होळीच्या अग्नीत टाका ही वस्तू गरीबी जाईन दूर दूर सगळ्या इच्छा पूर्ण

होळीची रात्र ही तंत्रमंत्र करण्यासाठी खूप चांगली समजली जाते. सर्वजण जेंव्हा होळीचा सण साजरा करीत असतात सगळीकडे जेंव्हा होळीचा जोश असतो तेंव्हा निर्जन स्थळी एकांत ठिकाणी तंत्र आणि मंत्रांनी होळी खेळली जाते.

या होळीत लाल, निळे, पिवळे यांसारखे रंग न वापरता देशी पान काळे तीळ कुंकू, कपूर, नारळ, लिंबू, लाल मिरच्या हे सर्व वापरून करणी केली जाते. हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौणिमेला साजरी केली जाते. 2 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी हुलीक दहन तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन अर्थात होळी खेळतात.

होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे. या दरम्यान काही जोतिष उपाय करून संकटांवर मात करता येते. चलातर मग आता जाणून घेऊया काही टोने तोटके काहो चमत्कारी उपाय जे आपल्या समस्यांचे निवारण करू शकतात.

आपल्याला जर धनाची कमी असेल तर होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तिथे उभे रहावे. नंतर चंद्राला स्मरण करून चांदीच्या ताटात खारीक आणि लाह्या घेऊन शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि अगरबत्ती ओवाळवी.

आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे. अर्ध्य दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रित शाबुदाण्याची खीर अर्पित करावी. समृद्धी प्रधान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि लाह्या मुलांमध्ये वाटून द्यावेत. नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे.

या उपायांमुळे काही दिवसातच आपले आर्थिक संकट दूर होत असल्याचे आपल्याला जाणीव होईल. ग्रहांची शांती करायची असेल तर होळीच्या रात्री उत्तर दिशेला चौरंगावर पांढरा कपडा पसरून त्यावर मूग, चण्याची डाळ, तांदूळ, काळे उडीद आणि तीलव्हे असे ढीग करावेत. त्यावर नवग्रह स्थापित करावे त्यावर केशराच्या तिलक करावे.

आणि ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानू शशि भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांति करा भवंतु या नवग्रह मंत्राचा जप करावा जपण्यासाठी स्पठिकाची माळ घ्यावी. जप पूर्ण झाल्यानंतर यंत्र पुजास्थळी स्थापित करावे यामुळे आपले ग्रह अनुकूल होतात.

व्यवसायात यश मिळवायचे असेल तर एकाक्षी नारळ लाला कपड्यात घवाच्या आसनावर स्थापित करावे आणि कुंकुवाने त्याला तिलक करावे. आता कोरळच्या माळेने या मंत्राचा जप करावा ओम श्रीम क्लिंम श्रीम परम सिधु व्यापार वृद्धीम नमः 21 माळ जप केल्यावर ही पोटली ग्राहकांची नजर पडेल अशा चांगल्या ठिकाणी टांगून द्यावी.

यामुळे आपल्या व्यवसायात यश प्राप्तीचे योग घडतात. आपल्या व्यवसायात आपल्याला आपली वृद्धी झालेली दिसून येते. जर विवाह होत नसेल विवाहात काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी सकाळी एक अख्या विड्यावर एक अख्खी सुपारी आणि हळदीची गाठ घेऊन शिव लिंगावर अर्पित करावी.

नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशीही करावा. म्हणजेच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी 2 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायांमुळे विवाहाचे योग लवकरच जुळून येतात. जर आपल्याला काही आजार असेल आणि त्यापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल.

तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो. होळीच्या रात्री ओम नमो भगवते रुद्राय मृतार्थ मध्ये संस्थिताय मम शरीरं अमृतम कुरुकुरु स्वः या मंत्राचा तुळस मळेने जप करावा. आपल्या घरात सुख शांतता येण्यासाठी होळी पेटवण्यापूर्वी आपण आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अंगावर हळद आणि मोहरीचे तेल यांचे मिश्रण एकत्र करून सम्पूर्ण अंगावर लेप लावावा.

अंगावर लावलेला लेप सुखल्या नंतर तो लेप काढावा आणि एका कागदात जमा करावा. या नंतर एक मूठभर मोहरी नारळाची एक वाटी घ्यावी नारळाच्या वाटीत तीळ, मोहरी, साखर, तांदूळ आणि तूप भरावे होळी पेटवण्यापूर्वी पूजा करताना हळदीचा त्यावर टीका लावावा मग पेटलेल्या होळीत हे सर्व विसर्जीत करावे.

तसेच अंगावर लावण्यात आलेला लेप एक कागदात काढून ठेवला होता तो सुद्धा होळीत विसर्जित करावा. होळी पेटण्यापूर्वी आणि संध्याकाळच्या वेळेस घरातील उत्तर दिशेला तुपाचा दिवा पेटवावा. असे केल्याने घरात सुख शांती येते असे मानले जाते. मित्रांनो हे काही उपाय अहेत हे करून आपण आपले जीवन सुखी व समृद्ध करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.