आंब्याची साल अश्या पद्धतीने त्वचेवर वापरा पिंपल्स आणि सुरकुत्या परत कधीही येणार नाहीत

फळांचा राजा आंबा सध्या सर्वांच्या घरात विराजमान झालाय. आंब्याचा सीझन सुरू असल्यामुळे प्रत्येकाने या महिन्यात आंब्याच्या कितीतरी पेट्या फस्त केल्या असतील. पिवळा धम्मक मनमोहक सुगंध असलेला आंबा सर्वांनाच आवडतोच. त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी घरातील वृद्धांपर्यंत सर्वांना तो हवा हवासा वाटत असतो.

घरी आंबा खाऊन झाल्यावर बऱ्याचदा त्याची बी म्हणजेच बाट आणि साल फेकून देण्यात येते. झिरो वेस्टेज करणारी माणसं या गोष्टी खतांसाठी अथवा पुन्हा झाडं लावण्यासाठी वापरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का. आंब्याची साल तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकते. यासाठीच जाणून घ्या आंब्याच्या सालचे काही फायदे.

आणि त्याचा त्वचेसाठी कसा करावा वापर. उन्हाळ्यात जसे आंबे भरपूर प्रमाणात मिळतात तसंच उन्हात फिरल्यामुळे त्वचेवर टॅनिंगही वाढू लागतं. यासाठीच त्वचेवर आंबा खाल्यावर उरलेली आंब्याची साल स्किन वर चोळा आणि काही मिनीटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग हळू हळू कमी होईल.

आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणातत व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतातच शिवाय त्वचेचं रक्षणही होतं. आंब्याचा सालीचा वापर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता. त्वचेवर आंब्याच्या सालीचा फेसफॅक लावल्यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होतात.

चेहऱ्याव पिंपल्स पुन्हा येऊ नयेत यासाठी आणि पिंपल्समुळे आलेले डाग कमी करण्यासाठी तुम्ही आंब्याची साल चेहऱ्यावर लावू शकता. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात आंब्याची साल सुकवून त्याची पावडर करून ठेवू शकता. आंब्याप्रमाणेच आंब्याच्या सालातही भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात.

अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमच्या त्वचेचं हवेतील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं. सहाजिकच आंब्याच्या सालीचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. यासाठी आंब्याची साल वाटून त्याची पेस्ट तुम्ही त्वचेवर लावू शकता. आंब्याच्या सालीत त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात.

शिवाय वयोमानानुसार येणाऱ्या त्वचेवरील सुरकुत्याही यामुळे कमी होऊ शकतात. त्वचेवर सुरकुत्या येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे तुम्ही ही शारीरिक क्रिया रोखू नाही शकला तरी तिचा प्रभाव नक्कीच कमी करू शकता. फ्री रेडिकल्स, प्रदूषण आणि ताणतणावामुळे येणाऱ्या.

सुरकुत्या, त्वचेवरील काळे डाग, व्रण आंब्याची साल लावल्यास कमी होतात. यासाठी आंब्याची साल उन्हात वाळवा आणि त्याची पावडर त्वचेवर पाण्यात भिजवून लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला याचा चांगला रिझल्ट भेटेल. आणि याचे तुम्हाला भरभरून फायदे होतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.