घराचा दरवाजा असा असेल तर लक्ष्मी घरी धावत येईल

घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेचं दरवाजा हा हे वास्तुशास्रराच्या दृष्टीने महत्वाचे असते. आपण आपल्या घरात राहून जे काम करतो,पैसा कमावने,पैशाची प्राप्ती होणे, घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी , सुख समाधान राहण्यासाठी, लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्या घराचा दरवाजा मुख्य भूमिका निभावत असतो. वास्तु शास्रत असे म्हणतात की आपल्या घराचं भाग्य आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अवलंबून असत.

आपल्या घराच्या मुख्य दरवाजा कसा असावा म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी येईल, चांगलं आरोग्य नांदेल,सकारात्मक ऊर्जा घरात येईल ह्यावर उपाय सांगत आहोत.आपल्या घराच्या समोर किंवा मुख्यदरवाजा समोर मंदिर,झाड हे किंवा ह्यांची सावली घरावर पडलेली नसावी. मुख्यदरवाजा समोर घाणेरडे वाहते पाणी, घाणेरड्या पाण्याचे डबके नसावे,विहीर,पंप,
कूपनलीका नसावी कारण या गोष्टी आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचा प्रवास बाधित करतात. सकारात्मक ऊर्जा घरात येउ देत नाही.या गोष्टी मुख्यदरवाजा समोर असल्या की नकारत्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

यावर नियम आहेत ते काय आणि कसे असावेत , घराचा मुख्यदरवाजा कसा असावा, दिशा कोणती असावी, लांबी×रुंदी
किती असावी, किती दूरपर्यंत ह्या वस्तू नसाव्यात हे खाली सांगितले आहे ..

आपल्या घराच्या मुख्यदरवाच्या उंचीच्या दुप्पट उंचीनुसार विहीर,मंदिर,झाड,वाहते घाणेरडे पाणी,डबके,पंप,कूपनलिका ह्या वस्तू घराच्या दरवाज्या पासून लांब असाव्यात. या सांगितलेल्या मतानुसार गोष्टी खूपच जवळ असतील तर वास्तुदोष निर्माण होतो. दूर असतील तर वास्तुदोष दूर होतो. याला द्वारवेध असे म्हणतात. मुख्य दरवाजा समोर जर स्तभं ,कॉलम असेल तर द्वारवेध निर्माण होतो.

मुख्य दरवाजाची उंची ही रुंदीच्या दुप्पट असावी. वास्तुशास्त्रांत हा नियम महत्वाचा आहे. घरात अनेक दरवाजे असले तरी घराचा मुख्य दरवाजाचा आकार इतर दरवाजा पेक्षा मोठा असावा. मुख्यदरवाजा मोठा असेल तर घरात सकारात्मकता येते. आपल्या घरात देवी देवतांचे आगमन होत असते म्हणून दरवाजा भव्य असेल तर वैभव, लक्ष्मी, यश घरात येईल या उलट जर असेल म्हणजे इतर दरवाजा पेक्षा मुख्य दरवाजा छोटा असेल तर पैसा घरात येत नाही आणि आला तरी टिकत नाही निघून जातो म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. दरवाजाचा आकार हा नेहमी आयताकृती असावा. रुंदी उंची पेक्षा कमी असावी म्हणजेचं उंची रुंदी पेक्षा जास्त असावी.

आजकाल फॅशनचे युग आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे बनून घेतात. कुणी चौकनी, गोळ,पंचकोणी, षटकोनी असे अनेक प्रकारचे दरवाजे बसवून घेतात. असे दरवाजे बनवा पण घराच्या मुख्य दरवाजाला लावू नका घरातील इतर दरवाजाना लावलेले चालतील. वास्तुशास्त्रनुसार दरवाजा हा आयताकारच असावा.

बहुतेक वेळा घराचा दरवाजा उघडल्यावर पायऱ्या असतात, जिना असतो. लक्षात ठेवा हे अजिबात नसावे. असेल तर तोडफोड करू नका त्यावर उपाय आहेत. वास्तुशास्त्र नुसार दरवाजाची योग्य दिशा उत्तर दिशा. ज्या घराचा मुख्य दरवाजा उत्तरेला उघडत असेल तर घरात भरपूर श्रीमंती येते. जी गोष्ट उत्तरेची तिच गोष्ट पूर्वेची.पूर्वेला दरवाजा असेल तर चौमुख विकास होतो. गायनाची किंवा इतर कुठली कला असेल तर यश नक्कीच मिळते. पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर प्रगती होते पण परिस्थिती इनबलेन्स राहते. पैशाची प्रगती कमी -जास्त होते. दक्षिण दिशा अत्यंत वाईट आणि अशुभ मानली जाते. या दिशेला दरवाजा असेल तर तोडण्याचा उपाय करू नका यावर उपाय आहेत. घरात तोडफोड चांगली नसते.

घराचा दरवाजा दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्यला असेल तर आपल्या घरात एकामागे एक समस्या येत असतात. उत्तर-पश्चिम दिशेस दरवाजा असेल तर या घरात राहणाऱ्या लोकांचा कळ हा आध्यात्मिक मार्गाकडे जास्त असतो. या घरातील लोकं देव धर्म करत असतात. काही लोकं सर्वात मोठी चूक करत असतात. जुन्या घराच्या चौकटी, दरवाजे, कड्या,कोयडें नवीन घराच्या दरवाजाला लावतात यामुळे जुन्या घरातील चिकटलेले वास्तूदोष नवीन घरात येतात. येणारी सकारात्मक ऊर्जा ह्या जुन्या वस्तू जागच्या जागी थांबवतात.

घराच्या दरवाजाच्या कड्या, दरवाजा भिंतीला आदळून जाऊन आवाज करत असेल तर चांगले करून घ्या. तीन दरवाजे समोर सरळ असतील तर पैसा टिकत नाही.लक्ष्मी येउन परत जाते. प्रगती होताना अडथळे येतात. मुख्यदरवाजा आतल्या बाजूने उघडणारा असावा. घरात तोडफोड अजिबात करू नका कारण तोडफोड न करताही यावर योग्य उपाय करता येतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.