फक्त या 10 सवई वजन इतक्या फास्ट कमी होईल की तुमचा विश्वास बसणार नाही

तुमच्या हेल्दी सवयी चांगल्या असण्याची गरज आहे एका नव्या अभ्यासामध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे. कारण डाएटिंग करून वजन कमी करणारे लोक हे पहिल्याच वर्षात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वजन वाढवून घेतात. बाकीचं वजन पुढच्या तीन वर्षांमध्ये वाढतं. पौष्टीक जेवण कमी खाणं आणि जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहणं.

या तीन गोष्टींमुळे आपलं वजन व्यवस्थित राखू शकतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. हे खरंतर अजिबात कठीण नाही. तरीही लोक प्रत्यक्षात मात्र आणू शकत नाहीत. आपण रोजच खाण्यासंदर्भात काही ना काही तरी असे 100 निर्णय घेत असतो. आपल्याला आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी जे काही खात असतो.

त्याबद्दल अजिबात कल्पना नसते. सवयीनुसार आपल्यासमोर जे काही येईल ते आपण खात जातो. या बाबतीत एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला जर हेल्दी श्रेणीमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला या 10 सवयी असणं गरजेचं आहे. जलद वजन कमी करायचं असल्यास तुम्ही हे नक्की वाचा.

रोज जेवणाची एकच वेळ ठेवा अर्थात रोज जेवण एकाच वेळी जेवा. वजन कमी करण्याच्या मिशनमध्ये तेच लोक यशस्वी होतात जे रोज वेळेवर जेवतात आणि नियमितपणा पाळतात. त्यामुळे वेळेवर जेवण जेवणे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शिवाय हे लोक मधल्या वेळात स्नॅक्स आणि सतत दोन दोन तासाने खाणं टाळतात. हे लोक केवळ एक आठवडा नाही तर एक निश्चित डाएट चार्ट फॉलो करून त्याप्रमाणेच खातात. त्यामुळेच वजन कमी करण्यात त्यांना यशही मिळतं आणि त्यांचं वजन कायम आटोक्यातही राहतं.

फ्रेश असो वा फ्रोझन किंवा मग तोंडली असो कोणतीही भाजी आणि फळं यांची न्यूट्रीशनल व्हॅल्यू अर्थात पोषकता खूप जास्त असते आणि याची एनर्जी डेन्सिटी बरीच कमी असते. तुम्ही दिवसातून पाच वेळा फळं आणि भाज्या खाल्यास तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतात. यामुळे कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहायला मदत होते आणि शिवाय हृदयाशी निगडीत आजारही दूर राहतात.

जेवण करताना तुमचं सर्व लक्ष हे खाण्याच्या पदार्थावर असणं गरजेचं आहे. लवकर लवकर न चावता जेवणं करणं हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. कारण याचा परिणाम तुमच्या वजन वाढण्यावर होत असतो. त्यामुळे टेबलवर बसून हळूहळू व्यवस्थित चावून जेवायला हवं आणि चालता फिरता कधीही जेऊ नये. तुमचं लक्ष तुमच्या जेवणावर नसून इतर ठिकाणी असल्यास अन्नपचन होत नाही. त्यामुळेच जेवताना केवळ जेवावं इतर गोष्टींवर लक्ष देऊ नये. लक्ष इतर ठिकाणी असल्यास नक्की तुम्हाला किती भूक आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही.

बऱ्याचदा फळांचा रस हा निरोगी शरीरासाठी चांगला असतो असा गैरसमज आहे. पण त्याचबरोबर या फळांमध्ये साखरेचं प्रमाणही जास्त असतं हे लोक विसरून जातात. त्यामुळेच पूर्ण दिवस खूप जास्त पाणी प्या हा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. तसंच कोल्ड ड्रिंक्स पिणं टाळा आणि दिवसातून एकदा एक लहान ग्लास फळांचा रस पिणं हे चांगलं आहे.

जर तुम्हाला काम करताना एका जागी बसून राहायची सवय असेल तर ही सवय लागलीच मोडा. सतत एकाच जागेवर बसून राहणं ना तुमच्या वजनासाठी चांगलं आहे ना तुमच्या हृदयासाठी. त्यामुळे दर एका तासाने तुम्ही तुमच्या जागेवरून उठून निदान एक फेरी मारा. रोज नवी अॅक्टिव्हिटी करणं हे तुमच्या निरोगी शरीरासाठी योग्य आहे. एका जागी बसून राहिल्याने वजन केवळ वाढतच नाही तर तुम्हाला लठ्ठपणादेखील येतो. हे टाळण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एका जागेवर बसून राहणं पूर्णतः बंद करा.

काहीही खाताना ते किती खाल्लं गेलं पाहिजे हे सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याचदा एखादं खाणं आवडल्यानंतर आपल्याला किती खायला हवं हे आपण विसरून जातो. त्याचा स्वाद आपल्याला इतका आवडलेला असतो की आपण गरजेपेक्षा जास्त तो पदार्थ खातो. त्यामुळे असं होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही लहान ताटाचा वापर करा आणि पदार्थ खात असताना मध्ये मध्ये पाणी प्या. त्यानंतर पाच मिनिटांनी आपल्याला अजून किती भूक आहे याचा विचार करा किंवा तुम्हाला अजूनही भूक आहे की नाही याचा विचार करा. त्यानंतरच तुम्हाला आवडलेला पदार्थ पुन्हा दुसऱ्यांदा तुमच्या ताटात तुम्ही घ्या.

कोणतंही खाणं बाजारातून खरेदी करताना सर्वात पहिले त्याचं लेबल नक्की तपासा. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये किती फॅट्स किती साखर आणि किती मीठ आहे याचा अंदाज येईल. तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमच्याबरोबर नक्कीच चिप्स, क्रॅकर्स बिस्किट आणि मंचीज असे पदार्थ घेत असणार. पण यापुढे या सर्व खाण्याऐवजी नट्स फळं आणि मखाने यासारखे हेल्दी स्नॅक्स स्वतः बरोबर ठेवा. यामुळे तुमची भूकही भागते आणि तुमच्या शरीराला त्रासही होत नाही.

तुम्हाला खरं तर इतकं चालायला हवं की तुमचं वजन स्वतःहून कमी होईल. त्यासाठी तुम्ही एक लक्ष्य ठेवायला हवं. जसं रोज साधारणतः किमान 10000 पावलं चालायची आहेत किंवा तुम्हाला जिथे जायचं आहे तर चढण्यासाठी जिन्यांचा वापर करा. यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. तुम्हाला ज्या स्टॉपवर उतरायचं आहे त्यापेक्षा आधीचा स्टॉप उतरा आणि मग आपल्या घरी चालत जा. यामुळे वजन तर कमी होतंच शिवाय तुमच्या हार्ट रेटही वाढून तुमचं हृदय निरोगी राहतं.

याशिवाय जेवणामध्ये हेल्दी फॅट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये फास्ट फूडच्या जागी नट्स ड्रायफ्रूट्स अॅव्हाकॅडो आणि मासे यांचा समावेश असायला हवा. कारण फास्ट फूडमध्ये असणारे ट्रान्स फॅट्स हे हृदयाशी संबंधित आजाराला कारणीभूत असतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.