेबाबाचें भक्त नसाल कधी पूजा करत नसाल तरीही हे व्रत करू शकता.
इष्ठ दैवत,ग्रामदैवत ते सुद्धा शिवशंकराला मानतात. सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्री हरीविष्णू ,श्रीराम, श्रीकृष्ण, श्री तिरुपती बालाजी रुपात भोळेबाबांची पूजा करताना दिसून येतात.

मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्ती सांगितल्या प्रमाणे 6 सोमवार हे पशुपती व्रत जरूर करून पहा आणि मग फरक बघा.

Leave a Reply

Your email address will not be published.