फंगल इन्फेक्शन झाले असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा

फंगल इनफेक्शन अथवा बुरशीजन्य इनफेक्शन ही समस्या आजकाल अनेकांना वारंवार जाणवते. फंगल इनफेक्शन तेव्हाच होतं जेव्हा बाहेरील बुरशी तुमच्या शरीरातील काही खास भागांवर कब्जा करतात. तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर तुमचे शरीर या फंगसला प्रतिकार करू शकत नाही.

आणि तुमच्या त्वचेवर याचा परिणाम होतो. फंगस अथवा बुरशी वातावरणातील हवा, पाणी, माती, वृक्षवेलींवर वाढत असते. मात्र यातील काही प्रकार हे माणसाच्या शरीरावर पोसले जातात. इतर जीवजंतूप्रमाणेच ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक नसतात. म्हणूनच अशा फंगल इनफेक्शनवर तातडीने उपचार करायला हवेत.

शिवाय फंगल इनफेक्शन वारंवार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी. जर फंगल इनफेक्शन सौम्य स्वरूपाचे असेल तर साध्या घरगुती उपचारांनीही ते पटकन बरे होऊ शकते. यासाठी जाणून घ्या फंगल इनफेक्शनवर कोणते उपाय करावे. फंगल इनफेक्शन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे.

कारण ते अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि फंगल आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे फंगल इनफेक्शनची वाढ आतून आणि बाहेरून दोन्हीकडून रोखता येऊ शकते. एका संशोधनानुसार पाण्यात डायल्युट केलेले अॅपल सायडर व्हिनेगर लावण्यामुळे यीस्ट इनफेक्शन रोखण्यात यश मिळालेले आहे. तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर निरनिराळ्या पद्धतीने वापरू शकता.

जसं की तोंडांवाटे घेण्यासाठी अथवा मलमाप्रमाणे इनफेक्शनवर लावण्यासाठी. मात्र यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर खरेदी करताना ते सेंद्रिय आणि चांगल्या दर्जाचे असेल याची खात्री करून घ्या. पाण्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. कापसाने इनफेक्शनवर हे मिश्रण लावा. पंधरा मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून टाका.

दह्यामध्ये शरीरासाठी योग्य लॅक्टो बॅक्टोरिआ असतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांमधील कार्य सुरळीत होते. दह्यातील चांगले बॅक्टेरिआ बुरशीजन्य इनफेक्शनला नष्ट करण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार दही ते आतड्यांसाठी आणि त्वचेसाठी एखाद्या अॅंटि बॅक्टेरिअल क्रीमप्रमाणे कार्य करते.

मात्र लक्षात ठेवा फंगल इनफेक्शन कमी करण्यासाठी नेहमी साधे दहीच वापरावे. ज्यामध्ये कोणत्याही रंग अथवा सुंगधाचा वापर केलेले असू नये. कारण असे सुंगधित योगर्ट वापरण्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकते. नियमित आहारात दह्याचा वापर करा. एक चमचा चांगले दही फेटून घ्या. दह्याचा वापर इनफेक्शन झालेल्या भागावर एखाद्या क्रिमप्रमाणे करा.

हळदीसारखा नैसर्गिक उपचार त्वचेवर शोधूनही सापडणार नाही. फार पूर्वीपासून हळद त्वचेवरील जखमा अथवा इतर समस्या दूर करण्यासाठी वापरण्यात येत आहे. हळदीमध्ये अॅंटि व्हायरल आणि अॅंटि फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे फंगल इनफेक्शनमधील बुरशी नष्ट होऊ शकते.

हळद अथवा अॅपल सायडर व्हिनेगर प्रमाणेच हळद थेट त्वचेवर लावू नये. हळद त्वचेवर लावताना ती नेहमी नारळाचे तेल अथवा नारळाच्या दूधात मिक्स करून लावावी. स्वयंपाकात नेहमी हळदीचा वापर करा. नारळाच्या तेलात हळद मिसळा. ही पेस्ट इनफेक्शन झालेल्या भागावर लावा. पंधरा मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून टाका.

अंघोळ करताना साबणाऐवजी जखमेवर हळदीचा वापर करा. फंगल इनफेक्शन दूर करण्यासाठी लसूण वापरणे हा थोडा कंटाळवाणमा उपाय असू शकतो. कारण लसणाला उग्र वास येतो मात्र हा तितकाच परिणामकारक उपाय आहे हे विसरू नका. लसणामध्ये अॅंटि फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

त्यामुळे फार पूर्वीपासून कोणत्याही इनफेक्शनला दूर करण्यासाठी लसणाचा वापर हमखास केला जातो. लसणामुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. यासाठीच आहारात नेहमी लसणाचा वापर करावा. एवढंच नाही तर लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याचा रसदेखील तुम्ही या इनफेक्शनवर लावू शकता.

लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याचा रस काढा. हा रस नारळाच्या तेलात अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा. इनफेक्शन झालेल्या भागावर हे तेल लावा. दोन तासाने त्वचा थंड पाण्याने धुवून टाका. दिवसभरात दोनदा हा उपाय करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.