काखेतून येतोय का घामाचा दुर्गंध, तर करा हे सोपे घरगुती उपाय…

शरीरातून घाम हा यायलाच हवा ही गोष्ट खरी असली तरीही काखेतून घामाचा वास येत राहिल्यास आपल्यालाही सहन होत नाही. आपल्या शरीरातून घाम येणे ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी ही उपयुक्त प्रक्रिया आहे.

घामाचा वास का येतो हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. पण त्यावर अनेकदा आपण डिओ अथवा परफ्यूम मारून घामाचा दुर्गंध लपविण्याचा प्रयत्न करत असतो.

शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. काखेत घाम आल्यास त्यावर नैसर्गिक उपायही तुम्हाला करता येतात.

या लेखातून सोपे घरगुती उपाय देण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता.

काखेत घाम उपाय तसं तर अतिशय सोपे आहेत. सहजपणाने जाता येता तुम्ही हे उपाय करू शकता.

काखेत घामाचा वास का येतो त्याची कारणे

घामामुळे येणारा शरीराचा दुर्गंध मुख्यत्वे अपोक्राईन ग्रंथीशी जोडलेला आहे. घाम येणे ही प्रक्रिया शरीरासाठी चांगली आहे. मात्र यातून येणारा दुर्गंध हा आपल्या त्वचेमध्ये जीवाणू उत्पन्न करू लागतो. या जीवा-णूंमुळेच आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या घामातून दुर्गंध येतो.

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक गंध असतो जो त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि स्वास्थ्य आणि लिं-गानुसार अवलंबून असतो. काखेत इतर शरीरापेक्षा जास्त घाम येतो. त्यामुळे दुर्गंधीही जास्त येते.

सतत हात खाली असल्याने हा घाम तिथेच साचून राहातो. त्यामुळे काही काही वेळाने सतत काखेत येणारा घाम हा टिश्यू पेपरने पुसत राहायला हवा. बॅक्टे-रियाद्वारे घामाची क्रिया होताना दोन प्रकारचे ऍसि-ड असतात एक म्हणजे प्रोपे-नोईक ऍ-सिड आणि दुसरं आयसो-वलरिक ऍ-सिड.

याशिवाय घामाच्या ग्रंथीही शरीरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळेच घामाचा वास येतो. पण त्यावर अनेक घरगुती उपाय आहेत. ते करून तुम्ही घामाची ही दुर्गंधी घालवू शकता.

काखेतील घामाची दुर्गंधी काढण्यासाठी घरगुती उपाय

काखेतील घाम उपाय अनेक आहेत. नक्की करून पाहा आणि त्याचा परिणामही अत्यंत चांगला होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देत आहोत.

ऍप्पल साईड व्हिने-गर

तुम्ही जर काखेतली घामाच्या दुर्गंधाने त्रस्त असाल तर तुमच्याासाठी उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. तुम्ही यासाठी ऍप्पल साईड व्हिने-गरची मदत घेऊ शकता. सफरचंदाचे हे व्हिने-गर आम्लीय प्रकृतीचे असते आणि यामध्ये आढळणारे अँटिमा-यक्रोबायल गुण हे घामाच्या या समस्येपासून सुटका मिळवून देतात.

याशिवाय तुम्ही ऍप्पल साईड व्हिने-गरचा नियमित उपयोग करत राहिलात तर दुर्गंधी पसरविणाऱ्या बॅक्टे-रियाचा प्रसारही हे कमी करते.

यासाठी तुम्ही एका भांड्यात ऍप्पल साईड व्हिने-गर घ्या आणि त्यात कापूस बुडवा.

या कापसाने तुम्ही व्हिने-गर काखेत लावा.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा प्रयोग केल्यास जास्त चांगले अथवा आंघोळ झाल्यानंतरही तुम्ही हा उपयोग करून पाहू शकता. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून तुम्ही दूर राहाल.

बटाटेही ठरतात उपयुक्त

काखेतील घामाची दुर्गंधी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही बटाट्याचाही उपयोग करून घेऊ शकता. कारण घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी बटाटा त्वचेवरील पीएच पातळीही नियंत्रित ठेवतो.

त्यामुळे बॅक्टे-रियाचा प्रसार आणि वृद्धी होत नाही. बटाट्यात हलके आम्ल आणि अँटिमाय+क्रोबायल गुण आढळतात. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

यासाठी एक बटाटा घ्या आणि त्याचे पातळ स्लाईस कापा.

या तुकड्यांनी तुम्ही काख अर्थात अंडरआर्म्स रगडा. लागलेला बटाट्याचा रस सुकला की तुम्ही तुमचे नेहमीचे परफ्युम लावा.

दिवसातून असं केवळ एक ते दोन वेळा तुम्ही करून पाहा. तुमच्या घामाची दुर्गंधी लवकरच कमी होते.

आयोडिनचा करा वापर

त्वचेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक मऊपणा हा जीवाणूंच्या विकासाला फायदेशीर ठरतो. त्यामुळेच घाम येणाऱ्या ठिकाणी बऱ्याचदा पावडर लावली जाते जेणेकरून तो भाग सुका राहावा.

अंडरआर्मच्या दुर्गंधीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही घरगुती उपायामध्ये आयो-डिनचाही वापर करू शकता. आयो-डिन त्वचेला निर्जलित करण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय आयो-डिनमध्ये अँटिसे-प्टिक गुणही असतात. 

यासाठी अगदी काही थेंबाची आवश्यकता भासते.

तुम्ही एका मऊ ब्रशच्या सहाय्याने आयो-डिनचा उपयोग करा.

ब्रशने आपल्या काखेत तुम्ही आयो-डिन लावा आणि सुकू द्या.

सुकल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ करा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. याचा नियमित उपयोग करून घ्या.

सी सॉल्ट

इप्सॉम मीठ साधारणतः शरीरातील विषा-री पदार्थ नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या शरीरातील विषा-री पदार्थ बाहेर काढून घामाचं प्रमाण यामुळे वाढतं. मात्र यामधील सल्फर हे अँटिबॅ-क्टेरियलचे काम करते.

त्यामुळे घामातून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याची मदत मिळते. तुम्ही सी सॉल्ट अर्थात सैंधव मीठाचा उपयोग यासाठी करू शकता. 

1 कप सैंधव मीठ घ्या

आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हे मिक्स करा आणि मग आंघोळ करा. एक दिवस आड तुम्ही याचा उपयोग तुम्ही करू शकता आणि काखेतील घामाची दुर्गंधी यामुळे नाहीशी होईल.

बेकिंग सोडाही आहे गुणकारी

आपले अंडरआर्म सुके आणि घामापासून मुक्त ठेवायचे असतील तर बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. बे-किंग सोड्यामध्ये जीवा-णूविरोधी गुण असतात जे बॅक्टे-रियाशी लढण्यास मदत करतात.

बॅक्टेरि-यामुळेच घामाची दुर्गंधी अधिक येते. अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून नैसर्गिकरित्या सुटका हवी असेल तर हा उत्तम घरगुती उपाय आहे.

1 मोठा चमचा बेकिं-ग सोडा आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस घ्या.

हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट काखेत लावा.

पेस्ट सुकल्यावर स्वच्छ करून घ्या.

आंघोळ करण्याच्या आधी तुम्ही हा प्रयोग करू शकता.

यामुळे काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. तुम्ही आठवडाभर सतत हा प्रयोग करा.

कोरफड आहे फायदेशीर

अतिशय जास्त अँटिऑ-क्सिडंट गुण असणाऱ्या कोरफडीचा उपयोग त्वचा आणि सौंदर्यासाठी नेहमीच केला जातो. यामध्ये असणारे औष-धीय गुण घामाची दुर्गंधी पसरविणारे जीवा-णू नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

तसंच शरीराला डिटॉ-क्स करणारे गुणही कोरफडमध्ये आढळतात. काखेतील दुर्गंधी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोरफडचा उपयोग करून घेऊ शकता.

कोरफडची ताजी पानं घ्या आणि त्यातून जेल काढून घ्या.

हे जेल तुम्ही बोटांच्या सहाय्याने काखेमध्ये लावा.

रात्रभर हे असंच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर आंघोळ करा.

नियमित तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाल योग्य परिणाम दिसून येईल.

लिंबाचा रस

औषधीय गुण असल्याने लिंबाचा उपयोग विविध समस्यांच्या निवारणासाठी करण्यात येतो आणि त्वचेचे उपचारही केले जातात. लिंबामध्ये अत्याधिक आम्ल असते आणि यामध्ये जीवाणुविरोधी शक्ती अधिक असते.

लिंबाच्या रसाचा उपयोग काखेतील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी करता येतो कारण हे त्वचेतील पीएच कमी करून बॅक्टे-रिया नियंत्रित करण्यास मदत  करते.

लिंबू कापून त्याचा अर्धा भाग घ्या.

अंडरआर्म्सवर रगडा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.

तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा रस एक कप पाण्यात मिसळा आणि मग कापसाने हे पाणी तुम्ही काखेत लावा. तुम्ही रोज याचा उपयोग केल्यास, काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून तुमची सुटका होईल.

लसूणही ठरते उपायकारक

लसूण वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण तुम्ही नियमित स्वरूपात लसूण खाल्ल्यास तुमच्या शरीरातील घामाची दुर्गंधी कमी होऊ शकते. लसणीमध्ये अँटीमाय-क्रोबायल आणि अँटिऑ-क्सिडंट्सचे प्रमाण उच्च असते.

जे घाम पसरविणाऱ्या सर्व बॅक्टे-रियांना नष्ट करण्याचे काम करते. तुम्ही रोज लसणीच्या काही पाकळ्यांचे सेवन केल्यास, तुम्हाला याचा फायदा होतो. तुम्हाला कच्ची लसूण आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणात याचा उपयोग करून घ्यावा.

नारळाचे तेल

लॉरिक ऍसि-डचे प्रमाण नारळाच्या तेलात अधिक असते. लॉरिक ऍसि-डमध्ये आपल्या शरीरातील बॅक्टे-रिया काढून टाकण्यास मदत करते. अशा प्रकारे हे आपल्या त्वचेतून रोग दूर करतात आणि काखेतील दुर्गंधी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

1 लहान चमचा साय-ट्रिक ऍ-सिड आणि 1 कप पाणी घ्या.

आंघोळीला जाण्यापूर्वी काखेत नारळाचे तेल लावा.

वरील मिश्रण पाण्यात मिक्स करा आणि नंतर आंघोळ करा.

आंघोळ झाल्यावर पुन्हा काखेत नारळाचे तेल लावा. असं केल्याने तुम्हाला काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

टी ट्री ऑईल

नैसर्गिक अँटि-सेप्टिक स्वरूपातील टी ट्री ऑईलचा उपयोग तुम्ही त्वचेवरील बॅक्टे-रिया नष्ट करण्यासाठी करून घेऊ शकता. यामुळे काखेतील घामाची दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते.

दोन लहान चमचे टी ट्री ऑईल घ्या आणि 2 चमचे पाण्यात मिक्स करा.

कापसाच्या मदतीने तुम्ही हे काखेत लावा आणि नंतर काही वेळाने आंघोळ करा.

नियमित स्वरूपात याचा उपयोग केल्यास तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते.

लवेंडर ऑईल

काखेतील घाम उपाय करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक तेल आहे. याची आपल्याला खूपच मदत मिळते. लवेंडर तेल हे बॅक्टे-रियाला वाढण्यापासून रोखतात. तसंच शरीरातील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.

10 थेंब लवेंडर ऑईल आणि 3 लहान चमचे कॉर्नस्टा-र्च, 2 लहान चमचे बेकिंग सोडा घ्या.

हे तिन्ही एकत्र करून पेस्ट बनवा.

तुम्ही हे मिश्रण स्टोअर करूनही ठेऊ शकता. तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही अंडरआर्म्समध्ये हे मिश्रण लावा. हे नैसर्गिक स्वरूपाचे सुगंधित डिओ म्हणूनही तुम्ही वापरू शकता.

कॅस्टर ऑईल

बॅक्टेरिया मारण्यासाठी कॅस्टर ऑईलचा उपयोग होतो. कॅस्टर ऑईल हे मुळातच अतिशय सॉफ्ट असून काखेतील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.

झोपण्यापूर्वी कापसाच्या सहाय्याने कॅस्टर ऑईल तुम्ही दोन्ही काखेमध्ये लावा.

रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर आंघोळ करा नित्यनियमाने हा उपाय केल्यास, तुम्हाला दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

काखेतली घामाचा दुर्गंध येऊ नये यासाठी नियमित करण्यासाठी सोप्या टिप्स

दिवसातून दोन वेळा स्वच्छ आंघोळ करा.

चांगला अँटिबॅक्टेरियल साबण वापरा.

प्रत्येक आंघोळीनंतर अंग पुसायला स्वच्छ टॉवेल वापरा.

चांगले डिओड्रंट वापरा.

नैसर्गिक कॉटन अथवा लोकरीचे कपडे वापरा आणि घट्ट कपड्यांचा वापर जास्त करू नका.

काखेतील केस नेहमी काढून टाका. त्यामुळे दुर्गंधी जास्त येते. केसात घाम साचून  राहातो. त्यामुळे केस काढून टाका.

कांदा कमी प्रमाणात खा.

फळं, चिकन, मासे आणि भाजी या खाण्यावर जास्त भर द्या.

भरपूर प्रमाणात पाणी प्या.

मित्रांनो माहिती आवडली तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.