घरात पैसा टिकत नसेल सतत आ जारपण आहे अडचणी संपत नाहीत हा वास्तुदो ष आहे

मित्रांनो आम्ही तुम्हांला जे काही वास्तुशास्त्रची संबधीत उपाय सांगत असतो ते सखोल अभ्यास असणाऱ्या वास्तुतज्ज्ञांची मते, मार्गदर्शन विचारात घेउनच उपाय सांगत असतो. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगत असतो. हीच गोष्ट जोतिष्य शास्त्रची सुद्धा तशीच आहे. सखोल माहीती असणाऱ्या ज्योतिष अभ्यास करून प्रसिद्ध असणाऱ्या ज्ञानी ज्योतिष्य शास्त्रज्ञांकडून ही माहिती घेउन आम्ही ही माहिती तुमच्या पर्यंत पोहवत असतो. तुमच्या अडचणींवर प्रभावी ठरेल अशीच माहिती तुमच्या पर्यत पोहचवत असतो. त्यामुळे मनात अजिबात शंका घेउ नका.

आताचे एक 5-6 पूर्वीचे ताजे उदाहरण घ्या की आम्ही एकदा सांगितले होते की तुमचे घर बांधन्यास किंवा घर घेण्यास अडचणी येत असतील तर घरात ह्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे तुळशी जवळ दिवा लावायचा हा उपाय सांगितला होता.एका व्यक्तीने ह्या दिवाळी पासून म्हणून 2020 च्या दिवाळी पासून हा उपाय करायला सुरुवात केली आणि त्या व्यक्तीचे स्वतःचे घर आता पूर्ण होत आले आहे. असा अनुभव आम्हांला सांगितला आहे. असे छोटे छोटे अगदी घरच्या घरी सोपे उपाय कसे करायचे याचे हिंदू धर्मात प्रचलित असणारे ज्ञान आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत असतो.

आज आम्ही तुम्हांला घरात पैसा टिकत नसेल, सतत आजारपण येत असेल, आपल्या अडचणी संपत नसतील समजून घ्याकी आपल्या घरातील वास्तूदोष कारणीभूत आहे. वस्तूदोष का निर्माण होतो, तो कसा घालवायचा यासाठी घरच्या घरी करता येणारे साधे आणि सोपे असे 5 उपाय सांगणार आहोत. आपल्या घरात सकारात्मक आणि नाकारत्मक ऊर्जा वावरत असते. घरात वाद,कटकटी , आजार वाढत असतील तर नाकारत्मक ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जा कमी होत असते. आपल्या घराचे चुकीचे बांधकाम ,चुकीची रचना यामुळे हे दोष निर्माण होतात.त्यासाठी हे 5 उपाय करा तुमच्या अडचणी दूर होतील.

पहिला उपाय..
स्वस्तिक – स्वस्तिक हे शुभ चिन्ह ,मंगल चिन्ह मानले जाते. हे स्वस्तिक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रेखाटायचे आहे. ते कसे रेखाटयाचे आहे त्याचे थोडेसे नियम आहेत. पुरातन हिंदू शास्रत आहे की मुख्य दरवाजावर स्वस्तिक रेखाटायचा आहे त्याचा आकार 9 अंगुळ असावा. 9 अंगुळ लांबी आणि 9 अंगुळ रुंदी असावा. अंगुळ म्हणजे आताच्या काळातील सेंटीमीटर , मीटर माप याप्रमाणे पूर्वीचे अंगुळ हे माप वापरत असत. अंगुळ म्हणजे हाताची चार बोटे म्हणजे 4 अंगुळ, 5 बोटे म्हणजे 5 अंगुळ अशाप्रकारे 9 बोटे म्हणजे 9 अंगुळ. असे 9 अंगुळ लांबी आणि 9 अंगुळ रुंदी याप्रमाने माप घेउन सिंदुर किंवा लाल कुंकू घेउन मुख्य दरवाजावर हे स्वस्तिक रेखटावे त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्या अनेक अडचणी दूर होतात.

दुसरा उपाय- …
हा उपाय आपल्या घरातील मुख्य भाग असणाऱ्या किचन संबंधित आहे. सुख- समृद्धीचा आणि किचनचा फार मोठा संबंध असतो . आपले किचन जर वास्तुशास्त्र नुसार चुकीच्या ठिकाणी असेल तर हा उपाय करा. वास्तुदोष नक्की दूर होईल. आपल्या किचन मधील आग्नेय दिशा आग्नेय दिशा म्हणजे पूर्व-पश्चिम दिशा यामधील असणार कोपरा म्हणजे आग्नेय दिशा. या आग्नेय कोपऱ्यात एक कुठल्याही प्रकारचा ब्लब ,led असला तरी चालेल हा ब्लब सकाळ – संध्याकाळी काही वेळ सतत चालु ठेवावा. हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात.

तिसरा उपाय…
तिसरा उपाय आहे काळ्या घोड्याची नाळ. ही काळ्या घोड्याची नाळ आपोआप पडलेली असावी. जबरदस्तीने काढलेली नसावी. ही काळ्या घोड्याची नाळ आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावी. घरात येणारी नकारत्मक ऊर्जा कमी होते. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. असे केल्याने परिणामता वास्तुदोष कमी होतो.

चौथा उपाय….
हा उपाय आपल्या घरातील कचराकुंडी संबंधित आहे. आपण घरातील कचरा एकत्र करून ज्या कचराकुंडीत टाकतो ती कचरा कुंडी काहीजण मुख्य दरवाजाच्या समोरच ठेवतात. घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा येत असते. जर कचरा कुंडी मुख्यदरवाज समोर ठेवली तर नकारत्मक ऊर्जा घरात येउन वास्तुदोष निर्माण होतो. ही कचराकुंडी घराचा मुख्य कोपरा असणाऱ्या ईशान्य कोपऱ्यात अजिबात ठेवु नये. ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशामधील कोपरा. ईशान्य कोपऱ्यात कचराकुंडी ठेवली तर घरातील धन,वैभव बाहेर जाते. ईशान्य कोपऱ्यात जड वस्तु पण ठेवू नयेत. जड वस्तू ठेवल्याने धनहानी होऊन गरिबी येते.

पाचवा उपाय…
रामचरित्रमानस … हिं दूधर्म मानत की घरात कटकटी ,वाद ,आजार वाढत असतील, घरात सुख-शांती नांदत नसेल तर सतत 9 दिवस रामचरित्रमानस दिवसातून 1 वेळा असा सतत 9 दिवस पाठ करावा. हा पाठ करताना संपूर्ण कुटूंब एकत्र बसावे. हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील वास्तु दोष दूर करू शकतो. घरात सुख-समाधान येते.

हे सर्व 5 उपाय मनापासून नक्की करून बघा तुमच्या घरातील वास्तुदोष संपून घरात सुख-शांती येते,पैसा येतो, लक्ष्मी स्थिर होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.