केसात कोंडा झाल्यास ५ घरगुती उपाय

डँड्रफ म्हणजेच केसातला कोंडा ही जवळपास प्रत्येक महिलेची समस्या आहे. या कोंड्यामुळे डोक्याला खाज सुटतेच पण काळ्या किंवा इतर गडद  रंगाच्या कपड्यांवर पडलेला डँड्रफ इतरांच्या नजरेत भरतो. कितीही उपाय केले तरी कोंडा परत येतो. जाहिरातीतले शँपूही काही उपयोगाचे नसतात. ते फक्त डँड्रफ धुतात. हा कोंडा कायमचा घालवण्याचे उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. या स्वस्त आणि मस्त उपायांनी कोंड्याची समस्या कायमची सोडवा. 


* अॅपल व्हिनेगर कोंड्यावर फारच गुणचारी आहे. या व्हिनेगारमधल्या आम्लामुळे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स सांभाळला जातो. यामुळे कोंड्याची वाढ होत नाही. नियमित वापरामुळे कोंडा कायमचा दूर होतो. 


* केस ओल करून त्यावर खायचा सोडा चोळा. तुमच्या डोक्याच्या त्वचेवर हा सोडा लागू द्या. त्यानंतर शँपू लावू नका. बेकिंग सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडाही तयार होत नाही. 
* खोबरेल तेलही कोंड्यावर फारच गुणकारी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा. दुसर्‍या दिवशी शँपूने केस धुवा. 


* दोन चमचे लिंबाच्या रसाने तुमच्या केसांना मसाज करा आणि पाण्याने केस धुवून टाका. त्यानंतर शँपू लावा. मग कपभर पाण्यात लिंबाचा रस घालून त्या पाण्यानं पुन्हा केस धुवा. तुम्ही केस धुणार असाल तेव्हा ते अशाप्रकारे धुवा. पुन्हा लिंबाचा रस लावल्यानंतर शँपू लावू नका. 
* लसूणातही जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. लसणामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा फंगस नष्ट होतो. म्हणून केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा. कोंड्यापासून नक्कीच आराम मिळेल आणि केस चमकदार होतील. 

कोरफडाच्या रसाने केसांना मसाज करा आणि एका तासाने केस धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते. 

नारळाच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. आंघोळ करण्याआधी केसांना या तेलाने मसाज करा. नियमितपणे हे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते. 

एक ग्लास पाण्यात चार चमचे बेसन मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवा त्यानंतर केस धुवा. हा उपाय साधा आणि फायदेशीर आहे.

दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोन चमचे पाणी एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना लावून १५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल.

पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल.

कडुनिंबाची पाने नीट वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. हा लेप केसांना लावा. थोड्या वेळावे केस धुवा.


केसात कोंडा झाल्यास ५ उपाय :

१. मेथीच्या पुडीला पाण्यात टाकूण लेप तयार करावा आणि तो  डोक्यावर लावावा. एक तासानंतर डोकं धुवून घ्यावे.

२. केस धुतांना लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.  

३. बीटची मुळं पाण्यात घालून पाणी उकळावं आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावा.

४. दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो.

५. थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे यामुळे केस गळती आणि कोंडा होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.