केस दाट होण्यासाठी हे उपाय करा

सहज करता येतील असे सोपे उपाय :-

आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रिची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. शिवाय सध्या ताण हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. केसांच्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम तेल आणि शाम्पू गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आहार आणि इतरही गोष्टी केसांचे आरोग्या चांगले राहण्यासाठी तितक्याच आवश्यक असतात. पाहूयात केस जाड व्हावेत यासाठी नेमके काय करावे.

भांग बदला

आपल्यातील अनेक जण कायम एकच भांग ठेवतात. त्यामुळे केसांना त्याचप्रकारचे वळण लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केस गळतात आणि ट क्कल दिसायला लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केसांचा भांग बदलावा. त्यामुळे टक्कल पडण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

ब लो ड्राय

ब्लो ड्राय केल्याने केस जाड आहेत असे वाटते. त्यामुळे केस जास्तच पातळ वाटत असतील तर ते तात्पुरते जाड दिसण्यासाठी ब्लो ड्राय हा चांगला पर्याय असू शकतो. एकदा शिकून घेतले की राऊंड ब्रशने ब्लो ड्राय केल्यास त्याचा फायदा होतो.

केस वाळवताना वरुन खाली वाळवा

केस चांगले ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे केसांच्या मूळाची काळजी घेणे. तसेच केस घनदाट व्हावेत यासाठी केस वाळवताना ते वरुन खालच्या दिशेने पुसावेत.

केसांना मसाज करणे

अनेकदा केस तेलकट असल्याने किंवा इतर काही कारणाने चपटे दिसतात. अशावेळी केसातून दर काही वेळाने हात फिरवल्यास ते घनदाट दिसतात.


केसांना दोन भागात विभागात विभागणी करा

केस दाट होण्यासाठी तेल लावताना सुद्धा केसांची दोन भागात विभागणी करा. अशा पध्दतीने तेल लावल्यास केसांच्या मुळानां तेल लागेल. तसंच बाहेर जाताना सुद्धा केस तुम्हाला मोकळे ठेवायचे असतील तर त्यांची दोन भागात विभागणी करा.  त्यामुळे तुमचे केस दाट दिसून येतील. 

रोलर्सचा वापर करा.


केसांना दाट बनवण्यासाठी  सगळ्यात  महत्वाचा पर्याय म्हणजे केसांवर रोलर्सचा वापर करा. त्यासाठी केसांना रोलर्स २० मिनिटं राहू द्या.त्यानंतर तुम्ही  रोलर्स काढून टाका असं केल्यास केसात फरक दिसून येईल.

आहार व्यवस्थित घ्या 

आपलं डाएट  केसांची वाढ होण्यासाठी मदत करत असतं. पण खाण्यामध्ये फास्ट फूड आणि आरोग्याला अपायकारक असं खाणं जास्त प्रमाणात खात राहिल्यास, केसगळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराची मात्रा वाढवा. त्यासाठी अंडी खा. कारण अंड्याचा पिवळा भाग सोडता बाकीच्या भागात प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. 

आवळ्याचा वापर-

आवळा हे केसांसाठी नैसर्गिक औषध आहे. यातील गुणधर्म तुमच्या केसांना अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे याचा नियमित वापर केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.  त्यामुले आवळ्याचा रस करून केसांना लावा आणि ते सुकल्यानंतर केस धूवून टाका.

नारळाचं तेल 


जर तुम्हाला दाट आणि लांब केस हवे असतील तर नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल तुमचे केस मुळापासून चांगलं राखण्यासस मदत करतं. केस तुटण्यापासून नारळाचं तेल वाचवतं. नारळाचं तेल म्हणजे केसांसाठी प्रिकंडिशनिंग आहे. आठवड्यातुन किमान दोन- ते तीनवेळा केसांची नारळाच्या तेलाने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका

Leave a Reply

Your email address will not be published.