रोज सकाळी उठल्यानंतर १ ग्लास गरम पाणी पिल्याने होतात हे फायदे

आपण दररोज सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पितो. दररोज चहा आणि कॉफी पिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागते. जसं की पोटात गॅस होणे, छातीत जळजळणे, पित्त आणि पोटदुखी या उद्दभवणार्या आजारापासून आपण सुरक्षित राहावे यासाठी आणि आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे करून घेण्यासाठी आपण रोज सकाळी गरम पाणी पिणे खूप गरजेचे आहे. आपल्या देशातील ७० टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी व ब्रेड खातात . जे आपल्या शरीरावर धोकादायक परिणाम करू शकतात.

रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने आपली पचन क्रिया सुधारते. आज कालच्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचा आहार बदलत चालला आहे. तो सात्विक आहार सोडून फास्ट फूड कडे वळला आहे.ज्यांचे सेवन केलं तर ते पचण्यासाठी खूप कठीण असतात. हे पदार्थ आपली पचनक्रिया मंद करतात व पोटाचे आजार वाढवतात. त्यामुळे अशावेळी गरम पाणी हे आपली पचनक्रिया सुधारण्यात मदत करते

जस जसे आपले वय वाढत जाते तस तस कालांतराने आपल्या चेहऱ्यावरील तेज कमी होत जाते. त्यामुळे आपले वय जास्त दिसू लागते. असे होऊ नये म्हणून आपल्या शरीरातील रक्तसंचार गतिमान असणे खूप गरजेचे आहे. म्हणून गरम पाणी प्यावे. हे पिल्याने रक्तप्रवाह सुरळीत चालतो.


आपल्या पैकी अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही कमी असते. त्यामुळे असे लोक हे लहान लहान कारणांवरून आजारी पडत असतात. आणि या मुळे ते सतत अशक्त राहतात. त्यांची तब्येत एवढ कमकुवत झालेली असते कि त्यांना सतत औषधांचे सेवन करावे लागते.
म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांना आपल्यापासुन दूर ठेवण्यासाठी रोज सकाळी गरम पाणी पिणे खूप महत्वाचे ठरते. तसेच आपल्या त्वचेवर होणारे इन्फेकशन, घामोळे, पिंपल्स, लालसर चट्टे देखील गरम पाणी पिल्याने दूर होतात.
तसेच ज्या लोकांना हाडांचे विकार आहेत त्यांचे आजारही कमी होतात. हाडांच्या जॉइंट्स मधील लुब्रिकेशन वाढल्यामुळे त्याचे घर्षणही खूप कमी होते ज्यामुळे हाडांची झीज लवकर होत नाही.

चरबी कमी होते, रोज गरम पाणी पिल्याने शरीराचे मेटॉबोलिझम वाढते. आणि यामुळे आपल्या शरीरात जमा झालेल्या अनावश्यक चरबीची वाढ कमी होते तसेच आधीपासून वाढलेली अनावश्यक चरबी देखील कमी होते.
तसेच आपले शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी रोज सकाळी गरम पाणी पिणे खूप महत्वाचे असते. ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होईल.

पोस्ट आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.