काय आहे रिमेडी?
प्रत्येकाची इच्छा असते की आपण सुंदर दिसावे, आपला चेहरा निरोगी, डागरहित आणि नितळ असावा आणि यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात.
जर आपल्याला महागड्या उत्पादनांचा वापर करुन कंटाळा आला असेल आणि झिरो रिझल्ट मिळाला असेल तर आम्ही तुम्हाला एक असरदार घरगुती उपाय सांगणार आहोत
फायदे
हा पॅक आपल्या चेहऱ्यावरील गडद डाग, मृत पेशी, मुरुम, उन्हामुळे काळा पडलेला चेहरा कायमचे स्वच्छ करेल आणि आपला चेहरा उजळून निघेल
काय सामग्री लागेल?
● एक बटाटा
● अर्धा लिंबाचा रस
● अर्धा चमचा शुद्ध मध
● एक चमचा मुलतानी माती
● व्हिटॅमिन ई कॅप्सूल
कसा बनवायचा पॅक?
एक बटाटा स्वच्छ धुऊन घ्या. त्यांनतर तो किसून त्याचा रस काढून घ्या. आता या रसामध्ये अर्ध्या लिंबूचा रस, मध, मुलतानी माती घालून मिक्स करा आणि शेवटी त्यामध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगली पेस्ट बनवा.
चेहऱ्यावर कसे लावाल?
चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्या. त्यांनंतर बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यांनतर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. ही प्रोसेस आठवड्यातून 3 वेळा रात्री झोपण्यापूर्वी करणे.
तुम्हाला आमचा लेख कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद!!!